


राजमार्गावरून धिंड काढून वधस्तंभापाशी शिरच्छेद केला
-------------------
-------------------
सतीशकुमार सोळंके-देशमुख
@..............

सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्य नरेश तैल याने युद्धात रणामध्ये जिवंत पकडलेल्या माळव्याचा राजा मुंज परमार यास बंदी बनविले. लाकडाच्या पिंजऱ्यात कैद करून ठेवले. तदनंतर सेवकाकरवी काढण्यांनी बांधून दारोदार भिक्षा मागत हिंडवले, राजमार्गावरून त्याची धिंड काढून वधस्तंभापाशी नेऊन त्याचा शिरच्छेद केला. त्याचे मुंडके काढून त्याला दह्याने भिजवून ते अंगणात लटकत ठेवले. ही घटना दहाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे.
------------
==============
साळुंखे राजवंशाचा
वैभवशाली इतिहास
==============
------------
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट तैलप साळुंखे चाळुक्याने माळव्याच्या राजा वाक्पती अर्थात मुंज परमार यास युद्धामध्ये रणांगणात राजबंदी बनविल्यानंतर एका लाकडी पिंजऱ्यात कोंडून ठेवले. हे आपण "साळुंखे राजवंशाचा वैभवशाली इतिहास" लेखमालेतील कालच्या भागात पाहिले आहे. आजच्या भागात तैलप साळुंखे चाळुक्य याने वाक्पती अर्थात मुंज परमार याचे पुढे काय केले यावर आपण एक दृष्टीक्षेप टाकणार आहोत.
तैलप साळुंखे चाळुक्याने धार-माळव्याच्या राजा वाक्पती अर्थात मुंज परमार याला युद्धात बंदी बनविल्यानंतर सम्राट तैलपाने त्याला एका लाकडी पिंजऱ्यात कैद करून ठेवले. युद्धात बंदी बनविलेल्या वाक्पतीस तद्नंतर तैल चाळुक्याने आपल्या सेवकाकडून काढण्यानी बांधविले. वाक्पती परमारास त्यानंतर तैल याने दारोदार भिक्षा मागत हिंडविले. सरतेशेवटी त्याने वाक्पती अर्थात मुंज परमार याची राजमार्गावरून धिंड काढविली आणि अखेरीस त्यास (वाक्पतीस) वधस्तंभापाशी नेऊन त्याचा शिरच्छेद करण्यात आला. त्याचे शीर दह्यात भिजवून अंगणात काठीवर लटकवून ठेवण्यात आले.
माळवा नरेश वाक्पती अर्थात मुंज परमार आणि दक्षिणेतील सार्वभौम चक्रवर्ती सम्राट तैलप साळुंखे चाळुक्य यांच्यातील साम्राज्य विस्ताराचा सीमा वाद छोट्या-मोठ्या कुरबुरीतून मोठ्या युद्धात तब्दील होऊन शेवटी या दोघातील वैराचा शेवट परमार राजा वाक्पती याच्या मृत्यूने झाला.
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट तैल साळुंखे चाळुक्याने एकंदर चोवीस वर्षे राज्य केले. त्याच्या राज्याचा विस्तार मोठा होता. त्यात मद्रास इलाक्यातील बल्लारी, अनंतपूर हे जिल्हे, मैसूर संस्थानाचा बराच मोठा भाग, धारवाड, बेळगाव, विजापूर हे जिल्हे त्याच्या राज्यात असून, त्याचे राज्य ईशान्येस वारंगळ जिल्ह्यास भिडले होते. महाराष्ट्राचा संपूर्ण प्रदेश सम्राट तैलपाच्या अधिपत्त्यात होता. त्यातील बऱ्याच भागावर यादव आणि शिलाहार राज्य करीत असून ते साळुंखे नरेश तैलपाचे मांडलिक असले तरी पुष्कळच स्वातंत्र्य उपभोगीत होते.
कुंतल म्हणजे कर्नाटकावर देखील साळुंखे तैलपाचीच सत्ता असून त्यात त्याची लहान-मोठे मांडलिक राज्य होती. त्याचे विभाग वनवाशी, द्वादशसहस्त्र, हनगल पाचशे, लक्ष्मेश्वर तीनशे, बेलवोले तीनशे, कुंडी त्रीसहस्त्र, वेणूग्राम बेळगाव सत्तर, तोरगल षट्सहस्त्र, बदामी जवळील केळवाडी तीनशे, किसुकाड सत्तर, बागदडगे अर्थात बागलकोट सत्तर, तर्दवाडी सहस्त्र येणे प्रमाणे असून यातील बहुतेक राज्य तैलपा साळुंखे चाळुक्याने आपल्या मांडलिकाकडे सोपविली होती.
माहिती :
-------
अपूर्ण...
उर्वरित नंतरच्या भागात
मार्गदर्शक :
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
Dr. Neeraj Salunkhe,
Associate professor,
PhD guide,
doctor Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad.
------------
२) सदरील इतिहासाची पोस्ट दर्जेदार ऐतिहासिक साधन ग्रंथावर आधारित लिहिली आहे.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड


No comments:
Post a Comment