----------
@
राष्ट्रकूट दंतिदुर्ग हा बदामी चाळुक्यांचा मांडलिक, ज्याने त्याच्या जीवनाच्या अखेरच्या काळात बदामीच्या राजे साळुंखे चाळुक्यांच्या महासत्तेचा अस्त केला. त्याच्या एका अभिलेखात तो चाळुक्य राजा विषयी म्हणतो, की "त्या महावराहाला युद्धाचा कंड होता, त्याच्यापुढे मी हरीण होतो, तरीही वेळप्रसंगी सिंहाचे रूप घेऊन मी त्यावर विजय मिळविला." इतिहासकार मात्र कैलास लेण्याच्या निर्मितीचे श्रेय हाच राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग व त्यानंतर त्याचा सत्तेवर आलेला जेमतेम सोळा वर्षे सत्तेत राहिलेला वयस्क चुलता कृष्ण याला देतात. तो पण कसलाही ऐतिहासिक आधार नसताना...
याचा अर्थ राष्ट्रकूट राजा एवढ्या कुत्सित भावनेने साळुंखे चाळुक्य राजाचा उल्लेख 'महावराह' करीत असेल, तर त्याने वेरूळ येथील कैलास लेणी मंदिरातील कातळात तब्बल बारा- साडेबारा फूट उंचीची वराह अवतार शिल्पे, ते पण वराहाशी कसलाही संबंध नसताना? बहुसंख्येने कोरावीत हे विशेषच! वराह अर्थात वराह अवतार हे राजे साळुंखे चाळुक्यांचे राजचिन्ह आहे. इतिहासकारांनी थापा मारून, थापांना सजवून, त्या रुजवून राजे साळुंखे चाळुक्यांनी निर्मिलेल्या कैलास लेण्याचे क्रेडिट राष्ट्रकूटांना दिल्याचा मी अनेक पुरावे देऊन दोन भागात त्याचा पर्दाफाश केलेलाच आहे.
सतीशकुमार सोळंके देशमुख,
९४२२२४१३३९,
९९२२२४१३३९.
No comments:
Post a Comment