विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

भूलोकमल्ल साळुंखे चाळुक्याने जगद्देव परमारस दुर्गात कोंडले 👇👇👇 मदतीला आलेल्या राजास ठार केले; जगद्देव शरण आल्यावर सोडून दिले

 


भूलोकमल्ल साळुंखे चाळुक्याने जगद्देव परमारस दुर्गात कोंडले
👇👇👇
मदतीला आलेल्या राजास ठार केले; जगद्देव शरण आल्यावर सोडून दिले
-------------------
-------------------
सतीशकुमार सोळंके-देशमुख
@..............✍️
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट कल्याण नरेश भूलोकमल्ल साळुंखे चाळुक्य सत्तेवर आल्यानंतर त्याच्या महामंडलेश्वर अर्थात सामंत असलेल्या जगद्देव परमार याने इतर काही राजांच्या साह्याने भूलोकमल्लावरवर स्वारी केली. तेव्हा भूलोकमल्ल साळुंखे चाळुक्याने रणात उतरून जगद्देव परमाराशी स्वतः युद्ध करून त्यास सह्यगिरीत पिटाळून लावले, इतकेच नाही तर तेथील किल्ल्यात कैद करून ठेवले.
---------------
==============
साळुंखे राजवंशाचा
वैभवशाली इतिहास
==============
---------------
अभिलेखात पुढे असेही म्हटले आहे, की साळुंखे नरेश भूलोकमल्लाच्या कैदेतील या मालवराजाला म्हणजेच याचा अर्थ जगद्देवाला सोडविण्यासाठी दुसरा कोणी नृपती सैन्य घेऊन आल्यानंतर भूलोकमल्लासोबतच्या युद्धात तोही मारला गेला. त्यामुळे भूलोकमल्ल याच्या कैदेतील परमार जगद्देवादिक बंडखोर सामंत राजे हताश होऊन शेवटी भूलोकमल्लाला शरण गेले. यातील जगद्देवाला 'मालवराज' म्हटले असल्यामुळे तो मालवाधिपती उदयादित्याचा पुत्र होय यात शंका नाही.
--------
श्लोक
--------
तस्मिन्भुवं विभ्रति भूमिपाले भूलोकमल्ले xxxरे।
समं जगद्देवपुरोगमानां जज्ञे विरोध: किल राज्यहेतो:॥६॥
औदास्यमुच्चै: प्रकृतौ गतायां सामन्तमुख्येथ(षु) (च संमुखे*)षु।
य: कोपकालं ह्यधिरुह्य मार्गं विद्रावयामास रिपुन्समेतान्॥७॥
--------
अर्थ :
--------
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट साळुंखे चाळुक्य नरेश भूलोकमल्ल हा राजा दख्खणावर राज्य करीत असताना त्याचा काही सामंतांशी विरोध निर्माण झाला, ज्या सामंतांचा पुढारी जगद्देव परमार होता. भूलोकमल्लाचे राज्य हिरावून घेण्यासाठी जगद्देव आणि त्याच्या अनुयायांनी भूलोकमल्लाबरोबर संघर्ष करण्यास सुरू केला. त्यावेळी राज्यातील सर्वसामान्य प्रजा अत्यंत उदासीन होती, की ज्यावेळी जगदेवादिक प्रमुख सामंत राजे बंड करून उठले होते. त्यामुळे क्रुद्ध होऊन साळुंखे नरेश भूलोकमल्लाने आपल्यावर एकजुटीने चालून येणाऱ्या जगद्देवादिक शत्रूंचा मार्ग अडविला आणि रणात पराभूत करून त्यांना पळवून लावले.
------------
श्लोक :
----------
तस्मिन्क्षणे भूमिपति: स्वशत्रून्रणे (*स)ह्यगिरिं निनाय।
दुर्ग्गर्पिते(ष्वे)षु ततोतिमात्रं संवा(बा)धयामास नरेन्द्रमुख्य॥
-------------
एवढ्यावरच न थांबता भूलोकमल्लानेे शत्रूंना पराभूत करून पिटाळीत पिटाळीत सह्यगिरीपर्यंत नेले व तेथील एका किल्ल्यामध्ये त्याने त्यांना कडक बंधनात ठेवले.
------------
श्लोक :
----------
ततो जगद्देवसहायतां यो व(ब)लं समाधान(य धरा)धिनाथ:।
अजग्मिवान्मालवराजमुक्तो(क्तौ) यथा पतंङ्गोच्चिमुखं विविक्षु:॥
---------------
तेव्हा जगद्देवाला सहाय्य करून, त्या मालराजाला सोडविण्यासाठी कोणी एक राजा आपल्याबरोबर सैनिक घेऊन पतंग ज्याप्रमाणे अग्निमध्ये प्रवेश करण्यासाठी धावून येतो आणि स्वतःचा नाश करून घेतो, त्याप्रमाणे तो धावून आला व त्याने आपला नाश करून घेतला. जगद्देव परमार याच्या दुर्दैवाने धावून आलेला तो राजा, साळुंखे नरेश भूलोकमल्लाकडून ठार मारला जाऊन दिवंगत झाला.
------------
श्लोक :
----------
तस्मिन्दिवं दैवशात्प्रपन्ने मुख्येषु रा(ज्याभिमुखेषु*) तेषु।
संख्येचिते दुर्ग्गवरे हताशा भूलोकमल्लं विविशु: शरण्यं॥
-------------
त्यामुळे दुर्गातील कडक बंधनात कोंडून ठेवलेले जगद्देव परमार आणि इतर शत्रु हताश होऊन शेवटी भूलोकमल्लाला शरण गेले. कडक बंधनात ठेवलेले ते जगद्देवादिक सर्व सामंत राजे शरण आल्यानंतर भूलोकमल्लाने दुर्गाबाहेर पडून इतर मुख्य सामंत नृपतिचेही निर्दलन केले. या अशा प्रकारे उठाव केलेल्या सामंत शत्रूचा बिमोड करून कल्याण नरेश भूलोकमल्ल साळुंखे चाळुक्य राजाने आपले दक्षिणेतील वडिलोपार्जित राज्यशासन धर्माने चालविले.
जगद्देव परमारासोबतच्या या युद्धाचे वर्णन करताना साळुंखे चाळुक्य नरेश भूलोकमल्लानेे त्याचे आणि त्याच्या सैन्याचे खासच वर्णन शिलालेखातून केलेले दिसते. सार्वभौम चक्रवर्ती सम्राट षष्ठ विक्रमादित्य साळुंखे राजाचा सोमभूप अर्थात तृतीय सोमेश्वर हा ज्येष्ठ पुत्र. आपल्या पित्यानंतर तो चाळुक्यांच्या गादीवर आला. भूलोकमल्ल हे त्याचेच बिरुद, मात्र तो स्वतःच्या नावापेक्षा इतिहासाला 'भूलोकमल्ल' या बिरुदाच्या नावानेच जास्त परिचित दिसतो. त्याला 'चतुरंगमल्ल' असे दुसरे बिरुद देखील लावलेले दिसते.
चतुरंगमल्ल म्हणजे हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ या सैन्याच्या चारही अंगातील तरबेज अर्थात प्रवीण वीर. भूलोकमल्लाचा वर्ण मेघाप्रमाणे कृष्ण होता. आपल्या हातात धनुष्य घेऊन जेव्हा तो रणांगणात उभा राही तेव्हा शारंग धनुष्य धारण केलेल्या श्रीकृष्णाप्रमाणे तो शोभून दिसत असे. तो युद्धावर जायला निघाला म्हणजे हत्ती घोडे रथ आणि पायदळांनी संपन्न अशा सैन्याच्या धुळीने सर्व आकाश आणि सूर्याचे तेज झाकून जात असे. हा भूलोकमल्ल नृपती राज्य करत असताना आपले सामंत असलेला जगदेव परमार याच्याशी त्याच्या झालेल्या युद्धाचे वर्णन वरती आलेलेच आहे.
धराधिनाथ कोण?
-----------------------
शिलालेखातील अकराव्या ओळीचा आरंभीचा भाग नष्ट झाला आहे. तेथील 'x_x_धिनाथ' या अक्षरांच्या अनुषंगाने तेथे धराधिनाथ हा शब्द असावा असे इतिहासकारांचे मत आहे. मालवराज जगद्देव यास सोडविण्यासाठी आपले सैन्य घेऊन 'धराधिनाथ' आला असे अभिलेखात म्हटले आहे. हा 'धराधिनाथ' कोण असावा? या शब्दाचा सामान्य अर्थ 'पृथ्वीचा स्वामी राजा' असा होतो. पण येथे तो 'धरा' ( = धारा) नगरीचा अधिनाथ (=स्वामी) या अर्थाने वापरला असेल काय? धारा या शब्दाचे धार असे रूप आढळते, तसेच धर हे रूप असणेही अशक्य नाही. आणि तेच वृत्तसुखार्थ प्रस्तुत श्लोकात वापरले असावे. तेव्हा 'धराधिनाथ' म्हणजे धारा नगरीचा स्वामी, असा या ठिकाणी अर्थ करायला हरकत नाही.
माळव्याच्या गादीवर नरवर्मनदेवाचा पुत्र यशोवर्मन इसवी सन ११३३ मध्ये बसला. अर्थात त्या किंवा त्यापूर्वीच्या वर्षी नरवर्मनदेवाचा मृत्यू झाला असावा. तो कोणत्या रीतीने झाला याचा उल्लेख आढळत नाही. चाळुक्यांचा प्रस्तुत शिलालेख इसवी सन ११३४ चा आहे. त्यातील युद्धप्रसंग त्यापूर्वी म्हणजे ११३३ मध्ये झालेला असावा. तेव्हा त्यात वर्णिलेला जगद्देव परमारास साह्य करण्यासाठी आलेला 'धराधिनाथ' नरवर्मनदेव परमार हा असणे अशक्य नाही. भिलसा, मध्यप्रदेश येथील बिजा मंदिर मशिदीतील एका खांबावरील कोरीव लेखात नरवर्मनदेवाचा उल्लेख 'धराधिपति' असाच केलेला आहे.
मार्गदर्शक :
------------
डॉ. नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
------------
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉9422241339,
👉9922241339.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...