भाग 2
पवार घराणे इसवीसनाच्या सतराव्या शतकाच्या प्रारंभी सुपे पेठेतील कित्येक गावात पाटीलक्या संपादून शहाजीराजे भोसले यांच्या जहागीरीत नांदत होते.(म.री.मध्य वि.पृ.284) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या उद्योगास प्रारंभ केला , त्यावेळी या घराण्यातील प्रतापी पुरुष साबुसिंग उर्फ साबाजी किंवा शिवाजीराव पवार यांची व छत्रपती शिवाजी महाराजांची एके प्रसंगी भेट झाली.दोघांचे विचार सारखेच असल्यामुळे परस्परांचा स्नेह जडला लगेच महाराजांनी साबुसिंग पवार यांना आपल्या आश्रयास ठेवून घेतले, तेव्हा पासून या घराण्याच्या उदयास प्रारंभ झाला. शिवाजी महाराजांनी 1646 मध्ये तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले त्यावेळी साबूसिंग महाराज या मोहिमेत हजर होते व साबुसिंग पवार हे त्यांच्या अंगाचा पराक्रमामुळे यावेळी अधिक प्रसिद्धीस आले.पुढे लवकरच कल्याणचा सुभा महाराजांनी हस्तगत केला त्याप्रसंगी साबूसिंग महाराजांनी चांगला पराक्रम करून सांगायचा वाढत्या कल्याणात भर घातली. यावेळेस साबूसिंग महाराजांसी आंबेगाव च्या घाटात शत्रुस अगदी जेर केले. या लढाईत साबूसिंग महाराजांच्या हाताला जखम झाली होती.(फडके परमार इतिहास) साबूसिंग महाराज यांनी नगर जिल्ह्यात सुपे येथे आपले ठाणे कायम करून त्या गावाला सुखेवाडी असे नाव दिले होते. पुढेही वाडी खरोखरच सुखाची वाटिका बनली साबूसिंग महाराज यांना छत्रपतींचा आश्रय मिळून त्यांचा दिवसेंदिवस उत्कर्ष होऊ लागला, हे मात्र सोप्या शेजारील हंगे गावचे दळवी यांना सहन झाले नाही. त्यांनी साबूसिंग पवारांशी द्वेष करून झगडे करण्यास आरंभ केला . कित्येक वेळा उभयतांच्या झटापटी झाल्या , एक दिवशी हंगेकर दळवी यांनी हंगे व सुपे यांच्या दरम्यान जांभुळ ओढ्यात रात्री छापा घालून साबूसिंग महाराजांना ठार मारले.(फडके परमार इ.)या झटापटीत साबूसिंग पवार पडले त्या ठिकाणी सध्याच्या स्थितीत त्यांची समाधी बांधलेली आहे.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य

(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)
No comments:
Post a Comment