विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

मराठ्यांच्या देवकांच्या कबड्डीतील 👇👇👇 सूर्यफूल देवक नेमके कोणाचे ?

 


मराठ्यांच्या देवकांच्या कबड्डीतील
👇👇👇
सूर्यफूल देवक नेमके कोणाचे ?
______________
------------------------
@ .........................✍️
सतीशकुमार राजे सोळंके,
मराठ्याच्या शहाण्णव कुळांमध्ये देवकाच्या बाबतीत मोठे कन्फ्युजन आहे. हे कन्फ्यूजन निर्माण करणाऱ्यांत काही वाटा गोत्रावळींचा तर काही गाव भटांचाही दिसतो. मराठ्यातील देवकांचे हे कन्फ्युजन निर्माण करण्यात गोत्रावळी आणि गावभट या दोन बाबी अग्रेसर वाटतात! मराठ्यांची कुळे शहाण्णव असली, तरी देवकांची संख्या मात्र ३६ इतकीच आढळून येते. या लेखात आपण सूर्यफूल देवक आणि त्यावर दावा करणारी मराठ्यांची कुळे या बाबतीत चर्चा करणार आहोत.
------------------------
| सूर्यफूल.. |
| देवकाची कबड्डी! |
------------------------
खरं पाहिलं तर सूर्यफूल हे सूर्याचे प्रतीक मानले जाते! मराठ्यांच्या ९६ कुळातील एकंदरीत नऊ कुळे सूर्यफूल या देवकावर दावा करताना दिसतात. सूर्यफूलावर देवक म्हणून दावा करणाऱ्यांतील आठ कुळे सूर्यवंशात येतात, तर एक कुळ चंद्रवंशात येते. विशेष म्हणजे सूर्यफुलावर दावा करणाऱ्यातील सर्वच नऊ कुळे हा दावा अगदीच रेटून करताना दिसतात.
दक्षिण भारतातील एक उच्चकुलीन राजवंश असलेल्या काकतीय अर्थात काकडे राजवंशाचे मंगल कार्यातील देवक सूर्यफूल सांगितले जाते. काकतीय अर्थात काकडे राजवंश सूर्यवंशीय येतो. सूर्यफूल हे सूर्याचे प्रतीक मानले जाते. काकडे सोबतच सूर्यफूल देवकावर दावा करण्यात अजून इतर भिन्न गोत्रीय आठ कुळे अग्रेसर दिसतात. येथे सांगायची विशेष बाब हीच, की या दावा करणाऱ्या कुळात काकडे राजवंशाचा संबंध नसणारे अजून सात भिन्न गोत्रिय सूर्यवंशीय कुळे त्यांचे देवक सूर्यफुल सांगताना दिसतात. विशेष तर तेव्हा वाटते, जेव्हा चंद्रवंशातील गायकवाड घराणे सुद्धा त्यांचे देवक म्हणून सूर्यफूलावर हक्क सांगते!
‌ तसे पाहिले तर कुलाचार विसरलेल्या मराठा घराण्यांचा सध्या उत आलेला आहे. अनेक घरंदाज नामी आणि इतरही पदव्यांच्या आडनावाने वावरणाऱ्या अनेकांना तर त्यांचे कुळच माहिती नसावे हेच विशेष वाटते. जर स्वतःचे कुळच माहित नसेल तर कुळाचा कुळाचार माहीत असण्याचा प्रश्नच उरत नाही. मराठ्यांच्या शहाण्णव कुळातील मूळ आडनाव सोडून पडनावाने राहणाऱ्या किमान ९० टक्के मराठ्यात तरी कुळाचे हे कन्फ्युजन जाणवते.
त्यात कुळाच्या आडनावाने राहणाऱ्या गायकवाड, काकडे आणि इतर सात कुळांची भर पडलेली दिसते! ही नऊही कुळें स्वतःचे देवक सूर्यफूल असल्याचे सांगतात. खरे म्हणजे सूर्यफूल देवक या भिन्न गोत्रिय नऊ कुळांपैकी कोण्यातरि एकाचेच असायला हवे. कारण ही नऊही कुळें अलग अलग अर्थात भिन्न गोत्रीय असल्याने एका भावकीची ठरत नाहीत!शिवाय काकडे आणि गायकवाड या दोन कुळांचा विचार केला तर ही दोन्ही कुळे सरळ सरळ भिन्न वंशीय कुळें आहेत. गायकवाड हे चंद्रवंशीय तर काकडे सूर्यवंशातील...
हे खरे असताना देखील ही दोन्ही कुळे आपल्या कुलाचारात सूर्यफूल या एकच देवकाला धरून बसल्याने कुलाचाराच्या प्रत्येक आघाड्यात परस्पर भिन्न असलेली ही दोन्ही कुळें स्वतःला एका देवकातील अर्थातच एका भावकीतील म्हणवताना दिसावेत हे मोठेच आश्चर्य वाटते ! यांत पुन्हा खरी गंमत म्हणजे, मराठ्यांना कन्फ्यूज करणाऱ्या गोत्रावळींनी खंडागळे, थोटे, मधुरे, मुळीक, राऊत, हंडे आणि शितोळे या भिन्न गोत्रीय कुळांच्या समोरही सूर्यफूल हे देवक लिहून अजूनच गोंधळ वाढवलेला दिसतो. काकतीय (काकडे) आणि गायकवाड या दोन्ही कुळाबरोबरच वरील वेगळ्या भिन्न गोत्रीय वेगळ्या कुलाचारातील सात कुळांनी सुद्धा आपली देवके सूर्यफूल सांगत गायकवाड आणि काकडे कुळांसोबत भावकी म्हणवत आपली नाळ जोडली असल्याचे दिसून येते !
@
सतीशकुमार राजे सोळंके,
9422241339,
9922241339.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...