विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 2 October 2022

छत्रपती संभाजीमहाराजांच्या दूधआई धाराऊ गाडे स्मारक - कापूरहोळ

 













छत्रपती संभाजीमहाराजांच्या दूधआई धाराऊ गाडे स्मारक - कापूरहोळ 
पोस्तसांभार ::सौरभ माधुरी हरिहर कुलकर्णी 
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कापूरहोळ या गावी छत्रपती संभाजीमहाराजांच्या दूधआई यांचे स्मारक आहे. कापूरहोळ हे गाव पुणे-बंगळुरू महामार्गावर आहे. पुण्यापासून ३५ कि.मी. अंतरावर आहे. नव्याने जीर्णोद्धार केलेले स्मारक आहे. स्मारक राजसदरेच्या प्रतिकृतीत उभारले आहे.
छ. शिवाजीमहाराजांचा विवाह इ.स. १६ मे १६४० वैशाख शुद्ध पंचमी शके ३५६२ रोजी फलटणकर नाईक-निंबाळकर घराण्यातील मुधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या कन्या सईबाई यांच्याशी झाला. सईबाई या अत्यंत रूपसंपन्न आणि गुणवान होत्या. कवींद्र परमानंदांनी आपल्या 'शिवभारत' या काव्यग्रंथात त्यांचे वर्णन केले आहे.
सती शीलवती रम्यरूपा चातिगुणोज्वला । अभजत् भूपती भार्या पवार कुलसंभवा ॥
पूर्वजन्म प्रणयिनी स इमां वरवर्णिनीम्|
लब्धा मुदमुपादत्त श्रीकृष्ण इव रुक्मिणीम् ॥
अशा या रूपवती-गुणवती पत्नीपासून छ. शिवाजी महाराजांना ४ अपत्ये झाली. पहिल्या तीन कन्या सखूबाई, राणूबाई आणि अंंबिकाबाई. चौथे शंभूराजे. कृष्णाजी अनंत सभासद यांनी यांची नोंद केली आहे. 'राजियांची स्त्री निंबाळकर यांची कन्या 'सईबाई केली होती ती प्रसूत होऊन पुत्र जाहला. संभाजी नाव ठेवले. या बाळंतपणातच सईबाईंस अशक्तपणा आला असावा. त्या बालसंभाजीराजांना अंगावरचे दूध मिळेनासे झाले. त्याकरिता जिजाऊसाहेबांनी कापूरहोळ येथील गाडे पाटलांच्या घराण्यातील 'धाराऊ' नावाच्या स्त्रीस बोलावून घेतले आणि तिच्या अंगावरील दुधाने बाल संभाजीराजांचे पोषण होऊ लागले. ही गोष्ट आपणास या घराण्यातील एका करिन्यातून समजते. त्यात म्हटले आहे की... धाकटे बायकोचा विस्तार बयाजी पाटील १ वडील त्याच्या पाठीचा अंतोजी प |१ त्याचे पाटील सयाजी प |१ याची आई धाराई आता तिला चेक लेक होता तेव्हा जिजाबा आऊसाहेब यांचा हुकूम जाला आणि दाई करून प्रतापगडास नेली. महाराज छत्रपती शिवाजीराजे यांचे श्रीस दद नव्हता म्हणीनी दाई केली आणि संभाजीराजे पासी दूध लाविले पाजीत असता राजे थोर जाले मग दूध हा खावची आसामी दिधली धाराई आवा तैनात वससाची दर साला होन २६ पावत होत तेव्हा धारावाचे पुत्र २ येकजण पणलियात सरनोबतची चाकरी करीत होता. त्याचे धाकटे भाऊ राजाजी नाईक सायेलेकीची (सुलेकीची) सेवेळामाची नायकी राजगडची करीत होते. याचे वडील बंधू अयाजी पाटील- कापूर वाहळेवर नादत होता.
साभार - डाॕ सदाशिव शिवदे सर
टीम - पुढची मोहीम

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...