विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 August 2023

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध भाग ४

 


मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध
भाग ४
मार्च ५८ रोजी राघोबादादा आणि मल्हारबा सरहिंदेस पोचले. इथे आता निकराचे युद्ध जुंपले. मराठ्यांनी कडवी लढाई केली. त्यासोबत आला जाटाची शिख फौजही मराठांना सामील झाली. अब्दालीने केल्या सगळ्या अत्याचारांचा आणि कत्तलींचा मराठ्यांना बदल घ्यावयाचा होता. मराठ्यांना चेव चढला आणि त्यांनी जंगबाजखान आणि त्याची १०,००० फौज बुडविली. त्याच्या मदतीस आलेला अब्दुस्समदखान जबर जखमी होवून मराठ्यांच्या हाती सापडला. सरहिंदचे ठाणे शिखांनी हस्तगत केले. सरहिंदेस आदिनाबेग याने आता मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारले आणि सरहिंदचा अंमलदार झाला. हा मोठा खटपटी माणूस होता. त्याने ओळखले कि लाहोर अटक पावेतो प्रदेश काबीज करावयाचा हाच मोका म्हणून त्याने राघोबादादास व मराठ्यांना मदतीचा हात मागितला. त्याच्या मोबदल्यात तो दर दिवस चालीचे त्यांना एक लाख रुपये व बैठ्या मुक्कामाचे ५०,००० रुपये देऊ करीत होता. आदिनाबेगचा जावई ख्वाजा मिर्झा ह्याला त्याने दिल्लीहून फौज घेवून बोलावले आणि एकत्र फौज घेवून मराठ्यांच्या नेतृत्वाखाली लाहोरच्या दिशेने निघाला. मराठ्यांतर्फे सेनेचे नेतृत्व मानाजी पायगुडे करीत होते. मावळात लाल मातीत घुसळून तयार झालेला हा फाकडा मराठी गडी लाहोरच्या वेशीवर धडक द्यायला निघाला होता. कुठे मावळ आणि कुठे लाहोर ? मराठे लाहोरच्या किल्ल्याला वेध देऊ लागले तसे अब्दालीचा पुत्र तैमुरशाह आणि सेनापती जहानखान हे लढाईसाठी तयार होऊ लागले तसे समोर त्यांना मराठा आणि शीख सैन्य वाढताना दिसू लागले. त्यांना दहशत बसली आणि ते मौल्यावार सामान घेवून मोजक्या फौजेनिशी लाहोरहून अटकच्या दिशेने निघाले. लाहोरचा किल्ला पडला. मराठ्यांची एक तुकडी किल्ल्यात शिरली. किल्ल्यात पहिले मराठी पाऊल पडले. ते होते मानाजी पायगुडे यांचे. मराठ्यांची एक तुकडी तयमूरशाहच्या पाठीवर गेली.

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...