विनोद जाधव एक संग्राहक

Friday 20 August 2021

प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आर्यभट्ट

 

प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आर्यभट्ट

आर्यभट्ट 


 आर्यभट्ट हे भारतीय  गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म  इ.स. ४७६ मध्ये कुसुमपूर येथे झाला. कुसुमपूर म्हणजेच पाटलीपुत्र म्हणजे  आजचे पाटणा शहर होय. सूर्य  पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगणारे जगातील पहिले शास्त्रज्ञ म्हणजे  आर्यभट्ट होय.आपल्या  खगोलशास्त्राच्या संशोधनानंतर त्यांनी  पृथ्वीला सूर्याभोवती  एक फेरी मारायला ३६५ दिवस ६ तास १२ मिनिटे ३० सेंकद लागतात हे सिद्ध  केले. आजच्या आधुनिक विज्ञानानूसार याप्रमाणात फक्त काही संकेदाचाच फरक आहे. प्राचीन काळी कोणते साधने नसताना आर्यभट्टांनी हे गणित इतके अचूक कसे मांडले हे खरोखरच  आश्चर्यच आहे. आर्यभट्ट यांनी " वयाच्या २३ व्यावर्षी आर्यभट्टीय " हा गणित व खगोलशास्त्रावरील भारतीय  प्राचीनतम ग्रंथ  मानला जातो.त्यांत ११८ श्लोक आहेत. त्यात तत्कालीन बीजगणिताचा सखोल अभ्यास होता. आर्यभट्टांनी अमावस्येला सूर्यग्रहण व पौर्णिमेला  चंद्रग्रहण यांचा संबंध  चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी आहे हे नोंदवून ठेवले. 

रामायण व महाभारत झाले की नाही ? असे प्रश्न आजकाल उपस्थित  करतात. मात्र आर्यभट्ट यांनी आपली गणिती पध्दत  मांडून महाभारताचे युध्द कुरुक्षेत्रावर इ.स.पूर्व ३००० वर्षापूर्वी झाले असे नमूद केले होते. तर एन.सी.आर.टी. च्या पुस्तकांमध्ये हा काळ खूप जवळ आणून इ.स.पूर्व ९५० मांडलेला दिसतो. अर्थात  या पुस्तकांचा संदर्भ हा जर्मन बुद्धीवादी  व ब्रिटिशांचा आश्रित  इतिहासकार मँक्स मुल्लरच्या संशोधनाचा प्रभाव आहे. भारताच्या वैज्ञानिक  इतिहासाचा जेव्हा आढावा घेतला जातो तेव्हा आर्यभट्ट यांचे नाव अगदी पहिले असते. आर्यभट्टाचा प्रभाव त्यांच्या  मृत्यूनंतर ही प्राचीन भारतावर होता. त्यामुळे वराहमिहिर , ब्रह्मागुप्त , पहिला भास्काचार्य , गोविंदस्वामी असे अनेक शास्त्रज्ञ  निर्माण  झाले.   आधुनिक  विज्ञानातही   भारताने  पाठवलेला पहिला उपग्रह आकाशात पाठवला. त्याला " आर्यभट्ट" असे नाव देण्यात  आले.


--- प्रशांत कुलकर्णी  मनमाड (नाशिक )



No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...