दे
वास धाकट्या पातीचे सहावे महाराज श्रीमंत नारायणराव पवार उर्फ दादासाहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!*
वास धाकट्या पातीचे सहावे महाराज श्रीमंत नारायणराव पवार उर्फ दादासाहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!*
देवास चे पाचवे महाराज श्रीमंत हैबतराव पवार यांच्या निधनासमयी नारायणराव ४ वर्षांचे होते.त्यांच्या जन्मानंतर १२ दिवसानींच त्यांच्या आईंचे निधन झाले होते.त्यांचे चुलतभाऊ जिवाजीराव यांनी नारायणरावांचा सांभाळ केला.
श्रीमंत नारायणरावांचा विवाह अक्कलकोटच्या राजकन्येशी झाला होता.
देवासच्या विकासात मोठे योगदान देणारे श्रीमंत नारायणराव पवार यांनी सन १८८० पासुन देवासचा राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली. श्रीमंत नारायणराव महाराजांनी देवासच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले त्यांनी विक्टोरिया हायस्कूलची व एका वाचनालयाची स्थापना केली ,हे हायस्कूल आज नारायणराव विद्या मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
देवास मध्ये पाणीपुरवठ्याची योजना आणली जी पुढे मल्हारराव महाराजांच्या कार्यकाळात पूर्ण झाली. देवास मध्ये म्युन्सीपालटीची स्थापना नारायणराव महाराजांनीच केली. पब्लिक लायब्ररीची स्थापना, लक्ष्मीपुरा ,दुर्गा पॅलेस, दुर्गा देवी मंदिर ,गव्हर्नमेंट हाऊस , मोती पॅलेस इत्यादींची स्थापना नारायणराव महाराजांच्या काळातच झाली.
श्रीमंत नारायणराव महाराजांनी दिनांक 8 एप्रिल 1881 रोजी तुळजापूरच्या भवानी माता मंदिरास ताम्रपटावर कालिका स्तोत्र भेट दिले , जे आजही तुळजापूर भवानी मातेच्या मंदिराच्या दक्षिण द्वारावर पहावयास मिळते.
प्रजाहीतकारी राजे श्रीमंत नारायणराव महाराजांची आज जयंती त्यानिमित्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !
महेश पवार
७३५०२८८९५३
No comments:
Post a Comment