विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 6 January 2022

कदम कुळाचा इतिहास

 कदम कुळाचा इतिहास

पोस्तसांभार :: प्रा. डॉ. सतीश कदम 9422650044

प्राचीन काळी चेरचोलपांडत्रसातवाहनवाकाटकपल्लवकदंबचालुक्यराष्ट्रकूट यासारख्या दिग्गज घराण्यांनी राज्यकारभार केला. यातील कदंब घराण्याने सुमारे एक हजार वर्षे कर्नाटकगोवा आणि ओरिसा याठिकाणी सत्ता गाजवूनही ते इतिहासात दुर्लक्षित राहिले.

त्रिलोचनला कदम घराण्याचा मूळ पुरूष मानला जातो. त्यांच्या उत्पत्तीचा संबंध कदंब वृक्षाशी लावला जातो. त्यामुळे कदंब कुळ म्हटले जाते. कदंबांची राजकीय कारकीर्द ही इ.स. ३५३ मध्ये मयुरवर्माने कर्नाटकातील उत्तर कनाडा जिल्ह्यातील बनवासी या ठिकाणी स्थापन केलेल्या राजधानीपासून होते. पल्लव दरबारात अपमान झाल्यानंतर कदंबाचे स्वतंत्र राज्य निर्माण केलेमयूरवर्मानंतर पुढे कंगवर्माभगीरथरघूकाकुस्थवर्माशांतीवर्माकृष्णवर्माकुमारवर्मा यासारखे पराक्रमी राजे होऊन गेले. या राजांनी पुढे हळशीउच्छंगी या स्वतंत्र राजधान्यातून बेळगांवखानापूरसंपगावसिरसीसावनूरशिमोगाहुबळी या परिसरावर राज्य केले. या दरम्यान कदंबांनी प्रथमच कन्नडला प्रशासकीय भाषेचा दर्जा दिला. इ. स. ५४३ मध्ये बदामीचा चालुक्य राजा पुलकेशीने कदंबाचा शेवटचा राजा कृष्णवर्मा दुसरा याचा पराभव करून राज्य जिंकले. तरी कर्नाटकातील बनवासीहनगलहळशींगेसांतलिगे येथे कदंबांची छोटी राज्ये १२ व्या शतकापर्यंत कायम होती. कदंब घराण्याची माहिती देणारा सर्वात मोठा संदर्भ कर्नाटकातील तालगुंड येथील शिलालेख असून अशाप्रकारचे अनेक शिलालेख सापडले आहेत.

कर्नाटकप्रमाणेच गोव्यातही कदंबांनी इ.स. १००७ ते १२३७ पर्यंत साम्राज्य गाजवले. षष्ठीदेव हा गोव्यातील कदंब वंशाचा संस्थापक असून त्यानंतर पुढे जयकेशीगुहल्लदेवपेर्माडी यासारखे राजे होऊन गेले. आज गोव्यात दिसणारी ग्रामव्यवस्था ही कदंबांनी दिलेली देणगी आहे. गोव्याची ग्रामदेवता सप्तकोटेश्वराची उभारणी कदंब राजांनी केली. याचाच पुढे छत्रपती शिवरायांनी जिर्णोद्धार केला. गोव्याच्या कदंबांचे आरमार भक्कम असून त्यांना कोकण चक्रवर्ती ही पदवी होती.

गोपिकापट्टण म्हणजे गोवा ही कदंबांची राजधानी असून या घराण्यात जयकेशीपेरमाडी यांच्या उज्वल कारकिर्दीबरोबरच कमलादेवीमहादेवीलक्ष्मीदेवी यासारख्या कतृर्त्ववान स्त्रियाही होऊन गेल्या. याच पेरमाडीच्या पत्नी कमलादेवींनी संपगाव तालुक्यातील देगावे (कर्नाटक) याठिकाणी इ. स. ११४७ मध्ये  कमलनारायण आणि महालक्ष्मीचे सुंदर असे बांधलेले आहे.

आपल्या कार्यकाळात कदंबांनी गोव्यामध्ये गद्यानाहोन्नूबेलेव्हाईजहगा यासारखी आपल्या नावानी नाणी पाडली होती. ज्यावर कमळ आणि सिंहाचे चित्र असून कदंबांनी सोन्याची नाणी पाडली होती हे विशेष आहे. गोव्याच्या अनेक भागात कदंबांचे शिलालेखताम्रपट सापडतात. गोव्याला वैभव प्राप्त करून देण्याचे काम कदंब राजांनी केल्यामुळेच तेथील बस वाहतुकीला कदंबा ट्रान्सपोर्ट हे नाव देऊन सरकारने या घराण्याचा गौरव केला आहे.

कर्नाटक आणि गोव्यानंतर कदंब घराण्याने ओरिसा राज्यातही प्राचीन काळापासून आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानुसार धर्मखेडीप्रतापदेव यासारख्या राजांनी ओरिसात कदंबांची सत्ता निर्माण केली. त्यानुसार पुढे पुरीअंगूलअथम्लीकमांडपा या परिसरात कदंबांची सत्ता होती. इंग्रजांच्या काळात ओरिसात कदंब जमीनदार म्हणून छोट्या छोट्या संस्थानात विभागला होता. या संस्थानांना तेथे १९ तोफांची सलामीचा मान होता. आजही तेथे कदंबांची मोठी जमीनदार घराणी आहेत.

खर तर कदंब म्हणजे कदम असून ते मूळचे सुर्यवंशीयमानव्य गोत्रीसिंह हे त्यांचे लांच्छनलाल रंगाचे निशाणझेंड्यावर अर्जुनाप्रमाणे वानर होते. कर्नाटकगोव्यानंतर कदम सर्वत्र विखुरले गेले त्यावेळी प्रसंगानुरूप त्यांना भिसेभोगकोकाटेराजगुरूनुसपुतेमहालेडोकेकोरडेबोबडेसातपुतेधुमाळ इत्यादी आडनावे मिळाली.

मध्ययुगीन कालखंडातही कदमांनी विविध सत्तामध्ये आपले नाव राखले. बहामनी कालखंडात (१४२१) फक्रुद्दीन निजामी यांनी 'कदमराव पदमरावनावाचे काव्य लिहून पद्मराव राजाविषयी माहिती दिली आहे. तर गोव्यांमध्ये कदंबाच्या अगोदर बहामनी सत्तेचे मुख्य सेनापती म्हणून खूप कदम हे मुख्य सेनापती होते. तर विजापूरच्या आदिलशाहीत बंकापूरच्या पर्वतराव कदमांनी आदिलशाही विरोधात केलेले बंड मोठे गाजलेले. छत्रपती शिवरायांच्या कालखंडात अनेक कदमांनी स्वराज्याची सेवा केली. राजांनी काढलेल्या कर्नाटक मोहिमेत तामिळनाडूचा बलगंडापूरमचा किल्ला जिंकल्यानंतर त्याची किल्लेदारी शहाजी कदम यांच्याकडे दिली होती. पुढे शिवरायांच्या निधनासमयी सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. अशावेळी राजगडावर राजांसोबत जी जाणकार मंडळी उपस्थित होती त्यात बाजी कदमांचा समावेश होता. याची बाजीने पुढे छत्रपती राजारामांना सावलीप्रमाणे सोबत राहून मोठी मदत केली.

स्वराज्यात दोन-तीन बाजी कदम होऊन गेले. पैकी इ. स. १७२० च्या संदर्भानुसार मोगलांच्यावतीने रावरंभा निंबाळकरांची जहागिरी सांभाळतांना पुणे आणि बारामतीची आठ वर्षे जहागिरी ही बाजी कदमांकडे होती. 

छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीला सुरूवात होताना अमृतराव कदमबांडे यांची फार मोठी मदत झाली होती. त्यामुळे शाहुंनी या घराण्याला विशेष सन्मान देत अमृतरावाचा पुतण्या मल्हाररावांचा विवाह आपली कन्या गजराबाईसोबत केला होता. कदमबांडे घराण्यात अमृतरावासोबत संताजीरघूजीकंठाजीगोजानी यांनी मोठी कामगिरी केली. कंठाजी कदमांची गुजरात प्रांतात मोठी दहशत होती.

या त्रिंबकरावांची मुलगी बडोद्याच्या पहिल्या सयाजीराव गायकवाडांना दिली होती. कदमबांडे घराण्याकडे नंदूरबाररनाळातोरखेडकोपर्लीठाणेधुळे या ठिकाणची जहागिरी होती. याचसोबत अहमदनगर जवळील आळकुटी याठिकाणीही कदमबांडेची मोठी गढी आहे.

छत्रपती शाहूंच्या काळात सापचे इंद्रोजी कदमांची कारकिर्द खूप गाजली. तुळजाभवानीचे मुख्य पुजारी म्हणून कदम कार्यरत असून याच घराण्यातील आनंदरावांची मुलगी महादजी शिंदेंना दिलेली होती. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचा कारभार याच कदमांनी चालविला. आजही तेथे डंकेवाले कदम आणि हत्तीवाले कदम यांच्या नावाने बाजार आहेत.

बुवाजी कदम हे गोपालदुर्गचे किल्लेदार होते. तर पानिपतात भगवंतराव व पर्वतराव कदम यांनी मोठी कामगिरी केली. फलटणजवळील गिरवीचे कदमांचे बडोद्याच्या गायकवाडाशी सोयरिक असून यादवराव तुकाजी कदमांना सयाजी गायकवाडांची मुलगी रडूबाई दिली होती तर बाळासाहेब कदम यांच्या मुलीचा विवाह बडोद्याच्या शिवाजीराव गायकवाडांसोबत झाला होता.

एकंदर प्राचीन कालखंडापासून कदम घराण्याचा इतिहास उज्वल असून या घराण्यातील एखाद्याने कुठेही गद्दारी केल्याचे इतिहासात नमूद नाही. आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कदम विखुरलेले असून कर्नाटकगोवाओरिसा या राज्यामध्ये कदम कुलाचा अभ्यास शिकविला जातो. मात्र चालुक्यपल्लववाकाटक यांना अभयदान देणाऱ्या कदंबांचा इतिहास महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात नाही. मल्हारराव होळकरांच्या झंेड्यातील लालरंग त्यांना कदमाप्रती आदरभाव म्हणून ठेवला होता. कर्नाटक सरकार बनवासी येथे दरवर्षी करोडो रूपये खर्चुन कदंब महोत्सव भरविते. २००५ साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एका नौसेनिक तळाचे नाव आय.एन.एस कदंबा ठेवले आहे. उडिया भाषेतील कदंब गाथातेलगूतील कदंबकुलकन्नडमधील कावेरी महात्म्य यासारख्या ग्रंथात या घराण्याचा इतिहास पहायला मिळतो. जॉर्ज मोरिससारख्या इंग्रजाने कदमकुळावर संशोधनात्मक लिखाण केलेल आहे. एक हजार वर्षे सत्तेत राहिलेल्या कदंब घराण्याचा इतिहास महाराष्ट्राला अनभिज्ञ असावा हे आश्चर्यकारक आहे.dr. satish kadam


No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...