विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

प्राचीन सप्तश्री मंडळ' जगातील सर्वात प्राचीन कालगणना 👇👇👇 युधिष्ठिर कालगणनेनंतर प्रसिद्ध कालगणना मल्ल वंशीय सातवाहनांची!

 


प्राचीन सप्तश्री मंडळ' जगातील सर्वात प्राचीन कालगणना
👇👇👇
युधिष्ठिर कालगणनेनंतर प्रसिद्ध कालगणना मल्ल वंशीय सातवाहनांची!
-------------------
-------------------
सतीशकुमार सोळंके-देशमुख
@..............✍️
प्राचीन काळी भारत भूमीवर सप्तर्शी संवत सुरू होते हे प्राचीन इतिहासाला अभ्यासल्यानंतर माहीती होते. यावरून भारतातील प्राचीन काळातल्या ऋषीमुनी आणि ज्योतिषांच्या खगोल शास्त्रातील अभ्यासाविषयीचे प्रगल्भ ज्ञान लक्षात येते. अवकाशातील तारांगणात असलेले सप्तर्षी हे निरनिराळ्या नक्षत्रातून २७०० वर्षांमध्ये एक परिभ्रमण पूर्ण करतात. प्रत्येक नक्षत्रात ते शंभर शंभर वर्ष राहतात. याचाच अर्थ तारांगणातील सप्तर्षी मंडळ या कालगणनेचा खरा मूळ गाभा आहे.
------------
श्लोक :
---------
आसन्मघासु मुनय: शासति पृथ्वीं युधिष्ठिरे नृपती।
षड्द्विकपंचद्वियुत: शककालस्तस्य राज्ञश्च ॥
एकैकस्मिनृक्षे शतं शतं ते वर्षानाम्।
प्रागुदयतोप्यविवरादृजून्नयति तत्र संयुक्ता:॥
-------------
वरील श्लोकाचा अर्थ विशद करायचा झाल्यास असे दिसून येईल, की तुर्वसु अर्थात तोमर /तंवर /तौर राजवंशातील प्रसिद्ध राजा युधिष्ठीर राज्य करीत असताना तारांगणातील सप्तर्षी मघा नक्षत्रात होते. त्यावरून त्या राजाचा शककाळ २५२६ ने युक्त होता; म्हणजे शककाळात २५२६ मिळवले असता युधिष्ठिर शकाचा गतकाळ काढता येतो. प्रत्येक नक्षत्रात हे सप्तर्षी शंभर शंभर वर्ष भ्रमण करतात. नक्षत्राचा उदय झाल्यानंतर त्याच्या पूर्व दिशेला सप्तर्षी मंडळ स्पष्ट दिसून येते, यावरून त्या नक्षत्रात हे सप्तर्षी मंडळ आहे असे समजले पाहिजे.
भारत भूमीवर ५०० वर्ष राज्य केलेल्या मल्लवंशीय राजवंशातील सातवाहनांचे वारसदार राजे साळुंखे चाळुक्य राजवंशातील संपूर्ण दख्खनाचा स्वामी असलेल्या सार्वभौम चक्रवर्ती सम्राट षष्ठ विक्रमादित्याने त्याचे स्वतःचे विक्रम संवत कालगणना वर्ष सुरू करून सातवाहनांच्या वारशाला शोभेल असेच कार्य केले आणि राजे साळुंखे चाळुक्यांच्या इतिहासातही एक मानाचा तुरा रोवला. त्यापूर्वी मल्ल वंशीय सातवाहन राजवंशातील शालिवाहन राजाने आपले शक संवत सुरू करून त्याच्या मल्ल वंशाचे नाव इतिहासात सूर्यासारखे तेजविले होते. इ.सन वर्षात ७८ मिळवले असता आपणास हे शक वर्ष मिळते.
त्यापूर्वी देशात युधिष्ठिराचे कालगणना वर्ष वापरण्याची पद्धत असावी हे यावरून लक्षात येते. तुर्वसु अर्थात राजे तोमर/तोवर/तौर राजवंशातील धर्मराज्य केलेल्या युधिष्ठिराने त्याकाळात त्याचे सप्तर्षी संवत कालगणना वर्ष सुरू होते. त्यापूर्वी देखील भारत भूमीत, प्राचीन सप्तर्षी संवत, ज्याचा काळ इसवी सन पूर्व ६६७६ आहे, हे सुरू होते. त्यानंतर कलीयुग संवत आले, ज्याचा काळ इसवी सन पूर्व ३१०२ आहे आणि त्यानंतर युधिष्ठिराचे सप्तर्षी संवत, ज्याचा काळ इसवी सन पूर्व ३०७६ असा आहे. याचा अर्थ भारत भूमीवर त्याकाळी या कालगणना असल्याचे या अभ्यासाअंती लक्षात येते. पुन्हा त्यानंतरच्या काळात वीर निर्वाण संवत आले. पुढील काळात उत्तरेकडील विक्रम संवत कालगणना वर्ष आले. ज्याचे वर्ष मिळविण्यासाठी आपणास इंग्रजी वर्षात ५७ मिळवावे लागतात, तेव्हा हे विक्रम संवत वर्ष मिळते.
आता आपण युधिष्ठिराच्या सप्तर्षी मंडळ कालगणने विषयी या लेखात सविस्तर समजून घेऊयात. समजा युधिष्ठिर शतकाच्या आरंभी हे सप्तर्षी मंडळ मघा नक्षत्रात होते. प्रत्येक नक्षत्रात ते शंभर वर्ष राहतात हे लक्षात घेऊन असे म्हणता येईल, की युधिष्ठिर शक १ ते १०० यावर्षी सप्तर्षी मघा नक्षत्रात होते, १०१ ते २०० ते त्यापुढील पूर्वा नक्षत्रात होते आणि २०१ ते ३०० मध्ये ते उत्तरा नक्षत्रात होते. एक परिभ्रमण पूर्ण करून युधिष्ठिर शक २९०० मध्ये हे सप्तर्षी मंडळ पुन्हा उत्तरा नक्षत्रात आले व तेथे ते १०० वर्षापर्यंत म्हणजे युधिष्ठिर शक ३००० पर्यंत भ्रमण करीत राहिले असा त्याचा अर्थ होतो.
युधिष्ठिर शकाच्या प्रारंभानंतर २५२६ वर्षांनी शालिवाहन शक सुरू झालेला आहे. त्यामुळे, ही वर्षे त्यातून वजा करावी, म्हणजे सप्तर्षी पुन्हा उत्तरा नक्षत्रात शक काळात केव्हा होते हे लक्षात येते. याचा अर्थ, युधिष्ठिर शक काळात म्हणजे २५२६ मध्ये आपल्याला हवे ते शककाल वर्ष मिळवावे, त्याला १०० मे भागावे; जो भागाकार येईल तितकी मघा पासून ची पाठीमागील नक्षत्रे समजावीत. त्यापुढील नक्षत्रात त्या वर्षी सप्तर्षी भ्रमण करीत असतात. भागाकारानंतर जी बाकी उरेल तितकी वर्षे त्या विद्यमान नक्षत्रातील आपणास हवी असलेली भुक्त वर्ष होत.
याचे एखादे उदाहरण सांगायचे झाल्यास, समजा शकपूर्व काळातील एखाद्या प्राचीन शिलालेखातील काळ ठरवायचा असेल तर या गणितानुसार शिलालेखातील काळ तपासून पाहणे शक्य होते. समजा शिलालेखातील काळाचा आकडा शक १८० आहे असे मानले, तर २५२६ + १८० = २७०६ ÷ १०० = २७ गत नक्षत्रे असे उत्तर मिळते. याचा अर्थ मघापासून २७ वे नक्षत्र अश्लेशा; त्या पुढील नक्षत्र मघा होय. अर्थात शके १८० मध्ये सप्तर्षी मघा नक्षत्रात होते असे त्याचे उत्तर मिळेल. म्हणजेच त्यावेळी त्याची सहा वर्ष भुक्त होती असे त्याचे उत्तर मिळू शकते.
मार्गदर्शक :
------------
डॉक्टर नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
------------
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉9422241339,
👉9922241339.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...