हैदरअली आणि मराठा वीरांची लढाई
भाग 2
इ. स. १७६७ त थोरल्या माधवराव पेशव्यांनें याच्यावर दुसऱ्यांदा स्वारी केली व शिरें. होसंकोटें व मद्दगिरी हीं स्थळे हस्तगत करून त्याच्याकडून ३० लाख रुपये खंडणी घेतली. मराठ्यांची मोहिम संपते न संपते तोंच हैदराला निजामअल्ली व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याशीं युद्ध करण्याचा प्रसंग आला. प्रथम प्रथम ब्रिटिश सैन्याचा जय होत गेला व हैदरहि तह करण्यास विनंति करूं लागला. परंतु त्याची मागणी नाकारल्याबरोबर त्यानें सर्व बल एकत्र करून अचानक मद्रासेस जाऊन तेथील इंग्रज गव्हर्नरास आपण सांगू त्या अटीवर आपल्याशीं तह करावयास लाविलें (३ एप्रिल १७६९). या तहांत परस्परांनीं परस्परांचा घेतलेला मुलूख परत करून पुढें दोस्तीनें व एकमेकांच्या मदतीनें असावें असें ठरलें. इंग्रजांशीं केलेल्या तहामुळें यास जोर येऊन हा मराठ्यांची मागील थकलेली खंडणी देण्याची टाळाटाळ करूं लागला व मराठ्यांच्या अंकित असलेल्या पाळेगारांपासून यानें खंडण्या वसूल करण्यास आरंभ केला. तेव्हां माधवराव पेशव्यांनें यावर तिसऱ्यांदा (१७७०) स्वारी करून त्याजपासून शहाजी राजाची सर्व जहागीर परत घेतली व यास मद्दगिरी व गुर्रमकोंडा द्यावयास लावून, मागील खंडणीच्या बाकीबद्दल व स्वारीखर्चाबद्दल ३६ लाख रुपये, आणि पुढें दरसाल खंडणीप्रीत्यर्थ १४ लाख रुपये देण्याचें कबूल करावयास लाविलें (१७७२). या युद्धांत हैदराला इंग्रजांनीं मुळींच मदत दिली नाहीं म्हणून हैदर त्यांचा सूड घेण्यासाठीं चडफडत होता. नारायणरावाच्या खुनामुळें पुणें दरबारीं घोटाळा उडलेला पाहून यानें गेल्या स्वारींत मराठ्यांनीं घेतलेला आपला मुलूख परत घेण्यास सुरवात गेली हें ऐकून राघोबा यावर स्वारी करून आला. परंतु त्यास इतकी अडचण होती कीं, त्यानें २५ लाख रुपयें देण्याचें कबूल केल्याबरोबर तीन जिल्ह्यांवरील आपला हक्क सोडला.

No comments:
Post a Comment