विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

राजा तैल साळुंखे चाळुक्याने वाक्पती परमारास 👇👇👇 रणात जिवंत पकडून लाकडी पिंजर्‍यात कैद केले

 


राजा तैल साळुंखे चाळुक्याने वाक्पती परमारास
👇👇👇
रणात जिवंत पकडून लाकडी पिंजर्यात कैद केले
-------------------
-------------------
सतीशकुमार सोळंके-देशमुख
@..............✍️
बादामी साळुंखे चाळुक्यांचा थेट वंशज असलेल्या आणि सावळ्या वर्णाचा, रंगाचा असलेल्या तैलप साळुंखे चाळुक्याने राष्ट्रकूटांच्या राजसत्तेचा अस्त करून दक्षिणेत उत्तरकालीन चाळुक्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.
------------
==============
साळुंखे राजवंशाचा
वैभवशाली इतिहास
==============
------------
"साळुंखे राजवंशाचा वैभवशाली इतिहास" या लेखमालेतील आजच्या भागात आपण माळव्याचा राजा वाक्पती परमार आणि साळुंखे चाळुक्य नरेश तैलप या दोघांच्या सत्ता संघर्षावर आणि साम्राज्य विस्तारावर दृष्टीक्षेप टाकणार आहोत. तैलप साळुंखे यास महाराजाधिराज परमेश्वर परमभट्टारक समस्तभुवनाश्रय ही सार्वभौमत्व दर्शक आणि भुजबल वीरनारायण, भुवनैकमल्ल व अाहवमल्लदेव ही पराक्रम दर्शक बिरुदे धारण केली. तर वाक्पती परमार याने आपणास श्रीवल्लभ व पृथ्वीवल्लभ या पदव्या घेतल्या होत्या.
॥ : श्लोक : ॥
---------
विख्यात कॄष्ण वर्णे तैलरने होपलब्ध सरलत्वे ।
कुंतल विषये नितरां विराजते मल्लिका मोद: ॥
--------------
- अर्थ :
----------
ज्यामध्ये कॄष्णवर्णा नामक प्रशिद्ध नदी आहे आणि कॄष्णवर्णी तैलप चाळुक्य अर्थात साळुंखे नामक महापराक्रमी सार्वभौम राजा आहे, त्याच्या विषयीच्या निष्ठेने राज्यातील लोक सद्'वर्तनी झाले आहेत. अशा कुंतल देशांत तैलपाचा नातू मल्लिकामोदमल्ल उर्फ जयसिंह चाळुक्य अर्थात साळुंखे अतिशय शोभियमान आहे.
----------
दक्षिणेत सत्तेवर आल्यानंतर तैलप साळुंखे चाळुक्याने शेजारील राज्यांवर चढाया करून चाळुक्य साम्राज्याचा राज्यविस्तार वाढवला. त्यामुळे तेैल चाळुक्य आणि माळवा नरेश वाक्पति अर्थात मुंज परमार यांच्या दोन्ही राज्याच्या सीमा एकमेकास भिडल्या. माळव्याचे परमार हे राष्ट्रकुटाचे जुने शत्रू असल्यामुळे त्यांना राष्ट्रकूटांच्या पतनाचा आनंद वाटणे स्वाभाविक होते. मात्र चाळुक्यांच्या रुपाने दुसऱ्या शत्रूचा उदयही त्यांना खपणारा नव्हता. त्यामुळे त्यांनी चाळुक्याविरुद्ध कारस्थाने सुरू केली. त्यामुळे तैलप साळुंखे यास परमाराविरुद्ध आघाडी उघडावी लागली. समकालीन अभिलेख साधनानुसार चाळुक्य आणि परमार यांच्यात अनेक लढाया होऊन विजयाचे पारडे सतत दोलायमान राहिले.
वाक्पति अर्थात मुंज परमार याला अमोघवर्ष, उत्पल आणि मुंज अशा दुसऱ्या नावानेही ओळखले जात होते. पैकी मुंज परमार या नावानेच तो जास्त प्रसिद्ध होता. त्याच्या कारकीर्दीत माळव्याची संपत्ती व समृद्धी वाढली. माळव्याच्या साम्राज्याला बळकटी आली. त्याने राज्यातील विद्या व कला याकडेही लक्ष पुरविले. वाक्पती अर्थात मुंज परमार हा मोठा कवी व विद्वानांचा आश्रयदाता होता. त्याने माळव्यात संस्कृतचे पुनरुज्जीवन केले. त्याचा पद्मगुप्त नामक राजकवी असून त्याने नवसाहसांकचरित नामक काव्य लिहिले आहे. त्या काव्याचा नायक स्वतः मुंज परमार आहे. त्याच्या आश्रयाला अनेक कवी होते. त्याने धार येथील मुंजसागर सारखे राज्यात अनेक तडाग बांधले. उज्जैनी, महेश्वर, ओंकार-मांधाता इत्यादी ठिकाणी देवळे व धरणे बांधली. असा हा वाक्पती खुद्द पराक्रमी देखील होता.
वाक्पती लाट देशात शिरला. त्यावेळी कल्याणचा चाळुक्य राजा तैलप दुसरा याचा सेनापती चाळुक्य वंशीय बारप्पा येथे अंमल चालवित होता. वाक्पतीने त्यालाही जिंकले. आपापल्या साम्राज्यविस्तारातून खुद्द तेैल चाळुक्य आणि वाक्पती परमार या दोन राजांमध्ये वैर निर्माण होऊन अनेकवार झटापटी उडाल्या. अशा वैरातूनच मुंज परमार याने चाळुक्य नॄपती तैलप याच्या राज्यावर पून्हा आक्रमण करायचे ठरवून साळुंखे चाळुक्यांच्या राज्यात आपल्या सेना घुसवल्या. मुंज अर्थात वाक्पती परमार याने त्याच्या सैन्याचा तळ गोदावरी नदीच्या उत्तरेस टाकला. मुंजा अर्थात वाक्पती परमार याचा सेनापती रूद्रादित्य त्यावेळी आजारी होता. त्याने त्याला गोदावरी नदी ओलांडून दक्षिण तीरी जाऊ नये असा सल्लाही दिला. एवढ्यावरच न थांबता मुंजाचा सेनापती रूद्रादित्य याने मुंजास तैलपावरील स्वारीचे साहस न करण्यास सुद्धा सुचविले. तरी सुद्धा मुंज परमार तैलपाच्या मागावर मोहिमेसाठी निघालाच.
गोदावरी ओलांडून त्याने त्याची छावणी नदीच्या दक्षिण तीरावर टाकली. मुंजा अर्थात वाक्पती परमाराचा हा अविचार तैलप साळुंखे चाळुक्यास कळताच त्याने अग्निकाष्ठ भक्षिले. मुंजा परमार याची साळुंखे चाळुक्य नॄपती तैलप याच्या सैन्यासोबत लवकरच गाठ पडली. तैलप तथा आहवमल्लदेव चाळुक्य अर्थात् साळुंखे आणि माळव्याचा राजा वाक्पति अर्थात मुंजा परमार हे दोन्ही बलाढ्य आणि शक्तिशाली वीर आणि त्यांच्या सेना एकदुसऱ्याला समोरासमोर भिडल्या. तैलप चाळुक्य आणि मुंज परमार या दोन मातब्बर वीरांमध्ये जे युद्ध झाले असेल, ते खरोकरच अवर्णनीय असेच असले पाहिजे. मुंजा आणि तैलप यांच्या रणांगणातील युद्धाचा वर्णन केलेला इतिहास असता तर तो खूपच पराक्रमी आणि रोचक वाटला असता. युद्धासाठी एकदुसऱ्यावर अक्षरशः तुटून पडलेले या दोन मातब्बर वीरात लढलेल्या तुंबळ युद्धाचा इतिहास खरंच मोठ्याच पराक्रमाने लढलेला असेल.
या दोघात तुमुल युद्ध जुंपले. तैल आणि वाक्पती या दोघांतील युद्धाप्रमाणेच त्यांच्या दोन्ही सैन्यातील एक दुसऱ्यात लढलेले युद्ध देखील तसेच तुंबळ आणि घनघोर लढले असेल. या लढाईचे ऐतिहासिक अभिलेख पुरावे उपलब्ध असले, तरी मात्र दुर्दैवाने युद्धातील घनघोर संघर्षाचे लिखित वर्णन मात्र कुठेही वाचावयास न मिळावे हे ऐतिहासिक दुर्दैव म्हणावे लागेल. तैलप चाळुक्याने परमारासोबत लढलेल्या या युद्धात मुंजा अर्थात वाक्पती परमार याचा पराभव करत त्याला जिवंत पकडले आणि दोराने बांधून एका लाकडी पिंजऱ्यात कैदेत ठेवले.
माहिती :
-------
अपूर्ण...
उर्वरित नंतरच्या भागात
(क्रमशः)
मार्गदर्शक :
------------
डॉक्टर नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
------------
टीप :
१) वॉलपेपर डिझाईन
नितीन केळगंद्रे
नांदेड.
२) सदरील इतिहासाची पोस्ट दर्जेदार ऐतिहासिक साधन ग्रंथावर आधारित लिहिली आहे.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉9422241339,
👉9922241339.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...