लेखन :सतीश राजगुरे
वऱ्हाडातील म्हणजे आताच्या बुलढाणा जिल्ह्यातील 'चिखली' तालुक्यातील 'करवंड' हे गाव पूर्वी 'बावन्न बुरुजी करवंड' या नावाने ओळखले जात असे. पूर्वी या गावात इंगळे-देशमुख घराणे होते.
छत्रपती
शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले यांच्या पत्नी करवंड
येथील इंगळे घराण्यातील होत्या. त्यामुळे भोसले घराण्याचे करवंड येथील
इंगळे घराण्याशी जुने आणि जवळचे संबंध होते.
करवंड येथील पराक्रमी सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या कन्या गुणवंताबाई यांच्यासोबत शिवाजी महाराजांचा विवाह १५ एप्रिल १६५७ रोजी झाला. 'गुणवंताबाई राणीसाहेब' ह्या छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नी होत्या.
१५ एप्रिल १६५७ रोजी भोसल्यांशी सोयरिक होऊन गुणवंताबाई शिवरायांच्या पत्नी झाल्या, असा उल्लेख जेधे शकावलीमध्ये देखील आहे.
आपल्या
माहेरकडील इंगळे घराणे फुटून मोगलांकडे जाऊ नये, म्हणून जिजाऊसाहेबांनी
इंगळे घराण्यातील लेक सून म्हणून घरात आणली. त्यांची ही खेळी यशस्वी झाली.
कारण पुढे इंगळे यांचा जमाव किल्ले राजगडावर छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या
देखरेखीखाली राहिला.
No comments:
Post a Comment