विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

राज्य परत मिळविण्याच्या असमर्थतेमुळे शरण गेलेल्या जयसिंह परमारास 👇👇👇 साळुंखे चाळुक्यांनी त्याचे राज्य परत मिळवून दिले

 


राज्य परत मिळविण्याच्या असमर्थतेमुळे शरण गेलेल्या जयसिंह परमारास
👇👇👇
साळुंखे चाळुक्यांनी त्याचे राज्य परत मिळवून दिले
-------------------
-------------------
सतीशकुमार सोळंके-देशमुख
@..............✍️
परमार वंशातील भोज राजा माळव्याच्या गादीवर विराजमान असताना गुजरातेतील चाळुक्य-सोळंकी आणि कर्ण कलचुरी यांच्या आक्रमणात परमारांचे राज्य गेले. या युद्धात माळव्याचा सुप्रसिद्ध राजा परमार भोज हि मारला गेला. आपले गेलेले पैतृक राज्य परत मिळविण्यासाठी असमर्थ असलेल्या जयसिंह परमार यास दक्षिणेतील उत्तरकालीन कल्याणच्या सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर सोमेश्वर या साळुंखे चाळुक्य सम्राटास शरण जावे लागले. यामुळे जे माळव्याच्या परमारांचे राज्य गेले होते, ते राज्य साळुंखे चाळुक्य राजांनी परमार राजांना परत मिळवून दिले.
------------
==============
साळुंखे/ सोळंके राजवंशाचा
वैभवशाली पराक्रमी इतिहास
==============
------------
माळव्याचा सुप्रसिद्ध राजा परमार भोज हा गुजरात चौळुक्य-सोळंकी आणि कलचुरी कर्ण यांच्या आक्रमणात ठार व्हावा... त्याचे गेलेले राज्य भोजाचा वारसदार जयसिंह परमारास, कल्याण साळुंखे चाळुक्यांनी शरण आल्यामुळे परत मिळवून द्यावे आणि परमार जयसिंहास माळव्याच्या राजसिंहासनावर विराजमान करावे... पुढील काळात चाळुक्यांच्या गृहकलहामधून त्यांनी केलेल्या माळवा आक्रमणाने चाळुक्यांच्याच मदतीने मिळविलेले राज्य जयसिंह परमारास जीवाला मुकून पुन्हा गमवावे लागणे, हा खरंतर दैवाचा विचित्र खेळच म्हणावा लागेल.
जयसिंह परमार माळव्याच्या गादीवर बसण्यापूर्वी त्याचे राज्य गुजरात सोळंकी व कलचुरी यांनी परमार भोजाला मारून जिंकले. परमारांचे माळवा राज्य शत्रूच्या ताब्यात गेल्यामुळे आणि भोज परमाराचा उत्तराधिकारी असलेला जयसिंह परमार हा त्याचे गेलेले पैतृक राज्य परत मिळविण्यास समर्थ नसल्यामुळे, आपले गेलेले राज्य परत मिळावे म्हणून तो मदतीकरिता नाईलाजाने सार्वभौम चक्रवर्ती सम्राट कल्याण नरेश सोमेश्वर साळुंखे चाळुक्यास शरण गेला. जयसिंह परमार यांने आपले माळवा राज्य परत मिळवून देण्यासाठी साळुंखे चाळुक्य राजांकडे मदतीची याचना केली.
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर कल्याण नरेश सोमेश्वर साळुंखे चाळुक्याने आपला पराक्रमी पुत्र युवराज विक्रमादित्यास परमार जयसिंहाच्या सहाय्यार्थ मदतीस दिले. युवराज विक्रमादित्याच्या पराक्रम आणि मोठ्या फौजेपुढे गुजरातचा चौळुक्य सोळंकी राजा भीम आणि कलचुरी राजा कर्ण यांना हात टेकावे लागले. युवराज विक्रमादित्याने पराक्रमाची शर्थ करून जयसिंह परमार यास माळव्याचे राजसिंहासन मिळवून दिले.
युवराज विक्रमादित्य साळुंखे चाळुक्याच्या पराक्रमापुढे आणि त्याच्या मोठ्या सैन्यापुढे गुजरात सोळंकी राजा भीम आणि कल्चुरी राजा कर्ण यांना परमारांच्या माळव्यातून माघार घ्यावी लागली. साळुंखे चाळुक्य युवराज विक्रमादित्याने जयसिंह परमार यास त्याचे गेलेले पैतृक राज्य परत मिळवून दिले आणि माळव्याच्या गादीवर परमार जयसिंहाची स्थापना केली. तेव्हापासून जयसिंह परमार साळुंखे चाळुक्यांचा पक्का दोस्त बनला.
त्यानंतरच्या काळात कल्याण नरेश सोमेश्वर साळुंखे आणि युवराज विक्रमादित्य सोबत जयसिंह परमाराने काही मोहिमांमध्ये भाग सुद्धा घेतला. कल्याण नरेश सोमेश्वर साळुंखे चाळुक्याच्या वतीने युवराज विक्रमादित्य साळुंखे व जयसिंह परमार याच्या नेतृत्वाखाली वेंगीवर स्वारी देखील केली. परमार जयसिंहाने उत्तरेकडून आणि युवराज विक्रमादित्याने पश्चिमेकडून एकाच वेळी वेंगीवर आक्रमण केले. हे आक्रमण राजेंद्र चोळाने परतवून लावले.
इसवी सन १०६४ मध्ये चोळ आणि चाळुक्यांच्या सैन्यात कुंडलसंगम येथे भयानक लढाई झाली. हे ठिकाण बेळगाव जिल्ह्यातील कोप्पलपासून जवळच आहे. कोप्पलच्या युद्धभूमीवर दहा वर्षापूर्वी चाळुक्य आणि चोळ सैन्यात अशीच निकराची लढाई झाली होती.
पुढील काळात साळुंखे चाळुक्यांच्या घरगुती भांडणात जयसिंह परमार यांने विक्रमादित्य साळुंखे चाळुक्याचा पक्ष घेतला. तेव्हा परमार जयसिंहाची खोड मोडण्यासाठी दुसऱ्या सोमेश्वर साळुंखे चाळुक्याने माळव्याशी युद्ध पुकारले. चाळुक्यांच्या मोठ्या सैन्यापुढे जयसिंहाचा निभाव लागला नाही. जयसिंहाला मारून साळुंखे चाळुक्यांनी त्याची राजधानी धारा घेतली.
भोज परमार याच्या कारकिर्दीत गेलेले राज्य साळुंखे चाळुक्य राजांच्या मदतीने जयसिंहाने परत मिळवावे आणि त्यानेच ते जीवाला मुकून चाळुक्यामुळेच पुन्हा गमवावे हा दैवाचा खेळ विचित्र म्हणावा लागेल यात शंका नाही. माळव्यावरील परमारांची सत्ता नेहमीच कशी डळमळीत व दुर्बल होती याचा हा सबळ पुरावाच समजला पाहिजे.
( अपूर्ण )
टीप : -
पोस्ट मधे दिलेली माहिती ऐतिहासिक साधन ग्रंथाआधारे लिहिलेली आहे. इतिहासाचा काहीही गंध नसलेल्या आणि मुद्द्याला धरून चर्चा करता येत नसलेल्या अर्धवटरावांच्या डिंगावर लाथ घालून हाकलले जाईल!
मार्गदर्शक :
------------
डॉक्टर नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
------------
टीप :
वॉलपेपर डिझाईन,
नितीन केळगंद्रे
( Nitin Kelgandre)
नांदेड.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉9422241339,
👉9922241339.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...