विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 28 March 2024

🔥🔥 छत्रपती शिवाजी महाराजांची वसतिस्थाने🔥🔥

 

🔥🔥 छत्रपती
शिवाजी महाराजांची वसतिस्थाने🔥
🔥लेखन :संतोष झिपरे

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीच्या किल्ल्यावर झाला व माहुलीच्या वेढ्यानंतर मोगलांशी तह झाला तेव्हा शिवनेरीचा किल्ला राजश्री शहाजीराजे भोसलेने मोगलाच्या ताब्यात दिला आणि यावेळी किंवा या वेळेपर्यंत शहाजीराजेच्या कुंटुंबातील मडळी शिवनेरीला राहत होती असा उल्लेख पादशाहानाम्यात आहे यावरून राजमाता व बाल शिवबा शिवाजी याचे राहणे या सहा वर्षांत शिवनेरीच्या किल्ल्यांत होते-द. प. आ
_____________
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा २०२४
_______________
यानतर शहाजीराजेच्या ताब्यांतून शिवनेरीचा किल्ला गेला व शहाजी विजापूरकराचा नोकर बनला ; तेव्हा त्यांना पुणे प्रांताचा मोकासा मिळाला व त्यापैकी कर्यान मावळाचा पोट मोकासा शिवाजीच्या नावाने करण्यात आला(खंड १८, पृ. ४४) शिवाय मावळचा काही भाग जहागिरीदाखल मिळाला :त्यात खेडे बारे शहाजीराजेच्या ताब्यात आले. यामुळे राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी यांना कसबे खेडे बारे येथे शहाजीराजेच्या मसलतातून ठेवण्यांत आले तेव्हा ते बापूजी मुदगल नन्हेकर याच्या वाड्यात रहात होते(पुरंदरे दे. भा. ३ पू. १३०) पुढे यांच्याकरितां तेथे स्वतंत्र वाडा बांधण्याचे
ठरले; तेव्हां कसब्यांतील कांही वाण्यांची व कुळांची घरें ऊठवावी लागली व याकुळांना वसाहतीला जागा द्यावयाची होती म्हणून कसब्याच्या शिवारांत कांही अंतरावर नवी पेठ वसविण्यात आली; व त्या पेठचे नाव 'शिवापूर' असे ठेवण्यांतआले. बाल शिवाजीच्या नांवे ही जी शिवारपूरची पेठ वसविण्यांत आली तो हीच...
तेथे राहाणाऱ्यांना बारा वर्षे पर्यंत अनेक प्रकारच्या सवलती दिल्या होत्या. यामुळे तेथे वस्ति वाढ झाली.
अशा प्रकारे राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी यांची वास्तव्य स. १६३७ पासून
काहीं दिवस कसबे खेड येथे झाली असता सरलष्कर शहाजीराजेच्या कर्नाटकच्या स्वारीत गुतला होता, त्या परिसरात तेथे बंगळूरचा किल्ला जहागिर मिळाला व नंतर तो १६३९ मध्ये देशी आला व तेव्हा परत तो बगळूरास गेला, नतर राजमाता जिजाऊ साहेब व बाल शिवाजी ही मंडळी त्याच्याबरोबर गेली होती (शि. भा. अ ९ श्लो. ६०)यानंतर बाल शिवाजीच्या बाराव्या वर्षी म्हणजे अि. स. १६४१ मध्ये पुण्याकडील भागाची जहागीर बालशिवाजी महाराजांच्याच्या नावे करण्यात आली व तो आईसह बगंळूराहून महाराष्ट्र देशी आला. तेव्हा त्याचे राहणे कसबे खेड येथे होते व या नतर शिवाजीच्या साठी त्याचा वाडे पुण्यात बांधण्यास सुरवात झाली तो म्हणजे लाल महाल(पे. द. भा. २२ ले. २९२). नतर स. १६४४ मध्ये शहाजी महाराष्ट्र देशी आला होता पुढील काळात त्याच्यावर
विजापूर दरबारची गैरमर्जी झाली; (प. सं. ले २४९८); परतु त्याच्यावरील आरोप खोटा ठरून आदिलशाही कडून फर्जंद हे किताब देऊन सरलष्कर शहाजीराजेची रवानगी पुनः कर्नाटकात झाली. पुढे शिवापूर वसविल्यापासून१०व्या वर्षी म्हणजे . स १६४६ मध्ये शहाजीराजेच्या वतीने खेडेबारे तर्फेवर बाल शिवाजी महाराजांच्या नावानें दिलेले हुकूम सापडतात यावेळी शहाजीराजे कर्नाटकात स्वारीवर गुतला असल्या कारणानें पूर्ण व खेडे बारे येथील व्यवस्था लावण्याचे काम राजमाता जिजाऊ व बाल शिवाजीकड होते; व या सुमारास त्याने कोंडाण्याचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला पुढे शहाजीराजेची कैदेतून सुटका करण्यासाठी शिवाजीराजेला कोंडाणा व त्याबरोबर खेडेबारे व शिरवळ येथील ठाणी देखीलविजापूरकरांच्या ताब्यांत द्यावी लागली (पुरं. द भा. ३, पृ. १३१) तेव्हांपासूनशिवाजी राजे यांची वस्ति खंड कसब्यांतून हालून पुण्यास गेली.
_____________
राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य:- संतोष झिपरे
_______________
. स. १६४९ ते १६५३ पर्यंत चार पांच वर्षे शहाजीराजे व थोरले संभाजीराजे देशी पुर्ण ते विजापूर भागांत होते. अर्थात मोहीम वर होते अर्थात् तेव्हां

🔥🔥 छत्रपती
शिवाजी महाराजांची वसतिस्थाने🔥🔥
पुणे, सुपा व इंदापूर जहागिरी व्यवस्था शिवाजीराजे हा आपले वडील शहाजीच्या तर्फे चा व्यवस्थापक हे नातें . स. १६५५पर्यंत टिकले. त्यानतर राजश्री शिवाजी महाराजांच्या स्वतंत्र हालचाली सुरू झाल्या. त्यासुमारास महाराजांचे ठाणे पुण्याहून पुरंदर किल्ल्यावर नेण्यांत आले. स. १६५४ च्या ऑगस्ट नतर घडली य;परंतु नंतर म्हणजे कोणत्या महिन्यांत हे सांगण्यास साधन नाही. पुढे . स.१६५७ मध्ये महाराजांनी खेडे बारें व कोंडाणा किल्ला या भागांत पुनः अंमल बसविला व राजगड, तोरणा येथे किल्ले बांधण्यास सुरवात केली, आणि संभाजीचा जन्म स १६५७ च्या १४ में महिन्यांत पूरंदर येथे झाला, यावरून तोपर्यंत त्या किल्लयावर महाराजाचे राहणें असावे असा तर्क करता येतो. पुढे . स. १६५७ पासून शिवाजीराजे राजगडास राहूं लागले.
राजगड येथे त्यांचे ठाणे पुष्कळ वर्षे टिकलें. कारण रायगडावर घरें व तळी बांधण्यास स. १६७१-७२ मध्ये सुरवात झाली त्याअर्थी त्यानतर 'मराठे राज्याचे ठाणे रायगडावर गेले व तो किल्ला राजधानीचे शहर बनला. अर्थात इ. स. १६७२ ते १६८० पर्यंत महाराजाची फक्त शेवटचीआठ वर्षे रायगडास गेली. अशा रीतीने शिवाजी महाराजांच्या वसतिस्थानांचा अनुक्रम ठोकळ मानानें सागता येतो तो असा
इ. स. १६३०-६:-
शिवनेरी
इ. स. १६३७-४९ :-कसबे खेड
इ. स. १६४०-४१:- बंगळूर
इ. स. १६४२-४९:-
कस खेड
इ. स.
१६४९-१६५५:- पुणे
इ. स. १६५६-१६५७:- पुरंदर
इ. स. १६५८-७१:-
राजगड,
इ. स. १६७२-८०:-
रायगड,
वसतिस्थानांच्या अनुक्रमाच्या दृष्टीने सांगितलेले हे कालखंड शिवचरित्रातील घडामोडीच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे टप्पे आहेत. पण या लेखाचा तो विषय नसल्यामुळे येथे त्यांचे वर्णन करण्याचे कारण नाही. तसेच दक्षिण दिग्विजय च्या छत्रपती शिवाजी महाराज एक दीड वर्ष कर्नाटक व, आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्यातील भागात होते पण तो लष्करी मोहीम होते म्हणून सदर रायगडावर म्हणून लेखात उल्लेख केला आहे

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...