भाग १
मराठी साम्राज्याचा उदय होऊन दिवसें दिवस त्याचा विस्तार होण्यास आणि त्याचा दरारा व इभ्रत वाढण्यास महाराष्ट्रातल्या ज्या घराण्यातील पुरुषांचे पराक्रम कारण झाले आहेत, अशा घराण्यात "पवार घरण्याची" गणना प्रामुख्याने केली पाहिजे.
पवारांचे हे घराणे महाराष्ट्रात फार पुरातन ,अतिविस्तृत आणि अत्यंत विख्यात आहे.या घरांतील पुरुषांनी स्वराज्यस्थापनेच्या सुरुवातीपासून पावणेदोनशे वर्ष कित्येक महत्त्वाच्या प्रसंगी मोठ्या कामगिरी बजावून मराठा साम्राज्याची सेवा केली आहे.पावणे दोनशे वर्षाचा इतका दीर्घकाळ सतत स्वामी सेवेत राहून ज्या घराण्यातील पुरुषांनी साम्राज्याची इभ्रत वाढण्यात अत्यंत श्रम साहस व पराक्रम केले व स्वराज्यासाठी ज्या घराण्यातील अनेक पुरुषांनी प्रसंगी आपले प्राणही वेचले अशा घराण्यात "पवार घराणे" प्रमुख किंबहुना अव्दितीय आहे,असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
पन्नास वर्षापासून मराठ्यांच्या इतिहासाची साधने मिळविण्याचे महाराष्ट्रातील कित्येक विद्वानाचें प्रयत्न चालले आहेत.
परंतु पवार घराण्या सारख्या प्रसिद्ध घराण्यातील प्रत्येक पुरुषाने काय कामगिरी बजावल्या? हे पूर्णपणे दाखविण्यास अद्याप असावी तशी साधने उपलब्ध झालेली नाहीत.तथापि जी काही साधने उपलब्ध आहेत त्यावरून पवार घराण्यातील विशेषत: धार पवारांचे घराण्यातील पुरुषांनी मराठी साम्राज्याचे घटक या नात्याने साम्राज्याच्या उदय कालापासून बजावलेल्या कामगिरीची या लेखात संक्षेपत: समालोचन करावयाचे आहे.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य

(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)
No comments:
Post a Comment