विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 28 March 2024

वसई वीर शिंदे घराण्यातील भाऊबंद🔥🔥

 


वसई वीर शिंदे घराण्यातील भाऊबंद🔥🔥
वसईच्या मोहिमेत सरदार राणोजीराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे घराण्यातील अनेक वीरांनी सहभाग घेतला यातील सरदार कर्णाजीराव शिंदे ( सेनासप्तहजारी कुडाळ कर) सरदार गुणाजी राव शिंदे(श्रीगोंदा कर वारीकर बहुतेक) सरदार संभाजीराव शिंदे सरदारकुसाजीराव शिंदे(श्री गोंदीकर बहुतेक वारीकर) सरदार होनाजीराव शिंदे संभाजीराव शिंदे या शिंदे बंधूंनी मोठा पराक्रम गाजवला याबद्दल अस्सल नोंदी उपलब्ध आहेत यातील कुसाजीराव व गुणाजीराव हे दोन्हीही बंधू श्रीगोंदा येथील सरदार राणोजी बाबांच्या भाऊबंद आहेत पुढे सरदार जयाजीराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या इतिहासात विविध मोहीम तून दोन्ही भाऊ पराक्रम करताना दिसतात. याबद्दल नोंद व उपलब्ध पत्र हे वसई मोहीम मधील संदर्भ आढळतात तसेच राणोजी राव शिंदे नंतर जयाजीराव शिंदे च्या हुजुरात दोन्ही भाऊ गुणाजीराव व कुसाजीराव शिंदे दिसून येतात
पे. स.
प. या
वसईवरील दुसरा हल्ला ( २८ जून १७३७).
वसईवरील पहिला हल्छा फसल्यानतर शकराजीपंत, गंगाजी नाईक, मोराजी शिंदे, यशवंतराव बाळाजीराव, कर्णाजी शिंदे वगैरे लोकांनीं सुमारें एक महिन्यानें भर आषाढाच्या मुमळ धारेंत फिरून एकदां वसई वर डोकें फोडण्याचे ठरविले. त्याप्रमाणें २८ जून रोजीं ४००० मराठे शिड्या सामान तयार करून अचानक बहाद्दरपुऱ्याहून कोटास गेले व उत्तरेच्या बाजूस घोणसाळियाच्या व आरमाझिमच्या मध्ये त्यांनीं तटास शिड्या लावण्याचा प्रयत्न केला. परंतु शिड्या चिखलांत रुतल्या. चांगल्या लागेनात. आणि त्यांतच शत्रु सावध होऊन त्यानें वरून अमा कांहीं आगीचा जबरदस्त मार केला कीं शेवटीं त्याखालीं कचकरून मराठयांना पळून जावें लागलें. ही धुमाळी प्रहर अधर्धा प्रहरच झाली पण तेवढयांत मराठ्यांचे फार माणूस दुखावलें व ठार पडले. त्यांत गुणाजीराव शिंदे, खंडोजी बागराव, दादाजी नाईक भंडारी व इतर पुष्कळ नामांकित लोक खपले लढाईनंतर शत्रूमच मराठ्यांचे ३३ मुडदे सांपडले; यावरून खुद्द मराठयांनीं काढून नेलेले मुडदे किती तरी असतील ! शत्रुपक्षाचे माणूम मात्र त्यावेळीं एकहि दगावलें नाहीं असें पोर्तुगीज इतिहासकार म्हणतात
_______________
सदर पत्रातून फलटणचे नाईक निंबाळकर व शिंदे बंधू यांनी सरकारतील तनखा मिळावी म्हणून सरदार जयाजीराव शिंदे यांनी पेशव्यांच्या कामवीसदार रामाजीपंत यांनी पत्र लिहिले आहे तसेच आपण दिलेले पत्र असून
ले. ११७ ।
(श. १६७५ चैत्र व. १० (ताा २८-४-१७५३
॥ श्री ॥ पै। छ २५ जमादिलाखर प्रहर दिवस.
राजश्री रामाजीपंत भाऊ गोसावी यांसि
श्री.
छ अखंडित लक्ष्‌मी अलंकृत राजमान्य स्ना जयाजी शिंदे दंडवत विनंती उपरि येथील स्वकीय कुशल जाणोन कुशल लेखन करणें, विशेष. राजश्री कुसाजी शिंदे* शिलेदार हुजुरात यांचे भाऊ गुणाजी शिंदे व राजश्री वणगोजी निवाळकर व आनंदराव निंबाळकर शिलेदार निशा तुकोजी शिंदे व बंदुभाई व मोहदीन ऐसे समागमें आले आहेत. यांचे हिशेब करून द्यावे लागतात. तर सदई असाम्यांचे हिशेब दफ्तरचे लेहून पाठवावे म्हणजे समजार्वास करून वाटे लावून देऊं. आम्ही आजच दोन प्रहरां श्रीगोंदेंयास आलों. कळले पाहिजे. छ २३ जमादिलाखर बहुत काय लिहिणें हे विनंती.
ज्योतन्चिरणी तत्पर राणुजी सुत जयाजी शिंदे निरंतर
मोर्तब सूद
---------------------
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...