


सिन्नर अर्थात देवगिरीचे यादव घराणे!
=========
-----------------
सतीशकुमार सोळंके-देशमुख
@.................

दक्षिणेत यादवांच्या दोन मोठ्या शाखा आहेत. यातील एक यादव तर दुसरी होयसळ अर्थात तोमर शाखा. यादव आणि तोमर या दोन्हीही राजवंश शाखा सार्वभौम चक्रवर्ती सम्राट साळुंखे चाळुक्यांचे मांडलिक राहिलेल्या आहेत. हळेबीडचे होयसळ तोवर/तौर आणि दक्षिणेतीलच श्रीनगरचे यादव, ज्यांना आपण नंतरच्या काळात देवगिरीचे यादव असेही म्हणतो. ही दोन्हीही यादव घराणी चाळुक्यांचे मांडलिक असली तरी आचार विचारांच्या दृष्टीने ते एकच म्हणजे समान दर्जाचे होते. म्हणजेच ते दख्खनेतील मराठ्यांतील चाळुक्यांएवढेच उच्चकुलीन घराणे होते.
------------
==============
साळुंखे राजवंशाचा
वैभवशाली इतिहास
==============
------------
देवगिरी यादवांच्या सत्तेचा दक्षिणेत नेमका कधी उदय झाला, ते मांडलीकाच्या दर्जावर केव्हा पोहोचले, हे नक्की सांगता येत नसले तरी यांचा दक्षिणेतील इतिहास राष्ट्रकूट काळापासून वाचण्यासाठी उपलब्ध होतो. दक्षिणेत यादवांच्या दोन मोठ्या शाखा इतिहासाला ज्ञात आहेत. त्यातील एक म्हणजे श्रीनगरचे यादव, त्यांनाच आपण नंतरच्या काळात देवगिरीचे यादव असेही म्हणतो. तर दुसरी यादव शाखा ही होयसळ तोमरांची आहे. हळेबीडचे होयसळ तोवर/तौर घराणे उत्तरकालीन कल्याणच्या राजे साळुंखे चाळुक्यांच्या उत्तेजनाने उदयाला येऊन याच चाळुक्यांच्या उत्तेजनाने पुष्कळ भरभराटीसही पावलेले घराणे म्हणून इतिहासाला माहित आहे.
बदामी साळुंखे चाळुक्यांचा थेट वंशज असलेल्या दुसऱ्या तैल साळुंखे याने दख्खनेतील राष्ट्रकूटांच्या सार्वभौम राजवटीचा शेवट करून दक्षिणेत इतिहासातील उत्तरकालीन कल्याण चाळुक्य म्हणून राजे साळुंखे चाळुक्यांच्या सत्तेची पुनर्स्थापना केली. संगमनेर ताम्रपटानुसार देवगिरी यादवांचा पूर्वज असलेल्या दुसऱ्या भिल्लम यादवाने कल्याण चाळुक्यांची अधिसत्ता स्वीकारली आणि पुढील काळात चाळुक्यांचे मांडलिक म्हणून आपल्या प्रदेशाचे शासन चालविले. तैल साळुंखे याने माळव्याचा (धार मध्यप्रदेश) राजा मुंज अर्थात वाक्पती परमार याचा पराभव करून जिवंत पकडल्यानंतर त्याचा शिरच्छेद केलेल्या युद्धात दुसऱ्या भिल्लम यादवाने तैल साळुंखेच्या बाजूने पराक्रम केला होता.
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट राजे साळुंखे चाळुक्यांच्या काही अभिलेखीय नोंदीनुसार तिसऱ्या भिल्लम यादवाने चाळुक्यांचे स्वामित्व मान्य करण्यास नकार देऊन बंडखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. मात्र त्याचे हे मनसुबे राजे साळुंखे चाळुक्य सम्राटांनी उधळून लावलेले असावेत हे अभिलेखिय नोंदीतून दिसून येते. कल्याण नरेश चाळुक्य जयसिंह आणि पहिल्या सोमेश्वर साळुंखे चाळुक्यांच्या काही कोरीव लेखात चाळुक्य सेनानींना 'भिल्लमदिशापट्ट' अर्थात भिल्लमाचा पराभव करणारा आणि 'सेऊनदिशापट्ट' अर्थात सेऊनदेशाचा विजेता अशा पदव्या देऊन गौरविण्यात आलेले दिसते. यावरून त्याकाळात सार्वभौम चक्रवर्ती सम्राट कल्याण साळुंखे चाळुक्यांचा मांडलिक असलेल्या तिसऱ्या भिल्लम यादवाने त्यांचे मांडलिकत्व माणण्यास नकार दिलेला असावा आणि त्याने केलेले हे बंड चाळुक्यांनी मोडून काढलेले असावे असे या अभिलेखिय नोंदीवरून तरी वाटते.
( लेख अपूर्ण )
मार्गदर्शक :
------------
डॉक्टर नीरज साळुंखे,
(Dr. Neeraj Salunkhe )
असोसिएट प्रोफेसर,
पीएच.डी गाईड,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
------------
२) "सार्वभौम चक्रवर्ती सम्राट साळुंखे चाळुक्यांचे मांडलिक यादव घराणे" हा उर्वरित राहिलेला अर्धा लेख पुढच्या भागांमध्ये देत आहे.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड


No comments:
Post a Comment