विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 30 December 2025

मराठा आरमारातील सरदार रामजी कदम आणि सयाजी नाईक चव्हाण.

 


मराठा आरमारातील सरदार रामजी कदम आणि सयाजी नाईक चव्हाण.

इसवी सन १७६७ – चाच्यांची ५ गलबते दक्षिणेकडून उत्तर दिशेला जात असताना याच वेळेस विजयदुर्ग येथील मराठा आरमाराची जहाजे पोर्तुगीजांच्या आरमाराचा पाठलाग करत होते. त्यावेळेस गुहागरजवळील समुद्रावर मराठा आरमाराच्या वारू गलबताची व चाच्यांच्या गलबतांची गाठ पडली. वारू गलबताने अंजनवेलीच्या समुद्रापर्यंत चाच्यांचा पाठलाग केला. त्याचसुमारास अंजनवेल येथील आरमार नुकतेच सकाळच्या दोन प्रहरात समुद्रात उतरत होते. अंजनवेलच्या आरमाराने चाच्यांना परत मागे फिरविले. अशी लढाई होत होत वेळणेश्वरच्या समुद्रावर आले असता विजयदुर्गचे वारू गलबत चाच्यांनी नालीपासून डोलकाठीपर्यंत काबीज केले. हे पाहून अंजनवेलच्या मराठा आरमाराने तुफान मारगिरी करून विजयदुर्गचे गलबत सोडविले आणि चाच्याचे एक गलबत पाडाव केले. चाच्यांची बाकीची चार गलबते मौजे नरवण तर्फ गुहागर येथील किनाऱ्यावर हेसरली. चाच्यांनी उड्या टाकून पळ काढला. या लढाईत जे दोन प्रमुख सरदार होते त्यांची नावे – रामजी कदम आणि सयाजी नाईक चव्हाण.
लवकरच.......
साभार राज जी मेमाने
इतिहास संशोधक व लेखक . पुणे

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...