विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

राजे साळुंखे चाळुक्यांच्या शैलीतील निर्मित 👇👇👇 लोणार सरोवरातील भगवान श्री राम मंदिर

 


राजे साळुंखे चाळुक्यांच्या शैलीतील निर्मित
👇👇👇
लोणार सरोवरातील भगवान श्री राम मंदिर
-------------------
--------------..............✍️
सतीशकुमार सोळंके- देशमुख,
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्य राजवंश हा वैष्णव धर्मीय राजवंश असून असे असतानाही भगवान शिवाचेही उपासक असल्यामुळे या राजवंशाने विष्णूचा मंदिरापेक्षा अधिक संख्येने शिव मंदिराच्या निर्मिती केल्याचे दिसून येते. चाळुक्यांनी त्यांच्या मंदिर, लेणी आणि गडकिल्ले वास्तु निर्माणातून भगवान श्रीरामाचा अनेक शिल्पांची निर्मिती केलेली आढळून येते. असे असतानाही वैष्णव धर्मिय असतानाही चाळुक्यांनी रामाची मंदिरे निर्माण केली नाहीत, असाही एक आरोप त्यांच्यावर होताना दिसतो. मात्र लोणार सरोवरातील राजे साळुंखे निर्मित भगवान श्रीरामाचे हे मंदिर बघून यामुळे अनेक टीकाकारांची तोंडे बंद होतील.
लोणार हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र! भारतीय पौराणिक धर्मग्रंथातून लोणार विषयीच्या अनेक धार्मिक आख्यायिका अभ्यासण्यास मिळतात. याच ठिकाणी भगवान विष्णूने लवणासुर दैत्याचा वध केल्याची आख्यायिका देखील सर्वश्रुत आहे. या ठिकाणचे उल्कापातातून निर्माण झालेले सरोवर एक जगविख्यात आविष्कार मानला जातो. लोणार गावचा उल्लेख ऋग्वेद, पद्म पुराण, स्कंद पुराण, लीला चरित्र आणि विविध ग्रंथांमधून आलेला आहे.
लोणार येथे भगवान श्री विष्णू आणि प्रभू श्री रामाने देखील स्नान केल्याचे सांगितले जाते. धर्मराजाने येथे वडील पंडुचे तर रामाने दशरथाचे श्राद्धसंस्कारही लोणार येथेच केल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी नारद, कपिलमुनि, ब्रह्मदेव, अगस्ति, भृगु, चंद्र आदिंनी देखील तपश्चर्या केल्याचे सांगण्यात येते. नंतरच्या काळात बरीच वर्षे हा परीसर मुस्लीम राजवटीच्या अधिपत्याखाली राहिल्याने, या काळात येथील अनेक मंदिरांची मोडतोड केलेली नजरेस पड़ते. लोणार आणि सरोवरातील मंदीरांवरील बऱ्याच मूर्त्यांची सुद्धा तोडफोड झालेली असल्याचे येथे पहायला मिळते.
लोणार सरोवरातील वर्तुळाकार भागात एकूण पंधरा मंदिरे आणि एक दर्गा आहे. विशेष म्हणजे दर्ग्याच्या निर्मितीला राजे साळुंखे चाळुक्यांच्या मंदिराच्या दगडांचा आणि स्तंभांचा आधार दिसतो. लोणार सरोवराच्या वर्तुळाकार भागात चाळुक्यांनी निर्मिलेल्या या मंदिरांमध्ये महादेवाची बारा ज्योतीर्लिंग मंदिरे असून श्रीराम, हनुमान आणि कमळजा देवीचे प्रत्येकी एक अशी एकंदर पंधरा मंदिरे आहेत. ही सर्वच मंदिरे सार्वभौम चक्रवर्ती सम्राट साळुंखे चाळुक्य राजांनी निर्मिलेली आहेत.
टीप :
लोणार सरोवरातील वर्तुळाकार भागात राजे साळुंखे चाळुक्यांनी निर्मिलेल्या भगवान श्री रामाच्या मंदिरासमोर कॅमेर्यात बंद केलेला एक क्षण. ....
( अपूर्ण )
छायाचित्र सौजन्य :
प्रोफेसर डॉ. वर्षा मिश्रा,
Dr. Varsha Mishra
लोणार...
------------
मार्गदर्शक :
------------
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
------------
@
शब्दांकन :
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड.
👉9422241339,
👉9922241339.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...