राजवट वैभवशाली? हजारो मंदिरे व लेण्यांचे निर्मिक राजेसाळुंखे
दोन दगडी शिळांच्या खाच्यात खाचे अडकवून मंदिर निर्माणाचे हे तंत्राचा सर्वप्रथम शोध लावून या तंत्राला डेव्हलप करण्याचे कार्य बदामीच्या राजे साळुंखे चाळुक्यांचे असून या तंत्राचा वापर करून त्यांनी अख्या दख्खनात अशी हजारो मंदिरे निर्माण केली. या मंदिर निर्माण शैलीचा प्रसार संपूर्ण भारतभर आणि जगात इतरत्रही झाला. म्हणून राजे साळुंखेंना या स्थापत्य शैलीचे जनक म्हटले जाते. राजे साळुंखे चाळुक्यांनी या शैलीचा त्यांच्या संपूर्ण राज्यभर प्रसार करून हजारो मंदिरांच्या निर्मिती केल्या.
बदामीच्या राजे साळुंखे चाळुक्यांनी इ.सनाच्या सहाव्या शतकात मंदिर स्थापत्यातील या शैलीचा शोध लावून आजच्या कर्नाटकातील गदग आणि ऐहोळे याठिकाणी मंदिर निर्माण कार्यशाळा सुरू केल्या. याठिकाणी ही शैली अगोदर डेव्हलप करून स्थपती, शिल्पी, कामगार आणि कारागिरांच्या प्रशिक्षित टोळ्यांच्या निर्मित करून या टोळ्यांकडून राज्यात आणि राज्याबाहेरही या शैलीचा प्रसार-प्रचार केला. राजे साळुंखे चाळुक्यांनी वाळू, चुना वगैरेचा या बांधकामात प्रयोग न करता घडीव जोडीव मोठमोठ्या दगडी शिळांच्या खाच्यात खाचे अडकवून त्यांनी सर्वत्र हजारो मंदिरांच्या निर्मित्या केल्या.
चौदाशे ते दीड हजार वर्षापूर्वी राजे साळुंखे चाळुक्यांनी बदामी या राजधानीच्या ठिकाणा जवळील ऐहोळे व गदग येथे मंदिर निर्माणाची ही शैली डेव्हलप करण्यासाठी कार्यशाळा उभी केली. या स्थापत्य शैलीला बदामीच्या राजे साळुंखे चाळुक्यांच्या वंशज शाखा असलेल्या वेंगी, गुजरात, लाट आणि कल्याणच्या चाळुक्यांनी पुढील काळात या शैलीचा वापर करून हजारो मंदिरांच्या निर्मिती केल्या. बदामीच्या राजे साळुंखे चाळुक्य राजवटीच्या काळात उगम पावलेली ही स्थापत्य शैली दक्षिणेत मुस्लिम सत्तेचा उदय झाल्यानंतर स्थापत्य शैलीतून जवळपास लोप पावली होती. मात्र अयोध्येतील होणाऱ्या राम मंदिर स्थापत्याने राजेश साळुंखे चाळुक्यांची ही शैली पुन्हा एकदा देशातच नाही तर संपूर्ण जगभर चर्चेत आणली आहे.
ऐहोळेतील मंदिर निर्माण प्रशिक्षण कार्यशाळेत साळुंखे चाळुक्य राजांनी २२ मंदिर समूहात बांधलेली २०९ मंदिरे सध्याही स्वत:चे अस्तित्व टिकवून आहेत. याठिकाणी त्यापूर्वी यापेक्षा संख्येने कितीतरी अधिक मंदिरांचे निर्माण होते हे विशेष! ऐहोळे येथील परिसरास नजरेखालून घातल्यावर एक गोष्ट लक्षात येते, की या ठिकाणी राजे साळुंखे चाळुक्यांची केवळ मंदिर निर्माण प्रशिक्षण कार्यशाळाच नसून त्यांनी डोंगर रांजीतील खडकात लेण्या कोरण्याचे आणि गड किल्ल्यांची निर्मिती करण्याचेही स्थपती, शिल्पी आणि कारागीर टीमला प्रशिक्षण दिले होते. चाळुक्य राजांनी स्वत:ची मंदिरादी निर्माण शैली ऐहोळे येथे डेव्हलप केली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या राज्यात मंदिरे, लेण्या आणि गड किल्ल्यांच्या मोठ्या प्रमाणात निर्मिती केल्याचे त्यांच्या अभिलेखिय साधनातून लक्षात येते.
दरम्यान सिमेंट वगैरेचा कसलाही वापर न करता दोन दगडी शिळांना एकमेकांच्या खाच्यात खाची अडकवून अयोध्येतील प्रस्तावित श्री राम मंदिराचे निर्माण होणार असल्याने संपूर्ण जगाच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र भारतीय स्थापत्याला मात्र ही बाब नवीन नाही, याचा शोध घेण्यासाठी आपणास दीड हजार वर्ष पाठीमागे जावे लागते. कारण मंदिर स्थापत्यात कसलाही चुना, वाळू वगैरे गोष्टीला न वापरता मंदिर निर्माणातील हे स्थापत्य तंत्रज्ञान बदामीच्या राजे साळुंखे चाळुक्यांनी इ. सनाच्या पाचव्या सहाव्या शतकात सर्वप्रथम जगासमोर आणून प्रचलित केलेले स्थापत्य आहे. बदामीच्या राजे साळुंखे चाळुक्यांनी दगडाने मंदिरे बनविण्याचे नवीन कसब मंदिर स्थापत्यात आणून त्याला प्रचलित केले. मंदिर स्थापत्यात बांधकामासाठी कसलाही चुना, वाळू वगैरे गोष्टी न वापरता मोठ्या दगडी शिळांच्या खाच्यात खाचे अडकवून राजे साळुंखे चाळुक्य राजांनी भारतात हजारो मंदिरे निर्माण केली आहेत.
( अपूर्ण )
------------
मार्गदर्शक :
------------
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
(Dr. Neeraj Salunkhe ),
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
------------
@
शब्दांकन :
सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड.


No comments:
Post a Comment