विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 31 August 2021

शिवनेरी लेण्या

 




शिवनेरी लेण्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पोटात /कातळ कड्या मध्ये कोरलेली ही बौद्ध लेणी चा अप्रतिम भाग .तो म्हणजे हा विशाल स्तूप . बुद्ध मूर्ती जो पर्यंत नव्हती तो पर्यंत ह्या स्तुपाना बुद्धांच प्रतीक मानलं जायचं व आजही मानलं जातं .फक्त आता मूर्ती आल्यामुळे मूर्ती कडे जास्त ओघ /पूजा वगैरे गोष्टी आहेत .भारतात असे खुप सारे स्तूप आहेत.
त्यामध्ये हा जुन्नरला लाभलेलला ऐतिहासिक व अमुल्य ठेवा आहे . हा स्तूप बराच मोठा असून आत प्रवेश केल्यावर छताकडे पाहिल्यास आपल्याला काहीसे नष्ट होत चाललेले रंगकाम दिसते . आणि हे रंगकाम 2000 ते 2200 वर्षे म्हणजेच या लेण्या इतकंच जून आहे .
हा स्तूप व त्याच्या बाजूच्या लेण्या किल्ल्याच्या पूर्व बाजू ने पायथ्याशी उभं राहून पश्चिम कडे नजर फिरवली की सहज दिसून येतात .
साखळदंड मार्गाने या किल्ल्यावर जाताना काही लेण्या लागतात . त्या लेण्या पाहून तसेच समोर उजवीकडे 10-20 मिनिट चालत गेल्यास पुन्हा काही लेण्या दिसतात . त्या लेण्या मधेच हा विशाल स्तूप व 2200 वर्षे जुने /पुरातन रंगकाम पहावयास मिळते .
.
जायचे असल्यास पूर्ण माहिती निशी जावे . /किंवा गाईड घेऊन जावे . चांगलं वर्तन असावं आणि इतिहास अभ्यासावा जो आवडेल चांगला असेल तो आत्मसात करावा .आणि
सर्वात महत्त्वाचे आपला इतिहास ,आपले किल्ले, आपला सह्याद्री , आपला देश ,आपली पृथ्वी,.....,म्हनून ते स्वच्छ ठेवणं ही आपली च जबाबदारी .

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...