विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 31 October 2021

राजा रामचंद्रदेव.

 

महाराष्ट्रात राज्य राजघराणी नवीन नव्हते...
अगदी वाकाटक, सातवाहन, चालुक्य चोल वंशाचे किती तरी महारथी राजघराणी इथे होऊन गेली होती...
विदर्भ , कुंतल ,दक्षिणापथ ,नाशिक्य , अपरांत , सुपराग , पतिठान असे किती तरी भागांची स्वतंत्र उल्लेख महाभारत, रामायण अश्या अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये आढळत होता..
महाभारत काळापासून वैभवसंपन्न असलेले विदर्भ म्हणजे महाराष्ट्र असे विचारधारणेचे स्वरूप व्हायला लागले होते...
पण हा विदर्भ सुद्धा स्वरूपाने व्याप्त होता....
वाकाटकांच्या राजघराण्यांने याला सुशोभित केले होते..
नागपूर च्या निसर्ग रमणात भगवान नरसिंह स्थापन झाले होते...
अश्या या विदर्भातील सातपुड्याच्या कड्यातुन बाराव्या शतकात श्री कृष्णाच्या सावळ्या स्वरुपाची पुजा वैकल्याची गाथा लिहायला सुरुवात झाली...
आणि सातपुडा, रिद्धपुर पार करत ती महंत राष्ट्र मध्ये व्याप्त व्हायला लागली...
तीचा भाव भक्तीचा होता..
चक्रधर स्वामींच्या भक्ती चा...
हा भाव महानुभाव होता..
जो महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्राचे गौरव करत होता...
महानुभावांच्या लिळांचे लिळाचरित्र घडत होते !!
आणि अश्या या मंगल भुच्या शिखरावर एक गरुडध्वजाने आपली मान उंचावली...
शिखरावर शिखर रचले..
उंच आणि अभेद्य असे स्तंभ, भिंती उभ्या राहिल्या आणि उभी राहिली ती बुलंद बेदाग देवगिरी....
विजयी देवगिरी जिच्या भिंती हरण्यासाठी बनलेल्या च नव्हत्या...
देवगिरी चे योद्धे धारातीर्थी पडु शकतात पण हा देवगिरी नावाचा योद्धा...
नाही कधीच नाही...!!!
अश्या या देवगिरीच्या सुवर्णसाम्राज्याने आपली उंची गाठली...
सेऊण ( नाशिक चा काही भाग ) देशाच्या द्रढप्रहार चे हे घराणे ...
या घराण्यातील महापराक्रमी भिल्लमाने सोमेश्वर चालुक्य ला हरवून आपला राज्याभिषेक देवगिरी ला करवून सुवर्णगरुडध्वज देवगिरी वर उंच उंच फडकविला होता....
अश्या या घरण्याने पराक्रमाची गाथा लिहिली होती...
याच घराण्याचा काळात रूद्रांबा सारखी विरस्री स्त्री सन्मान आणि स्त्री शक्ती चे जागर करायला लागली...
हेमाडपंथी मंदिर उभी राहिली..
या घरण्याच्या काळात पुंडलिकाने विठुरायाचे देऊळ पंढरपूर ला बांधले होते...
अश्या या घराण्यातील एक वीर यौद्धाने अगदी वाराणसी पर्यंत धडक मारली...
धड...धड....करत त्याच्या हातात उंचावणारा गरुडध्वज त्याने हाती धरला...
हा वीर म्हणजे

राजा रामचंद्रदेव...
महाराष्ट्राची महाराष्ट्रगाथा सोन्याच्या पाऊलांनी गरगर फिरायला लागली...
आणि अश्यातच महाराष्ट्रात कर्मठांनी वेगळी केलेली पण तरीही आपल्या ज्ञानाने पुज्यनिय झालेली पाच भावंडे सुर्याप्रमाणे लखलखीत होत होती आणि अश्याच भावंडांच्या तारामंडळात एक ज्ञानेश्वर नावाच्या ध्रुव तार्याने भावार्थदिपीका रचली...
संत ज्ञानेश्वर माऊली ने इश्वरास मांगितले तर काय....
"या विश्वाचे कल्याण...!! आता विश्वात्मके देवे !!! "
✍️अक्षय चंदेल ( लेख अधिकृत)©

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...