विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 August 2023

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध भाग ५

 


मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध
भाग ५
राघोबादादा लाहोरात आले. शहराबाहेर असणाऱ्या शालीमार बागेत राघोबादादांचा मुक्काम होता. आदिनाबेग ने या विजयाच्या प्रीत्यर्थ मराठ्यांच्यावर १ लाख रुपये खर्च केले व प्रचंड मोठा दीपोत्सव साजरा केला. तैमुर आणि जहानखान चिनाब नदीच्या तटी पोहोचले. चिनाबचे पाणी थंड व गहिरे होते. त्यांना आपले सर्व मौल्यवान सामान टाकून पळ काढावा लागला. मराठ्यांच्या तुकडीने सर्व सामान जप्त केले. नावा घेवून तैमुरचे सैन्य पळाले. मराठ्याकडे पूल बांधण्या इतक्या नावा नव्हत्या. चिनाबच्या काठचे वजीराबादचे ठाणे मात्र मराठ्यांनी साफ लुटले आणि ताब्यात घेतले. तेथून दि.२१ एप्रिल च्या पत्रात मराठा सरदार हरी रघुनाथ लिहितो -
“ मुक्काम ऐरावती (रावितीर) नदीतीरी अब्दुस्समदखान सरहिंदेत होता. त्याचे पारिपत्य श्रीमंतांनी करून सरहिंद आणि दुआब दोनही तालुके आदिनाबेग मोगलाचे स्वाधीन खंडणी ठरवून केले. तदुत्तर जहानखान व अब्दालीचा पुत्र २०,००० फौजेनिशी लाहोरात होता. त्याजवर चालोन गेले. बिपाशा (व्यास) नदीतून सड्या फौजा मानाजी पायगुडे, गंगाधर बाजी भिवराव, गोपाळराव गणेश रवाना केले. त्यांनी जाऊन गाठ घातली. घाबर होऊन बुणगे, तोफखाना, फौज मागे टाकून सडा तीन चार हजारानिशी चिनाब नदी उतरून जीवंरक्षणासाठी पळाला. आपल्या फौजेने नदीपर्यंत पाठलाग करून फौज व तोफखाना लुटून घेतला. चिनाब नदीवर उपाय चालला नाही म्हणून भगवंते रक्षिला. एरवी श्रीमंतांचा प्रत्ताप विस्तार पावला. प्रांती आपली सलाबत भारी पडली. दक्षिणी फौज पूर्वी दिल्ली पलीकडे आली नव्हती ते चिनाब पर्यंत पोहोचली. चिनाबेस पाणी थोडके असते तरी अटके पर्यंत जाती. पुढे पूल बांधोन फौजा जाण्यास अडचण भारी पडेल. छावणी इकडे करावी लागेल. इतक्या दूर छावणी करीता नये. त्यात लोकही कष्टी करून लाहूर प्रांताचा बंदोबस्त करून श्रीमंत मागे फिरणार. याहीवरी भगवत सत्ता प्रमाण.”

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...