विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 1 October 2022

महाराष्ट्रातील प्राचीन आणि ऐतिहासिक राजा ईल उर्फ श्रीपाल भाग 3

 

महाराष्ट्रातील प्राचीन आणि ऐतिहासिक राजा ईल उर्फ श्रीपाल
पोस्तसांभार ::सतीश राजगुरे




भाग 3
शेवटी दुल्हा राजा होऊ घातलेला रहेमान शहा इतिहासात "गाझी दुल्हा रहेमानशा पीर" म्हणून प्रसिद्ध झाला. नवरदेवाच्या वेशात युध्दात उतरल्यामुळे 'दुल्हा' हे उपपद रहेमान शहाच्या नावास लागले आहे. ईल राजालाही रहेमान शहाच्या मजार जवळ पुरण्यात आले, असे मुस्लिम इतिहासकार सांगतात.
राजा ईल आणि त्याने केलेले कार्य विदर्भात प्रसिद्ध आहे. त्याने निर्माण केलेली अनेक जैन मंदिरे पुढे एलिचपूरच्या राज्यकर्त्यांनी नष्ट केलीत. एवढंच नव्हे तर नवाबांच्या काळात त्यांनी बांधलेल्या परकोटात कितीतरी मंदिरातील मूर्ती आणि साहित्य नष्ट केले गेले, असे उल्लेख अनेक ऐतिहासिक ग्रंथांत आढळतात.
राजा ईल हे इतिहासातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व नक्कीच आहे. ईल राजा नसता तर विदर्भात जैन संस्कृतीचा विकास झाला नसता, असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे विदर्भात ज्या काही वैभवशाली जैन मंदिरांची निर्मिती/विकास झाली, त्यांच्याशी राजा ईलचा संबंध जोडला जातो. यामध्ये शिरपूर, मुक्तागिरी, एलोरा, भद्रावती, भांदक या स्थळांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
एकंदरीत अचलपूरच्या ईल राजाचा काळ म्हणजे विदर्भातील 'जैन संस्कृतीचे सुवर्णयुग' होते, असे म्हणता येईल!
तळटीपा

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...