


शिल्प वैशिष्ट्यातील एक प्रमुख वैशिष्ट्ये(टोटेम)
-----------------
-----------------
सतीशकुमार सोळंके देशमुख
@..............

तमाम हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान श्री हनुमान जयंती निमित्ताने सर्वांना शुभेच्छा!
राजे साळुंखे चाळुक्यांच्या बदामी आणि तिच्या सर्वच वंशज शाखांनी आपापल्या वास्तू निर्मितीमध्ये श्री हनुमान मूर्तीला बहुतेक ठिकाणी स्थान दिलेले दिसते. हे राजे बऱ्याच ठिकाणी हनुमानाच्या शिल्पाला वराहमुखी कोरत असत. याचे कारण म्हणजे, राजे साळुंखे चाळुक्यांचे राजचिन्ह वराह अर्थात वराह अवतार होते. त्यामुळे हे राजे त्यांनी निर्मिलेल्या हनुमान शिल्पांमध्ये बहुतांश ठिकाणी या हनुमानाला वराहमुखी कोरत असत.
१) उदाहरणादाखल घेतलेले हे वराहमुखी हनुमानाचे शिल्प, पाटणच्या सुंदरगड अर्थातच घेरादातेगड किल्ल्यावरील आहे.
२) राजे साळुंखे चाळुक्य निर्मित पाटणच्या सुंदरगड अर्थातच घेरादातेगड किल्ल्यावरील (गडावर) किल्ला निर्मित समकाळातील हुबेहूब तलवारीच्या आकारातील निर्मित प्रचंड मोठी बारव (विहीर) कोणाचे पण लक्ष वेधून घेईल अशीच आहे. बारवेत राजू साळुंखे चालुक्यांचे एक शिल्प वैशिष्ट्य असलेले गजलक्ष्मी शिल्प कोरलेले आहे.
३) पाटणच्या सुंदरगड अर्थातच घेरादातेगड किल्ल्यावरील वराहामुखी हनुमानाचे शिल्प गडावरील पश्चिम बाजूच्या दरवाजाच्या पुढे चढून गेल्यावर जवळपास वाटेवरच डाव्या बाजूच्या स्वयंभू कातळात (खडकात) कोरलेले आहे.
४) राजे साळुंखे चाळुक्यांनी वराहमुखी हनुमान शिल्पाच्या जवळच थोड्या अंतरावर उत्तर बाजूला तेवढ्याच आकारातील त्यांच्या शिल्प वैशिष्ट्यातील एक प्रमुख परिवार देवता असलेल्या श्रीगणेशाच्या मूर्तीलाही कातळात कोरलेले आहे.
५) सुंदरगड अर्थातच घेरादातेगड किल्ल्यावरील वराहामुखी हनुमान आणि श्री गणेश ही दोन्ही शिल्पे साडेसात फूट उंच आणि सव्वातीन ते साडेतीन फूट रुंदीची आहेत.
६) सदरील शिल्प वराहमुखी हनुमानाचे नाही, असे म्हणणारासाठी सर्वात महत्वाचा एक सवाल आहे, तो म्हणजे, जर हे शिल्प वराहमुखी हनुमानाचे नसेल तर या शिल्पांमध्ये हनुमान शेपटीच्या वरच्या बाजूला शंख आणि चक्र या विष्णूच्या आयुधांना साळुंखे राजांनी कशामुळे कोरले आहे?
७) सर्वात महत्वाचे म्हणजे सुंदरगड अर्थातच घेरादातेगड किल्ल्यावरील टोटेम्स अर्थात शिल्प वैशिष्ट्यांना पाहिल्यानंतर सदरील किल्ल्याची निर्मिती सार्वभौम चक्रवर्ती सम्राट राजे साळुंखे चाळुक्य राजवंशातील राजांनी केलेली असल्याचे लक्षात येते.
८) वराह अर्थात वराह अवतार हे राजे साळुंखे चाळुक्यांचे राजचिन्ह असून श्री गणेश ही त्यांची एक प्रमुख परिवार देवता आणि शिल्प वैशिष्ट्यातील एक महत्वाचे शिल्प वैशिष्ट्ये (टोटेम) आहे.
९) हनुमान हे राजे साळुंखे चाळुक्यांच्या शिल्प वैशिष्टयातील एक प्रमुख वैशिष्ट्य आणि त्यांची परिवार देवता असल्यामुळे या राजवंशाकडून अनेक ठिकाणी हनुमानाचे शिल्पाला वराहमुखी कोरलेले आढळून येते.
१०) सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्यांनी त्यांच्या अभिलेखातून निर्मिलेल्या दुर्गांचे एकंदरीतच नऊ प्रकार सांगितले असून त्यांची वैशिष्ट्ये देखिल विशद केलेली आहेत. त्याची एक स्वतंत्र पोस्ट माझ्या वैयक्तिक वालवर उपलब्ध आहे.
११) राजे साळुंखे चाळुक्यांच्या महाराष्ट्र, गोवे, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, इत्यादी प्रचंड मोठ्या भूभागावर विखुरलेल्या त्यांच्या राज्यात त्यांनी मोठ्या प्रमाणावर गड-किल्ल्यांच्या निर्मिती केल्या होत्या.
१२) सुंदरगड अर्थातच घेरादातेगड किल्ल्याच्या पूर्वेकडील पायथ्यावर पाटण गाव आणि आसपास साळुंखे राजवंशातील टोळे, पाटणकर, चाळके वगैरे पडनावाने राहणाऱ्या साळुंखे राजवंशीयांची गावे बहुसंख्य आहेत.
१३) गडाच्या बाजूच्या जवळच्या एका सुळक्यावर राजे साळुंखे चाळुक्यांचे वंशज असलेल्या टोळे सरदार यांचे, तर दुसऱ्या थोड्या लांबच्या अंतरावरील सुळक्यात चाळके सरदारांचे गाव आहे. याठिकाणी राजे साळुंखे चाळुक्यांची महत्वाची परिवार देवता व कुलदेव असलेल्या काळभैरवाचे मंदिर सुद्धा आहे.
१४) पाटण येथील सुंदरगड अर्थातच घेरादातेगड या गडापासून ते थेट साताऱ्या जवळील देगाव पाटेश्वरपर्यंतच्या विखुरलेल्या प्रचंड मोठ्या पट्ट्यात राजे साळुंखे चाळुक्यांच्या वंशजांची सर्वत्र विखुरलेली अनेक गावे असून, या प्रत्येक गावातील साळुंखे हा त्या गावातील प्रमुख वतनदार असलेला दिसतो.
१५) साताऱ्याजवळील परळी येथील सज्जनगड आणि त्या परिसरातील मंदिर निर्मिती तसेच सातारा येथील अजिंक्यतारा दुर्ग निर्मिती देखील राजे साळुंखे चाळुक्यांच्या आहेत.
१६) सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरील मंगळाई देवीचे नाव, सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर बदामी नरेश राजा मंगळेशा याच्या आई आणि पराक्रमी राजा पुलकेशी दुसरा यांची आजी असलेल्या राजमाता 'मंगळाई' आईच्या नावावरून ठेवलेले दिसते.
१७) राजे साळुंखे चाळुक्यांच्या अभिलेखातील माहितीनुसार ते त्यांच्या राजधानीच्या नगराला पाटण म्हणत असत. याचा अर्थ सातारा जिल्ह्यातील पाटण हे त्यावेळी चाळुक्यांच्या राजधानीचे शहर होते हे लक्षात येते.
( अपूर्ण )
------------
मार्गदर्शक :
------------
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
(Dr. Neeraj Salunkhe ),
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
------------
@ शब्दांकन :
सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड


No comments:
Post a Comment