विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 12 December 2025

सेनानी संताजी पांढरे

 ६ नोव्हेंबर १७०५ रोजी,

मराठ्यांच्या इतिहासात आपल्या पराक्रमाने अविट ठसा उमटविणाऱ्या पांढरे घराण्यातील (शरिफनमुलूक) हा उमदा “


सेनानी संताजी पांढरे”...
मराठ्यांच्या स्वातंत्रसंग्रामात सत्वर भाग घेऊन आपल्या सैन्यदलाचे नेतृत्व करत थेट औरंगजेबाशी भिडणारा रणगाजी म्हणजे संताजी राजेपांढरे. पांढरे घराण्याच्या अनेक शाखा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा. इ भागात विस्तारित झाल्या आहेत, परंतु शिखर शिंगणापूर च्या पायथ्याला असणाऱ्या नातेपुते हे पांढऱ्यांच्या मूळ वतनाचे गाव होय. शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सुरवातच पांढरे घराण्यातील मुलगी व माळशिरसच्या वाघमोडे घराण्यातील मुलगा यांचे लग्न झाल्या शिवाय सुरवातच होत नाही अश्या या नातेपुते गावचे वतनदार म्हणजे संताजी पांढरे..
औरंगजेबाची ही विशाळगड मोहीम खूपच मानहानीकारक घडली ह्यात मोगलांकडील सहा हजार माणसे गमावली ह्या मध्ये संताजी पांढरे यांचा मोठा वाटा होता. एकदा तर मराठे अगदी औरंगजेबाच्या तंबूच्या जवळ येऊनच ठेपले होते. स्वतः आलमगीर हातात धनुष्यबाण घेऊन पुढे सरसावला ऐन वेळी एक रजपूत सरदार मदतीला धावला त्यामुळे मराठे मागे हटले ही मदत आली नसती तर खासा आलमगीर बादशहाच कैद झाला असता. मोगल बातमीपत्रातील एका नोंदी नुसार १ मार्च १७०३ साली संताजी पांढरे मोठे सैन्य बरोबर घेऊन अहमदनगर जवळ असणाऱ्या तिसगाव मढी भागात आक्रमण करत असल्याच सांगण्यात आले आहे..
६ नोव्हेंबर १७०५ रोजी, प्रसिद्धगड उर्फ रांगणा या किल्ल्यावर एक ऐतिहासिक मजहर तयार केला गेला. त्यामध्ये नेमाजी राजे शिंदे, धनाजी जाधवराव, हंबीरराव मोहिते, या सारख्या मातब्बर मंडळी बरोबरच संताजी पांढरे यांचा शिक्का उमटवल्याचे दिसून येते. यावरूनच संताजी पांढरे यांची मातब्बरता समजून येते. इस १७०६ च्या सुमाराला संताजी पांढरे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, दमाजी थोरात मंडळी अहमदनगर येथील छावणीवर तुटून पडले. ही मोहीम खुद्द बादशहावर करण्यात आली होती. शाही सैन्याचे प्रचंड मोठे नुकसान करून मराठे मागे फिरले. वरील नोंदी पाहिल्या तर संताजी पांढरे यांनी मोठ मोठ्या मोहिमा ह्या बादशहाच्या विरोधात केल्याचे दिसून येते. मध्यंतरीच्या काळात औरंगजेब भिंगार या ठिकाणी मृत्यु होऊन छत्रपती थोरले शाहुमहाराज यांची कैदेतून सुटका झाली. छत्रपती थोरले शाहुमहाराज महाराष्ट्रात आल्या नंतर अनेक मातब्बर मराठा सरदार छत्रपती शाहु महाराजांना जाऊन मिळाले. परंतु बदललेल्या राजकीय परिस्थिती मध्ये ही संताजी पांढरे यांनी महाराणी ताराराणीसाहेब यांचा पक्षाला एकनिष्ठ राहिला..

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...