विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 December 2025

मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा विजेता सरसेनापती सरसेनापती धनाजी जाधवराव


मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा विजेता सरसेनापती
सरसेनापती धनाजी जाधवराव जडणघडण =
धनाजी आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर जीजाबाई च्या देखरेखीखाली वाढले त्याचे युद्धविषयक शिक्षणाकडे
त्यांनी स्वतः तसेंच छ.शिवाजी महाराजांनी लक्ष दिले याशिवाय सरसेनापती हंबीरराव मोहिते व प्रतापराव गुजर यांचे हाताखाली युद्धशिक्षणाचे धडे मिळाले वडिलांविना पोर म्हणून जिजाऊचे प्रेमही लाभले. शिवरायांच्या मोहिमेत सोबत राहून युद्धनीती, डावपेच, बारकावे, धनाजीनी आत्मसात केले गानिमी काव्यात शिवकाळातच निपुन झााले.या सर्वांच्या सानिध्यात वावरताना धनाजीनी ज्या गोष्टी अंगीकारल्या त्यातूनचं एक समर्थ योद्धा म्हणून त्यांची जडणघडण होत गेली.
सावणुर युद्धातील धनाजी चा पराक्रम व छ.शिवाजी महाराजाची तारीफ = १६७७ जानेवारी
मियाना पठाणाच्या बंधू चा बंदोबस्त कारण्यासाठी सेनापती हंबीरराव यांचे बरोबर धनाजी ही होते हंबीरराव यांचे कडील पाच पन्नास लोक जखमी झाले हे ऐकून धनाजी मदतीस आले चारी बाजूंनी शत्रूची लांडगेतोड करून सर्व सरंजाम लुटून शत्रूचा पाडाव केला.
यानंतर धनाजी, अण्णाजी रंगनाथ भालेकरा बरोबर छ. ना भेटले यांनातर छ.खास दरबारात भरवुन धनाजी ची तारीफ करताना
ही मनुष्ये प्रतिसृष्टी निर्माण करतील आम्ही नसता बादशहासी स्पर्धा करून मुलुख घेऊन त्यास गर्व रहित केला आम्हांसी बोलण्यास त्यास उरुज न राहिला.
कर्नाटक मोहीम = १६७७ मध्ये महाराजांनी ही मोहीम हाती घेतली सैन्याचे दोन भाग करून एक तुकडी स्वतः घेऊन भागानगरास दुसरी हंबीरराव यांचे नेतृत्वाखाली यात धनाजी व संताजी होते.ही मोहीम जिद्दीने लढणाऱ्या तरुण सरदारांना फलदायी ठरली ★
जानेवारी १६८८ कर्नाटक व हरजीराजे महाडीक याचे मदतीस छ.संभाजी राजानी केशवपंत पिगळे, धनाजी व संताजी याचे बरोबर दहा हजार सैन्य देऊन जिजीकडे पाठवले.
मावळ प्रांतात= जानेवारी १६८८
छ.संभाजीराजे च्या वधानंतर संपुर्ण स्वराज्य हादरले मोगलांविषयी सर्वदुूूर संतापाची लाट पसरली धनाजी,
संताजी नी आपल्या गनिमी काव्याने मोगलांना त्रस्त करून सोडले
छ. राजाराम काळात स्वराज्य टिकवून मराठ्यांत
नवचैतन्य निर्माण धनाजी व संताजी सारख्या गनिमी युद्ध तंत्रात कसलेल्या सेनानीनी झुल्फिकारखाना सारख्या
मातब्बर सेनानी ला आपल्या मागे झुलवत पाठीमागे पळवत ठेऊन मेटाकुटीला आणले.
छ.राजाराम महाराजाच जिजीस येण्याचाआदेश =
ऑगष्ट१६९०जिंजीला जाण्यापूर्वी धनाजी , संताजी चा बेळगाव, कर्नाटकात धुमाकूळ ऑक्टोबर १६९२
नरगुंद-गोविदगड भागात धामधूम =ऑक्टोबर, नोव्हेंबर १६९२पन्हाळा वेढा =ऑक्टो १६९२
वारुगड महिमानगड स्वारी = जुलै १६९४
वेलोर चा वेढा= डिसेंबर १६९५
चिजकुलीज खानाशी लढाया = २१ मे ते १३ जून १६९९ या व अश्या शेकडो लढाया व स्वाऱ्याचा विजेता सेनानी
जिंजीच्या मदतीस = 13 डिसेंबर १६९२
धनाजी, संताजी च्या आक्रमक हल्यापुढे मोगल
सैन्यात एकच गोंधळ उडाला तर धनाजी संताजी च्या आगमनाने छ.राजारामास धीर आला. काकरखान,लष्करखान झुल्फिकारखानास मिळाले पण
इस्मलिखान मखा पश्चिम दरवाज्यावर होता मुख्य मुघल फोजेस मिळण्यास त्याला वेळ लागला ही संधी साधून धनाजीनी त्यावर हल्ला करून कैद केले
१३ डिसेंबर १६९२ खानास कैद केल्याची नोंद ताराबाई कालीन कागपत्रातून
धनाजी पुढे धावला सीघ्रतेने
बहु सुटला धाक त्या ताब्रसेने
धरिले बळे सीघ्र इस्माईलासी
करुनी सीमा भेटल्या त्या प्रभुसी
या विजयाने खुश होऊन छ.राजरामानी धनाजीना सातारा भागात मांडवे पाडळी व बोरगाव गावे इनाम २७ फेब्रुवारी १६९३ दिले.
घासदाना नवा कर =
मराठ्यांच्या उत्पन्नाचे चौथाई व सरदेशमुखी ही दोन महत्वाची साधने धनाजी, संताजी मोगल प्रांतांतून हा कर वसूल करीत मोगल प्रांतातून फीरु लागले तेव्हापासून
घासदाना म्हणून तिसरा कर घेण्याचा परिपाठ त्यानी सुरु केला हा कर स्वतःच्या लष्करास गवत,वैरण पुरविण्याच्या खर्चासाठी शत्रू प्रदेेशातुन वसूूूल करीत हा कर छ.राजाराम काळात धनाजी, संताजी व रामचंद्रपंत यांनी सुरु केला
हा कर २℅ असून पैसा किंवा धान्याच्या स्वरूपात असे त्यास मेजवानी असेही म्हणत हा कर सुरू करून धनाजी नी लढाऊ जनावरे पुष्ट केली या आधारे मोगलांशी संघर्ष देने सुलभ झाले.
सेनापतीपदी धनाजीची नेमणूक= मे १६९३ ते मार्च १६९४
मे १६९३ मध्ये छ.राजाराम व संताजी यात मतभेद होऊन संताजी महाराष्ट्रात परतले त्यामुळे संताजीकडील सेनापती पदाचा भार कमी करुन धनाजीकडे सोपंविला
संताजी पुन्हा सेनापतीपदी = मार्च १६९४
धनाजीना सेनापती पदाची लालसा असती तर ते पुन्हा परत केले नसते हा त्यांचा मोठेपणा होता वाद होता तो छ.राजाराम व संताजी यांच्यातील वैचारिक संघर्षाचा
१७ एप्रिल १६९४ चांदजी पाटणकर याना पाठवलेल्या पत्रातून विठ्ठल शीवदेवास छ.राजारामानी
मध्यस्ती करावयास पाठवले व ती यशस्वी झाली व संताजी पुन्हा सेनापतीपदी आले.
धनाजी व संताजी
सलोखा,सामंजस्य, समन्वय, एकजुूूट म्हणजे संताजी धनाजी
संताजी धनाजी नी मराठ्यामध्ये जे चैतन्य निर्माण करूूून जी किमया घडविली हे त्यांच्या संयुक्त मोहिमामुळेच.
सर जदुनाथ सरकार संताजी धनाजी च्या कार्याचा गौरव करताना म्हणतात
दोन दैदिप्यमान तेजस्वी ताऱ्यांनी दख्खनचे नभोमंडप भरून टाकले परकीय आक्रमनास मातीत मिळावले हे तेजस्वी तारे होत धनाजी व संताजी
खाफीखान = या दोन सरदारांमुळे बादशाही सेनापतीवर भयंकर आघात झाले संताजी धनाजीतील सलोखा,सामंजस्य, व एका विचाराने कार्य करन्याचे त्याचें तंत्र दिसते यावरून दोघात वितुष्ट नव्हते हेेच सिद्द होते. सेेनापती पदाची लालसा देखील यांच्यात वितुष्ट निर्माण करू शकली नाही
सरसेनापती धनाजी जाधवाच्या पराक्रमाचा कळस=
रतनपुर ची लढाई (4 मार्च 1706)
या लढाईने मराठ्यासाठी गुजरात व् मालवा चे दार सताड
उगडले गेले सरसेनापति धनाजी जाधव यानी1697 पासून 1707 पर्यन्त धनाजीनी मोगलना सळो की पळो करुण सोडले याच काळात मराठ्यांनी गुजरात व् मालवा सुभ्यावर आक्रमने केली या आक्रमनाचे नेतृत्व धनाजी कड़े होते
4 मार्च 1706 रोजी भड़ोच पासून 14 मैलावर रतनपुर येथे मोगल व् मराठे याची निकरचि लढाई झाली व् मोगलचा प्रचंड पराभव झाला अनेक मोगल सरदार मारले गेले गुजरात चा सुभेदार अब्दुलहामिदखान कैद झाला तीन लाख खंडणी भरून त्याने आपली सुटका करुण घेतली मराठ्यांनी मोगलचा सगळा सरंजाम लुटला
औरंगजेबाकडुन न कळत गौरव =
धनाजी जाधव यह कूच इंसांन नहीं सैतान हे हमारे साथ प्याज खाके आजतक लढाता आया और हमारी पातशाही यह छिन लेंगा ऐसा हमाँरेकू मालूम पढा हे. अगदी शत्रूच्या मनात सुध्दा धनाजीच्या कर्तबगारी
विषयी शंका दिसत नाही हेच त्यांचे मोठेपण होय.
धनाजी जाधव मराठ्यांच्या इतिहासातील एक
मुरब्बी राजकारणी मोगल मराठा संघर्षांत धनाजी नी बादशाहशी लढताना कधीही शरणागतीचा विचार मनात
येऊ न देता मोगलांवर धाडशी हल्ले ,मोगलांच्या अफ़ाट सैन्याबरोबर शेकडो लढाया दिल्या असा हा असामान्य सेनानी.
राजाराम महाराजानंतर ताराबाई व शाहूं काळातही धनाजीकडे मूलकी व लष्करी दोन्ही खाती होती तरीही त्यानी जहागिरीची सनद कारून घेतली नाही राजारामानी बोरगाव व पाडळी ही दोन गावे सनद करून दिली.१०/१५ लाखाचा मुलुख जहागिरीदाखल तोडुन घेण्याऐवजी स्वार्थ त्याग करून फक्त दोन गावे इनाम मिळविली याशिवाय एक हजार रुपये भरून पाच गावे व पुन्हा पाच हजार रुपये भरून एकशे अडतीस गावची देशमुखी रीतसर खरेदी केली हा स्वार्थत्याग पुढे शाहूं कारकिर्दीनंतर घडला नाही
आपल्या वडिलोपार्जित सिदखेडच्या देशमूुखी
मध्ये वाटणी न घेता आपल्या पराक्रमाने निराळेच वतन संपादन केले.
उत्कृष्ट संघटक व व्यवस्थापक =
छ.शिवाजी महाराजांच्या धोरणांचा विस्तार धनाजी कडून होत होता शिवरायांनी अंमलात आणलेली गनिमीकावा युद्ध पद्धतीत भौगोलिक घटकांचा समान्वय,युद्धतंत्र,युद्धशास्त्र,व सुरक्षयंत्रनेशी जोडून लोकांच्या वागण्याशी सांगड घातली
कधी पराजय पदरी येत असताना जनतेचा त्यांच्यावरी विश्वास कधीच कंमी झाला नाही त्यांच्या विरुद्ध त्यांच्या सैनीकांंनी बंडखोरी केली नाही उलट सैन्यात धनाजी प्रियच होते असे मोगल इतिहासकारचे मत जनता व सैनिक मोठ्या विश्वासाने त्यांचा सोबत खंबीरपणे राहिले मोगलाविरुद्ध आपणास यश मिळेल ही खात्री असावी कारण अपयश आल्यास त्यात सर्वांचाच विनाश होता
धनाजींनी आपल्या कार्याने मराठेशाहीचे सामर्थ्य
वाढविले छ.शिवाजी महाराजा पासून ते छ.शाहूं काळापर्यत पराक्रमाची सतत नवनवी क्षितिजे गाठणारे धनाजी जाधव मराठ्यांच्या क्रांतीचे सामर्थ्यशाली आधार बनून वावरले
मोगल मराठा संघर्षात सुर्याप्रमाने तळपणारा विजेता सेनापती काळाच्या पडद्याआड =२७ जून १७०८
छ. शाहूंच्या आदेशानुसार रांगण्याच्या मोहीमेत
मदतीस जात असताना धनाजीच्या पायांची जुनी जखम चिघळली मोगलांशी सततच्या युद्धाने झालेली दगदग अशातच वारणा नदी काठी वडगाव येेथे २७ जून १७०८ त्याचें निधन झाले.
धनाजीचा मृत्यु हा शाहुपक्षास बसलेला जबरदस्त हादरा होता यात छ.शाहूंमहाराज याचे वैयक्तिक नुसकांन झाले छ. शाहूमहाराजाचे गौरवोद्गार =
धनाजीच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ गोपिकाबाईनी
सहगमन केले त्यावेळी वडीलपुत्र संताजी उर्फ सुजनसिह,चद्रसेन,व शभूसिह हजर होते यावेळी अंत्ययात्रेस छ.शाहूमहाराज, अष्टप्रधान मंडळ व हजारो मराठे सरदार सैन्यानिशी हजर होतें लष्करी सलामी देऊन तोफा झाल्या
आमच्यावर जाधवरावानी मोठे उपकार केले व आम्हास हेे राज्य मीळऊन दिले असे गौरवोद्गार काढले
महाराणी ताराबाईकडून प्रसंसा =
खुद्द महाराणी ताराबाईनी चांद्रसेन जाधव यांना दुःखवाट्याचे लीहले त्यात धनाजीच्या कार्याची स्तूुुती करतांना जाधवराव कैलासवासी स्वामींचे संपूूर्ण कृपेस पात्र झाले राज्याभिवृवृद्धी विषयी त्यानी काही सामान्य श्रमसाहस केला नाही जीविताची तमा न धरितां स्वामीकार्याशी तत्पर राहून प्राप्त संकटे निरसन करून स्वामीस संतुष्टविले तेव्हा स्वामीस मशरनिल्हेविना दुसरे प्रिय की प्राण (कोणी ) होते असे नाही औरंगजेबासारख्या शत्रूचा हिसाब न धरितां राज्याचे संरक्षणार्थ असाधारण कसास केला शत्रू पराभव पावविल्याचे यश मशरनिल्हेस प्राप्त झाले.
धनाजीच्या मृत्यूनंतर दानधर्म व भूमीदान तिघा पुत्रानी केला
राजर्षी शाहूंचा इ.स.१९०१-१० मधील ठराव =
सरसुभे आ.से.१२८ तारीख ८.१२.१९०८ वडगावपेटा आळते गावी धनाजी जाधव यांचे थंडग्याचे
पूजेकरिता नारायण धोंडी व देवजी रामा यांचे नावे उत्त्पन्न
असून ता ०५.०३.१९०९ सदर प्रमाणे उत्त्पन्न हुजूर सनदी खर्च चालवण्याचे मंजूर केले.
मराठ्यांच्या बाजूने मोगलांशी आपल्या शेवटच्या
श्वासापर्यंत लढा देणारे पाच छत्रपतीचा सहावास,
जिजाऊंचे प्रेम माया संस्कार लाभलेला असा एकमेवाद्वितीय योद्धा. यामुळेच इतिहासातील त्यांचे स्थान अगळेवगळे ठरते
खरोखरच धनाजी जाधव व त्यांचा सहकाऱ्यांनी
शिवरायाच्या म्हणण्याप्रमाने औरंगजेबाला पराभूत करूून
स्वराज्य वाचवले व ही प्रतिसृष्टीच निर्माण केेेली
स्वराज संस्थापकांनी जो विश्वास धनाजी व त्यांच्या सहकाऱ्यांवर टाकला तो त्यानी खरा करून
दाखवला आणि त्या बरोबरच स्वामिनिष्ठाही जोपासली
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मनाचा मुजरा.

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...