विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग ३

 


भाग ३
साबूसिंग पवार मारले गेले त्यावेळी त्यांना कृष्णाजी या नावाचा एक लहान मुलगा होता.साबूसिंग पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याकडून मुलास त्रास होऊ नये म्हणून साबूसिंगाच्या पदरच्या लोकांनी त्यांना त्यांच्या मातेसह आजोळी संगमनेरास पोहोचते केले. तेथे कृष्णाजी सोळा-सतरा वर्षांचें झाल्यानंतर एके दिवशी काही प्रसंगाने आईकडून त्यांना त्यांच्या पित्याच्या मरणाची साग्र हकीकत कळली;तेव्हा कृष्णाजी यांना फार वाईट वाटले व ज्या हंगेकर सरदाराने आमच्या वडिलांच्या घात करून आम्हांस असे दुःखाचे दिवस आणले त्यांचा सुड उगवण्याच्या इराद्याने ते तेथून निघून छत्रपती शिवाजी महाराजांचा जवळ गेले.छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची हकीकत ऐकून व साबाजींची सेवा आठवून यांना आपल्या आश्रयास ठेवले ; व काही सरंजाम देऊन सुखेवाडी म्हणजे सुपे येथे पाठविले. कृष्णाजी यांनी गावकऱ्यांना अनुकूल करून घेऊन तेथे आपले ठाणे कायम केले. यावेळी ज्याने कृष्णाजी यांच्या वडिलांना मारले होते तो सरदार हयात नव्हता.
इसवी सन 1659 मध्ये अफजलखानाचा वध झाला त्यावेळी व त्यानंतर अफजल खानाचा मुलगा विजापूरकरांकडील शुर सरदार फाझलखान यांच्याशी छत्रपतींच्या सैन्यातील ज्या सरदारांच्या वेळोवेळी झटापटी झाल्या त्या सरदारांमध्ये कृष्णाजी पवार हे एक होते. असे सांगतात की एके वेळी फाजलखान यास मोरोपंत पिंगळे व कृष्णाजी पवार यांनी वेढा घालून अडकवले होते.मोरोपंत पिंगळे हे तर शिवाजी महाराजांचे उजवा हात होते. (रानडे उत्कर्ष पृष्ठ 47) कृष्णाजी पवार हे त्यांचे सहाय्यक होते. या हल्ल्यात या उभयतांना चांगले यश मिळाले . याप्रसंगी फाझलखानाने पंढरपूर येथील एका ब्राह्मण कन्येस जबरीने पळवून नेले होते ,तिला कृष्णांजींनी सोडविले (हा प्रसंग एका नाटकात दाखवण्यात आला आहे ) अशाप्रकारे कृष्णाजींनी छत्रपतींना सहाय्य करून शत्रूच्या मोड केला.कृष्णाजी पवारांनी विजापूरकरांच्या मुलखातील स्वार्यांमध्येही कामगिर्या बजावल्या होत्या.बहुतेक करून ते नेहमी निजामशाहीच्या सरहद्दीवर असत.(फडके परमार इतिहास)
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...