विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 28 March 2024

मराठेशाहीतील हत्ती पुराण

 


मराठेशाहीतील हत्ती पुराण 
भाग एक🚩
🚩लेखन :संतोष झिपरे
अफजल खान स्वारी मराठ्यांना हत्ती 95 सापडेल
साल्हेर च्या घनघर लढाईत हुसेन खान मायनी पठाणच्या विरोधात सेनापती हंबीरराव मोहिते यांनी 12 हत्ती हस्तगत केले
चंदीच्या लढाईत शेरखानविरुद्धच्या लढाईत छत्रपती शिवरायांनी 12 हत्ती हस्तगत केले
छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात रायगड किल्ल्याला वेढा घालून बसलेल्या झुल्फिकार खानावर संताजी घोरपड यांनी हल्ला करून पाच हस्तगत केली
1724 श्रीनिवास पंतप्रधनिधी यांनी मिरज मिरजकर दिलेरखानाच्या पराभव करून त्याच्याकडून 12 हत्ती हस्तगत केले
1729 ला थोरल्या बाजीराव पेशव्याने माळवातील बुरानपुर येथील मुघल सरदार बंगश पराभव केला त्यात 12 हत्ती हस्तगत केली. याच लढाईची चिमाजी अप्पा धन्य 18 हत्ती हस्तगत केले
डंभईच्या लढाईत पेशव्यांनी 17 हत्ती हस्तगत केले
1737 बाजीराव बाजीराव पेशव्याने निजामास भोपाळ मध्ये कोंडीस पकडले त्यास कुमक करण्यासाठी म्हणून नासिरजंग निघाला व बुरानपुर च्या वाटेत चिमाजी आप्पांनी हल्ला केला त्या लढाईत नामाजी शिंदेंचा नातू ना श्रीगोंदा सोबत होता त्यावेळी त्याच्याकडून तीन हत्तीची मजा पण असते
1751 मलटणच्या लढाईत निजाम व मराठीत युद्ध होऊन चार हत्ती हस्तगत झाले
1759 स*** कडप्पाचे लढाईत मराठ्यांनी अब्दुल मजीद खान याचे नऊ हत्ती हस्तगत केले
१७ 59 च्या उदगीरच्या लढाईत पेशवा भाऊसाहेबांनी सात हत्ती हस्तगत केले
1765 राक्षस भुवन च्या मराठ्यांनी 22 हत्ती हस्तगत केले
1781 82 12 बाराभाईच्या लढाईत चंद्राराव पवार कासोपंत दातार यांनी बाराभाईंच्या वतीने लढाई केली यावेळी पेशव्यांचे सरदार गणेशपंत बेहेर यांनी दोन हत्ती हस्तगत केले
1790 मिर्झा इस्माईल बेग यांचा शी सरदार महादजी शिंदे पाटील बाबा यांच्याशी लढाई झाली त्यात मराठ्यांचे विजयी झाला व शिंदेने 15 हत्ती हस्तगत केले तर काशीराव होळकर यांनी ३ शिवाजी विठ्ठल ३ हत्ती हस्तगत केले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे
____________
दयाबहादुराच्या स्वारीच्या वेळीं चिमाजी आप्पाना मोठीच लूट मिळाली होती. त्यात हत्तीहि पुष्कळ होते. त्यापैकी एक 'गजराज' नावाचा होता. तो पवाराकडे वाटणात गेला, तो कसैहि करून स्वतःकडे मिळवावा असे बाजीरावसाहेबानी चिमाजीआप्पास लिहिले "हत्ती कोणास न देणे" गजरज "हत्ती पवारापासून तजबिजेने बसावयास अगर निशाणास म्हणून अगत्य मागून घेणे आम्ही लिहिनेसे कलो न देणे ! मोबदला पाहिजे तरी त्यास येकादा मेलभून देणें" (पे. द. भा. ९, प न ५३)
१७२४ साली सरदार कंठाजी कदम व त्याचा सरदार भाऊ रघोजी कदम याना पेशव्याकडे अनुकूल करून घेण्याचे प्रयत्न सुभेदार पिलाजी जाधवामार्फत लावले त्या वेळीं कदमाच्या सहाय्याची पेशब्यास फारच निकड होती. 'सरजामाची बोली जे तुम्ही मान्य केली असेल तेणेप्रमाणे चालवू परतु या सभ्यात पाचसातशे ज फौज येतील तेवच्यानिशी यावे परतु सरदार कंठाजी कदम आलियाने 'सर्व सरजाम देण्यास बाजीराव तयार झाला, तरी एक विशिष्ट हत्ती होता तो द्यावयास मात्र तयार होना. त्याबाबत ब्ररीच घासाघीस झाली बाजीरावाच्या मनात परस्पर निजामाकडूनच एखाद्या उत्तम हत्ती सरदार कंठाजी कदमास द्यावा असे होतें! पण समजूत होईना, तेव्हा अखेर बाजीरावाने हताश होऊन लिहिलें कीं, "राजश्री कठाजी कदम येतील त्यास हत्ती नबावापासूनच देऊ म्हणजे हत्ती दिले म्हणून दिलासा होतो व लौकि कहि होतो पण है तुमचे चित्तास येत नसेल रघोजीस तोच हत्ती पाहिजे असला तर अपाय काय। जे तुम्ही बोलिले तें खरें न करार्वे तरी काय !" राक्षसभुवनाच्या लढार्थीत राघोबाचा हत्ती निजामाने गर्दी करून बळ- वून नेला, त्या वेळीं तो सोडवून आणण्यासाठी एकदा म्हणतील तें बक्षीस माधवरावाने कबूल केले. त्या वेळीं शितोळ्याने राघोबादादाचा हत्ती परत वळवून आणतों, पण त्यासाठी 'बसता' हत्ती दिला पाहिजे, अशी अट घातली ! 'बसता' हत्ती म्हणजे पेशव्याच्या खास स्वारीचा हत्ती ! अखेर शितोळ्याने पराक्रमाची शर्थ करून राघोबाचा हत्ती परत आणला व माधवरावानेहि त्यास आपल्या स्वारीचा 'रामबाण' हत्ती
बक्षीस दिला। टिपूवरील मोहिमेत पेशव्याचे सेनापति हरिपत फडके व निजाम याची ओके ठिकाणी समारसमाने भेट झाली, त्या वेळीं पेशब्या- तर्फे निज मास अक इत्ती नजर करण्यात आला पण त्या वेळीं 'इणवत गज' हाच इत्ती पाहिजे असा इट्ट निजामाने कसा धरला होता तो प्रसग वाचनीय आहे.
हत्ती है' अशी दुर्लम चीज असल्यामुळे ती गमावणें, शत्रूने लुटून
नेणे किंवा अकस्मात् अपघाताने मरणे या गोष्टी अनिष्टसूचक अपशकुना-
सारख्या समजल्या जात. अफझलखानाचे अदाहरण याबाबत प्रसिद्धच
आहे. तो मुहूर्ताने विजापुराबाहेर डेरेदाखल झाला आणि त्याच वेळीं
त्याचा निशाणाचा फत्तेलष्कर हत्ती वारला ! हा मोठाच अप-
शकून सुरुवातीसच घडला. अज्ञानदास शाहिरानेहि त्याचा असा उल्लेख पोवाडा मधून
केला आहे.
"खान कटकबद केला । कोटाबाहेर डेरा दिला। मोठा अप
शकून झाला । फत्त्यालस्करा हत्ती मेला। खचर गेली बाच्छायाला। बिनीचा
हत्ती पाठविला ! ।।”
थोरल्या शाहूमहाराजाचा "मदारी नावाचा नामााकत
हत्ती अपघाताने मेला तेव्हा शाहूमहाजाना धसकाच बसला व ही आपल्या
अतकाळाची नोटीसच असे ते समजले
. "मदारी बहुत चागला होता
सर्वकाळ मस्ती राहावी परतु कडवे होभू नये, माणूस किंवा जनावर मारू
नये, जैसे दौलतींतील केवळ रत्नच होतें. तो हत्ती रात्रीस सुटून बाहेर
जाऊन शनवारात विहीर होती त्यात माहूत व लोक मागे (लागले)
असता पडला आणि निवर्तला. त्यामुळे महाराज बहुत खिन्न जाले आणि
बोलिले जे याभुपरी आमचा काळविपर्यास होल. अडुसष्ट होऊन
सत्तरींचा सुमार जाला, पोर्टी पुत्र नाही, श्रीपतराव प्रतिनिधि आणि
मदारी हत्ती आपल्या राज्याचीं रत्नै गेलीं ! बाजीराव वगैरे सरकारकून
गेले !! असा विचार करून खिन्न होऊन वैराग्य येथून सातारा सोडून
बनवासवाडीस जाऊन राहिले!" (चिटणीस, पृ. १२३ व १२५).
शिंद्याजवळ" जन्हेरगज नावाचा
एक नामाकित इत्ती होता, दत्ताजी
शिंदे ज्या लढार्जीत ठार पडला त्या लढाईत शिंद्याची दाणादाण
झाले व सर्वं बुनगे खजाना रोहिले दुराण्यानी लुटून नेले. "
तळावर बुनगे व हत्ती भरी होते त्याजवर येथून मिठी वसली. ते समर्थी
हत्तीवरील माहूत अश्रू आले होते. त्यानी क्षणभर फोर्जेत रणदल करूनमारामार केली. तो माहूत गोळी लागून खाली येताच हत्ती मोकळे झाले ते त्याजकडे सहजच हस्तगत जाले. त्यात एक बडेमहात याने "जव्हेरगज "म्हणोन "बरा नामी हत्ती जलद व मर्द होता तो दोन कोसपर्यंत काढलाहोता पण अखेर तोहि शत्रूने वळवून नेलाच. लक्ष्मीनारायणाने पाचखाशानिशी दोन को सपर्यंत "जव्हेरगज निघाला होता तेथपर्यंत पाठलागकेला. तो तैयेदि दुराणीची मिठी बसली. मराठे हत्ती सोडून चालले.बडे माहूत याने पुष्कळ लोकाना सांगन पाहिले की 'यारहो, तुम्ही दम खा हा वेळपर्यंत थ
पर्यंत हसी आणला. आता निमावूनन्या परतु 'मराठे मनुष्य पळू लागल्यावर कोणाची और नाहीशी होते ।राने सावळे सकटने तरी तेवढ्याने शादास बाघले असता शाहिघेवून बारा कोस जातील तेथे हत्ती जिन्नस काय ? शेवटी बडेखाम्हणाला, "तुम्ही दम खात नाही तर आता माझा तरी तमाशा पहा.असे म्हणोन माघारा फौजेत लटोन दुराणीची फौज होती त्यात हत्तीचालवून क्षणभर भारामारी केली पण अखेर त्यानी भाले लावून बडे माहूत
पाडाव करून नेला !" हाच हत्ती पुढे पानिपतच्या लढाईनंतर झालेल्या लढाईत शिंद्याची हत्ती परत लुटीत मिळाला " त्या दिवशी शिंदेयाचा आनंद कोठवर वर्णावा?" असे बखरकाराने अभिमानाने लिहून ठेवले आहे ।
लढायात शत्रूनेच आपले हत्ती छुटून नेले, तर ती नाज
निलाजाचीगोष्ट, परतु अरवी अशी खोट बसू नये म्हणून शक् ती दक्षता घेण्यातये. एकदा कर्नाटक मोहीम ात तिकडील कडक हवा बाधूनच पेशव्याचे १५॥ १६ हती मेले । त्याचा पत्रक सदाशिव पुरदरे लिहिती,"कि हवा फारच जहाल, लष्करचे हत्ती १५॥ १६ मेले. हत्ती मेले,घोडे मरतात, महागाई मोठी, असा प्रकार आहे" (राजवाडेसड १४, पत्र न. ७५)
हची हा अफाट ताकदीचा प्राणी असला, तरी सतत चालीला किंवा मोठ्या मजलीना तो जात नाही, .

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...