विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 28 March 2024

कर्नाटकांतील मोहीम

 कर्नाटकांतील मोहीम

लेखन :संतोष झिपरे



दक्षिणियांची पातशाही दक्षिणीयांचे हाती राहे
!!छत्रपती शिवाजी महाराज व कुतुबशहा भेट!!
कुतुबशहाच्या प्रदेशात गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्व सैन्यासह अशी सक्त ताकीद देऊन ठेविली होती
की, 'कुतुबाशाही राज्याच्या सरहद्दीत पाय ठेवालवर त्या प्रातातील नये जे जेथ मुकाम होईल तेथे दाणावरण, लकूडफाटे
बगेरे लागणारा सगळा माल खरेदीने विकत घ्यावा रयतेच्या एका काडी-
सहि स्पर्श करु नये ही हुकूम कोणी लुटाफार केल्यास त्याला कडक
शिक्षा होईल' ह्या हुकुमाकडे दुर्लक्षित करून कोणी कुतुबशहाच्या रयनेस त्रास
दिला असता त्याच्ण हातानी वाटे किवा सबद हात तोडावा, व गुन्हा फारच
मोठा असल्यास त्याचा शिरच्छद करावा असे करू लागत्यामुळे सर्व सैन्यास
धाक लागून कुतुबशहाच्या रयतेम यक्तिचित्हि उपसर्ग लागेनासे झाले ही
इकीगत कुतुबशहाच्या कानी जाऊन त्यास मोठे समाधान वाटलें
_______________
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
______________
छत्रपती शिवाजी महाराजाची स्वारी भागानगर जवळ आल्याचे कळले तेव्हा त्याना सामोरे जाण्यासाठी कुतुबशहा तान्हाशहा यांनी आपले वजीर मादण्णा व भाऊ आकण्णा यास व इतर मातबर अमीर उमरावस मोठ्या लवाजम्यानिशीं नगराबाहेर कित्येक मैलपर्यंत सामोरें पाठविले त्यानीं महाराजास वाजतगाजत नगरापाशीं आणिलें. तेथे त्याच्या सगळ्या सैन्यानें तळ दिला दुसरे दिवशीं छत्रपती शिवाजी महाराज व कुतुबशहाची मुलाखत
घण्याचे ठरले' ह्या भेटीस जाण्याच्या वेळी महाराजानीं आपल्या निवडक
लोकास मोठे उंची पोषाख दिले त्याना मोत्याचे तुरे, सोन्याची कड़ीं, नवीं झगझगीत चिलखते वगैरे लष्करी जामानिमा देऊन त्यास मोठ्या पिढीजाद उमरावाप्रमाणें सजविले त्याचे हत्तीघोडेहि बहुमोल अलंकारादिकानी रागा- रिले ह्याप्रमाणे एकाद्या बादशहास शोभेशी मोठ्या थाटाची स्वारी तयार कन्न महाराजानी पन्नास हजार सैन्यानिशी नगरप्रवेश केला तिकडे कुतुबशहानेहि सर्व नगर गुगारावयाम लावून गुढ्या , तोरणे व पताका जिकडेतिकडे उभारायास व वाद्ये वाजवावयास सागितले नगरातील एकदर लोकाना छत्रपती शिवाजी महाराजास व त्याच्या एकाहून एक शूर, बलाढ्य व पराक्रमी सरदारास पाहण्याची अत्यत उंत्कटा वाटून सर्व रस्ते लोकाच्या गर्दीन अगदी भरून गेले ज्यान। उत्तरेकडील व दक्षिणेतील पातशहातीस हतवीर्य केले, ज्यानीं अदिल- शहाच्या दरबारास विलाप करावयास लाविले, ज्यानी दिल्ली दरबारच्या अमीर- उमरावास व खुद्द मोगल बादशहास घाबरवून सोडलें, ते महा प्रतापी वीर छत्रपती शिवाजी महाराज डोळनी पाहून नागरिकाच्या हृदयात धाक व कौतुक ह्या वृत्ति उद्भवणे स्वाभाविक होते सगळ्याचे डोळे अथात् छत्रपती शिवाजी महाराजाकडे लागले होते त्याच्या सभोवती त्याचे मंत्री व सरदार होते ते दृष्टीस पडले ह्मणजे प्रेक्षकजन " शिवछत्रपतीचा सदा विजय असो ! " असे शब्द दीर्घ स्वराने उच्चारीत रस्त्यातील घराच्या गच्यावरून वगैरे प्रजा सोन्या रुप्याच्या पुष्पाची वृष्टि होऊं लागली मधून मधून सुवासिनी बाया पुढे येऊन त्यास आरत्या ओवाळीत व पुरुष मंडळी येऊन त्यास पुष्पहारानी मडित करीत छत्रपती शिवाजी महाराज ह्या सत्काराने परम संतोष पावून आपल्या दोन्ही हाताने सोन्या रुप्याची नाणी मुठीनीं रस्त्याच्या दोन्ही बाजूंस उधळीत चालले जागो जाग सुवासिनी बायास व गृहस्थास ते वस्त्राभरणें नजर करीत गेले. हिंदू प्रजा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजरा करण्यासाठी नतमस्तक होऊ लागले महाराजानी त्या दिवशी नगरातील एकदर गोरगरीब व फकीर यास मुबलक खैरात केलीकेली. छत्रपती शिवाजी महाराज व कुतुबशहाची
ही मुलाखत होण्याची जागा दादमहालावर ठरून तेथे बादशहानें बैठकीची वगैरे सुदर व्यवस्था करविली होती ह्या महालाजवळ महाराजाची स्वारी पोचल्यावर आपला सगळा लवाजमा खालीं जय्यत उभा ठेवून महाराज स्वत कांहीं
कारभा-यानिशी कुतुबशहाच्या महालात गेले. बादशहा माडी उतरून खालीं येऊं______________
तळटीप:-१ जेध्याच्या शकावलींत ह्या भेटीची तारीख सन १६७७ चा मार्च महिना अशी दिली आहे
______________
लागला, त्यास त्यानी अर्से सागून पाठविलें कीं, आपण महालाखालीं येण्याची तसदी घेऊं नये वर गेल्यावर उभयतानी एकमेकास क्षेमालिगन दिलें व ते एकासनी बसले वजीर मादण्णा व आकण्णा हे जवळ बसले इतर सारे अमीर उमराव उभेच राहिले महाराजाबरोबर आलेले कारभारी हंवीरराव सरनोबत, रघुनाथ- पत, निराजीपंत, दत्तोपत वाकनीस व बाळाजी आवजी चिटणीसे एवढ्यास मात्र बसावयास सागितले कुतुबशहाच्या जनानखान्यातल्या बायाना महाराजास पाहण्याची उत्कंठा लागली असल्या कारणाने दरबाराच्या सभोवतालील खिडक्यास जाळ्या लावून त्यातून त्या त्याजकडे मोठ्या कौतुकाने टकमक पाहत होत्या नंतर काहीं वेळ बादशहाचे व महाराजाचे मोठ्या स्नेहभावाचे भाषण झालें बादशहाने महाराजाबरोबर आलेल्या एकदर सरदाराच्या भेटी घेतल्या व त्याचा यथोचित सन्मान केला त्याच्या सैन्याची शिस्त व वस्त्रालकार पाहून बादशहा फार खुष झाला मग त्यास व त्याच्या सगळ्या लवाजम्यास विडे व अत्तरगुलाब दिले महाराजास व त्याच्या मुख्य कारभायास व सरदारास बहुमोल जवाहीर, शिरपाव, हत्ती व घोडे बहुमानपुरस्मर नजर केले ह्या वेळी बादशहाने आपल्या हाताने महाराजाच्या अगास अत्तर लाविले व विडे दिले, आणि महाराज जावयास निघाले तेव्हा त्यास पोचवीत माडीवरून जिन्याच्या तळापर्यत तो खखाली आला ह्याप्रमाणे सुमारे प्रहरभर दादमहालात राहून बादशहाचा अतिप्रेमाचा आदरोपचार अनुभवून महाराज आपल्या लोकासह परत आपल्या मुक्कामासाठी तयार केलेल्या वाड्यात गेले वाटेने जाताना त्यानी पुन रस्त्यातील गोरगरिबास द्रव्यदान केले
ह्याप्रमाणें छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशहाच्या आदरातिथ्याने पूर्ण सतोष पावून दादमहालातून परत गेल्यावर त्या शहाचें चित्त अमळ स्वस्थ झाले. अफझुल खानासारख्या बलाढ्य सरदारास ज्याने एकट्याने गारद केला, शास्ताखानाची कडे- कोट बंदोबस्ताने आपल्या जनानखान्यात निजला असता ज्याने त्याच्यावर झडप घातली, औरगजेबासारख्या अतिप्रबळ बादशहाच्या भर दरबारात सभोवतालीं मोठे खंदे योद्धे नागव्या तरवारी घेऊन उभे राहिले असता ज्याने त्या बादशहाचा धिक्कार करण्यास मागेपुढे पाहिलें नाहीं, ज्याने सुरतेसारखी मातबर शहरे बिनहरकत लुटून फस्त केलीं, तो महावीर त्या निर्भय व ऐटीत
______________
तळटीप:-- सभासद महाराजाबरोबर दादमहालात गेलेल्या कारभा-यापैकी सोमजी नाईक, बसनागार व जनार्दनपत याची नार्वे आणखी देतो
_______________
कर्नाटकांतील मोहीम
आरामात आजन्म निमग्न असलेल्या शहाच्या मुलाखतीस आला असता त्याच्या मनाला केवढा धाक वाटला असावा हे काहीं येथे सागावयास नको. तरी ह्या भेटीच्या अतीं त्याची अशी खात्री झाली की,छत्रपती शिवाजीमहाराज खऱ्या दिलाच्या मनुष्याशी खरेपणाने वागणारे असून आपल्याशी स्नेहसंबंध जोडावा अशी त्याची वास्तविक इच्छा आहे महाराजाचा जो वकील त्याच्या दरबारी होता त्याने आपणास फसविलें नाहीं व्ह्याबद्दल त्याने त्याला चागलें पारि- तोषिक दिलें
लेख व माहिती संकलित अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...