खून: मराठ्यांच्या विश्वासाचा.
खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.

पोस्टसांभार : सतीश शिवाजीराव कदम
भाग 3
१ एप्रिल १७३१ साली डभई येथे बाजीराव पेशवा आणि त्र्यंबकजी दाभाडे यांच्यात झालेल्या लढाईत मराठ्यांचे सेनापती त्र्यंबकराव दाभाडे मारले गेले आणी गुजराथच्या राजकारणाला कलाटणी मिळाली.
( ह्या डभईच्या लढाईत पिलाजी गायकवाड हे सेनापती दाभाडे यांच्या बाजूने थोरल्या बाजीराव पेशव्याच्या विरोधात लढले होते. यात ते जखमीही झाले होते. )
पिलाजी गायकवाड हेच दाभाड्यांच्या वतीने आता गुजरातची कामगिरी पाहू लागले. त्र्यंबकराव दाभाड्यांच्या मृत्यूनंतर थोरल्या बाजीराव पेशव्याने गुजराथेतून काढता पाय घेतल्याने पिलाजी गायकवाड हेच एकटे कर्तबगार मातब्बर असामी गुजराथेत शिल्लक राहिले.
आता महत्वाचे:
कोणत्याही मार्गाने ह्या पिलाजी गायकवाड यांचा काटा काढल्यास गुजराथ मराठ्यांच्यापासून पूर्णपणे मुक्त होईल या लालची आशेने मुघलांचा रजपूत सुभेदार अभयसिंगाने पिलाजी गायकवाड यांचा खून करण्याचा पवित्रा घेतला.
ह्या अभयसिंगाच्या पूर्वी गुजराथेतील मुघल सुभेदार सरबुलंदखान हा मराठ्यांच्या गुजराथेतील राज्यविस्ताराला आवरू शकला नाही आणी मराठ्यांनी गुजराथेत पुन्हा स्वाऱ्या करण्यास सुरवात केली.
मराठ्यांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे त्रस्त होऊन मुघल बादशहाने तेंव्हाचा अकार्यक्षम अधिकारी म्हणून सरबुलंदखान याची बदली करून त्याच्या ऐवजी ह्या अभयसिंहाची नेमणूक झालेली होती.
मुघल सुभेदार अभयसिंह मोठ्या तयारीनिशी गुजराथेत आला होता. इसवीसन १७३० सालच्या धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर तो अहमदाबादला आला होता.
पेशवा आणी दाभाडे यांच्यात पूर्वीपासूनच वैर होते. आणी ह्याचाच परिपाक म्हणजे १ एप्रिल १७३१ साली थोरला बाजीराव पेशवा आणी सेनापती त्र्यंबकजी दाभाडे यांच्यातच यादवी युद्ध होऊन सेनापती त्र्यंबकजी दाभाडे हे पेशव्यांच्या हातून मारले गेले.
( ह्या विषयावर भविष्यात मी छान लेख लिहील. )
ही घटना मराठा साम्राज्यासाठी खचितच चांगली नव्हती.
ही घटना मुघल सुभेदार अभयसिंहासाठी फायद्याचीच ठरली.
मराठ्यांची शक्ती आता गुजराथेतून नष्ट होणार या रम्य स्वप्नांत अभयसिंह असतानाच पिलाजी गायकवाड आपली कर्तबगारी गुजराथेत दाखवू लागले आणी पिलाजीच्या ह्या शौर्यामुळे आणी धामधुमीमुळे अभयसिंहाचे स्वप्न खाड्कन मोडले. आता पिलाजी गायकवाडांची कर्तबगारी ह्या अभयसिंहाच्या डोळ्यात खुपू लागली.

No comments:
Post a Comment