


धार-माळव्याचा जगद्देव परमार
-------------------
-------------------
सतीशकुमार सोळंके-देशमुख
@..............

जगद्देव परमार या पराक्रमी वीराने माळव्यातून दक्षिणेत आल्यावर सेनापती म्हणून कल्याण नरेश विक्रमादित्य साळुंखे चाळुक्य सहावा याजसाठी केलेल्या अनेक युद्धाचा पराक्रमी इतिहासात मोठा दिसतो. विक्रमादित्यासाठी केलेल्या त्याच्या अनेक लढायांचे वर्णन इतिहासात पाहायला मिळते.
---------------
==============
साळुंखे राजवंशाचा
वैभवशाली इतिहास
==============
---------------
चाळुक्य आणि परमाराच्या राज्यसीमा नेहमीच लागून राहिलेल्या असल्याने यांच्यातील संबंध काही अपवाद सोडता इतिहासात फारसे चांगले दिसत नाहीत. मात्र दोघात वैर असूनही कल्याण नरेश पहिल्या सोमेश्वर चाळुक्याने माळवा नरेश उदयादित्य परमार याचे गेलेले राज्य मिळवून दिल्यानंतर या दोन राज्यांमध्ये काही काळ एखाद-दुसरा अपवाद सोडता सलोख्याचे संबंध प्रस्थापित असल्याचे दिसतात. उदयादित्य परमाराचे गेलेले राज्य परत मिळवून दिलेल्या सोमेश्वर साळुंखे चाळुक्याने याच उदयादित्य परमाराचा दक्षिणेत आलेला तिसरा मुलगा जगदेव परमार आहे.
श्लोक
---------
सत्रासे कालिदासे द्रव-
ति विगलति क्वापि कर्ण्णाटदण्डे
कुध्रस्य रंध्रं पटति झटि-
ति च भ्रश्यति स्वेपि सैन्ये।
भानौ पूर्व्वाद्रिसानौ भ्रमति भुजबल: श्री-
न(ज)गद्देवदेवो लक्षं धीर: प्रवी(र:)
(अ) जयदिह दृढ: कालमेघाधि-
रूढ:॥
----------
वरील श्लोकातील "भानौ पूर्व्वाद्रिसानौ भ्रमति" हे वाक्य जगद्देवाने त्याचा स्वामी असलेल्या सार्वभौम चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य साळुंखे चाळुक्य याजसाठी वापरलेले आहेत. जगद्देव परमार यांचे आतापर्यंत काही शिलालेख प्राप्त झाले आहेत. हे शिलालेख महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. यावरून सार्वभौम चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य साळुंखे चाळुक्याने जगद्देव परमार याला आपल्या राज्यातील ज्या भागावर नेमणूक दिली त्याचा अंदाज येतो.
वरील दिलेला श्लोक जगद्देव परमार याच्या एका शिलालेखातील असून या शिलालेखात जगद्देव परमाराने चाळुक्य विक्रमादित्यासाठी लढलेल्या एका विजयी युद्धाचे वर्णन केलेले आहे. या शिलालेखातील काहीच श्लोक वाचता आल्याने या युद्धाचे व्यवस्थित वर्णन करताना अभ्यासकांचा कस लागलेला दिसतो. या युद्धाचे वर्णन उद्याच्या भागात आपण सविस्तर बघणारच आहोत. सार्वभौम चक्रवर्ती सम्राट कल्याण नरेश षष्ठ विक्रमादित्य साळुंखे चाळुक्याचा पराक्रमी सेनापती असलेल्या जगद्देव परमार याच्या दक्षिणेत येण्या अगोदरच्या जीवनाविषयी अधिक जाणून घेणे आवश्यक आहे.
माळवा नरेश उदयादित्य परमार यास लक्ष्मवर्मन व नरवर्मन नावाची दोन मुले होती. पण त्यांच्यावर त्याचे प्रेम नसावे म्हणून नवीन पुत्रासाठी त्याने शंकराची आराधना केली. त्यामुळे त्याला आणखी एक पुत्र झाला. त्याचे नाव जगद्देव परमार होते. आपल्यानंतर माळव्याची गादी जगद्देवाला मिळावी, अशी योजना करून उदयादित्य परमार याने जगद्देवाला मालव राज्याचा एक भाग, जो जेजकभुक्ती अर्थात आजचे बुंदेलखंड येथे अधिकारी नेमले. सहाव्या विक्रमादित्य साळुंखे या राजाने देखील त्याच्या एका अभिलेखात जगद्देवाला 'जज्जुगि जगद्देव' म्हटले आहे. जज्जुगि म्हणजे जेजक भुक्तीवरील अधिकारी असा त्याचा अर्थ होतो.
माळवा नरेश उदयादित्य परमार यांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या योजनेनुसार 'राज्यलक्ष्मी'चा स्वीकार करणे शक्य असूनही मोठे दोन बंधू असताना त्यांच्या अगोदर 'राज्यलक्ष्मी'शी विवाह करण्याच्या 'परिवित्ती' नामक पातकाच्या भीतीमुळे जगद्देवाने तिचा स्वीकार केला नाही. त्यामुळे परमार नरेश उदयादित्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वडील पुत्रांपैकी अगोदर लक्ष्मवर्मन व नंतर नरवर्मन यांनी राज्य केले. यांनी पूर्वी सार्वभौम चक्रवर्ती सम्राट साळुंखे चाळुक्यांच्या ताब्यात असलेला चांदा जिल्ह्याचा प्रदेश जिंकून आपल्या राज्याला जोडला होता. त्यामुळे चाळुक्यांशी त्यांचे संबंध बिघडले होते. साळुंखे चाळुक्य नरेश सहाव्या विक्रमादित्याने इसवी सन १०९७ च्या शेवटी शेवटी माळव्यावर स्वारी करून धारा नगरी उध्वस्त केली. यानंतर विक्रमादित्य व जगद्देव यांची भेट झाली. त्यानंतर लवकरच जगद्देवाने मालवा राज्याचा त्याग केला व दक्षिणेत आला. अशा या जगदेव परमाराला ज्येष्ठ पुत्र मानत विक्रमादित्य साळुंखे याने जगद्देवाला आपल्या राज्यातील एका विभागाचे स्वामी केले अर्थात नेमणूक देऊन सामंत बनविले.
टीप :
-------
अपूर्ण...
उर्वरित उद्याच्या भागात
(क्रमशः)
मार्गदर्शक :
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
(Dr. Neeraj Salunkhe),
Associate professor,
PhD guide ,
Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड


No comments:
Post a Comment