मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Wednesday, 25 January 2023
जनकोजी शिंदे
जनकोजी शिंदे :
पानिपतच्या मोहिमेत पेशव्यांबरोबर असलेले जनकोजी शिंदे दत्ताजीच्या वीरमरणानंतर माघारी फिरले नाहीत, उलट क्रूरकर्म्या नजीबाविरुद्ध त्यांच्या मनात संतापाचा ज्वालामुखी धगधगत होता. अब्दालीबरोबर कुंजपुरा इथे (ऑगस्ट १७६०) झालेल्या चकमकीत नजिबाचा गुरु कुतुबशहा याचे मुंडके जमदाडाने कापून काढून आपला सुडाग्नी काहीअंशी शांत केला होता. याच कुतुबशहाने प्राण कंठाशी आलेल्या दत्ताजीवर अखेरचा वार केला होता.
पानिपतच्या युद्धाच्या शेवटच्या सत्रात शिंद्यानी नजीब विरुद्ध आक्रमण केले, . परंतु नजीबने शिंद्याच्या फौजेला यश मिळू दिले नाही. वयाच्या दहाव्या वर्षी राजगादीवर बसलेल्या जनकोजी शिंद्यांना पानिपतमध्ये (१४ जानेवारी १७६१ ) वयाच्या १६ व्या वर्षी पकडण्यात आले. पानिपतावर जेंव्हा विश्वासराव पडल्याची वार्ता पसरली, सर्व सैन्य घाबरून सैरावैरा पळू लागले तेंव्हा जनकोजी अन त्याचे काका तुकाजी ( महादजी शिद्यांचे सख्खे मोठे तर जयाप्पा - दत्ताजीचे सावत्र लहान भाऊ ) यांनी सदाशिवराव भाऊंच्या गोटाकडे त्यांना बळ देण्यासाठी कूच केले, यावेळी बर्खुरदार खानाने तोफगोळा लागून जायबंदी झालेल्या जनकोजी शिंद्यांना पकडले. काशीराजाने नन्तर त्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करून पाहिले, काही आर्थिक आमिषे दाखवली. पण याचा सुगावा नजीबास लागला. नजिबाने आपल्याला मारण्याआधी आपण जनकोजीस मारणे योग्य असा विचार करून बर्खुरदार खानाने जनकोजीस हाल हाल करून ठार मारले. याच दरम्यान ज्योतिबाराव शिंद्यांचे (दत्ताजींचे अखेरचे सख्खे बंधू ) कुंभेर येथे निधन झाले.
जनकोजीच्या नंतर अनेकांनी वारसा हक्काचा दावा केल्याने पेशव्यांनी ३ वर्षे शिंदेशाहीस नव्या राजाची राजमान्यता दिली नाही. २५ नोव्हेबर १७६३ ला कदराजी शिंद्यांना ( तुकाजी शिंद्यांचे पुत्र ) पेशव्यांनी शिंदेशाहीची सूत्रे दिली, पण त्यांनी ती नाकारली अन सरदार म्हणून राहणे पसंत केले. १० जुलै १७६४ ला मानाजीराव शिंद्यांची अखेर तख्तपोशी झाली अन शिंदेशाहीला नवा राजा मिळाला,ते जानेवारी १७६८ पर्यंत सिंहासनावर आरूढ होते
Subscribe to:
Post Comments (Atom)
मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!
मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...
.jpg)
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे --------------------------- ---------------------...
No comments:
Post a Comment