हैदरअली आणि मराठा वीरांची लढाई
भाग १
हैदरअल्ली- म्हैसूरच्या गादीवर बसणारा हा उपरी राजा इ. स. १७२२ च्या सुमारास दक्षिणेंत जन्मला. हा १७४०च्या सुमारास म्हैसूर लष्करांत चांगला उदयास आला . त्यानें म्हैसूरचा राजा व दिवाण यांनां आपल्य ताब्यांत आणलें होतें. इ. स. १७५७ त हैदरअलीनें म्हैसूर सरकारास सल्ला दिला कीं, मार्च महिन्यांत पेशव्यांनीं श्रीरंगपट्टणवर स्वारी केली तेव्हां त्यांनां देऊं केलेल्या ३२ लक्षांच्या खंडणीपैकीं जी रक्कम द्यावयाची राहिली आहे, ती त्यांस न देतां. या रकमेच्या फेडीकरितां वसूल गोळा करण्यासाठीं त्यांनीं आपल्या जिल्ह्यांत जे कारकून ठेविले आहेत त्यांस हांकून लावावें. तसें झाल्यावर १७५९ चा पावसाळा संपतांच म्हैसूरकरांचें पारिपत्य करण्याकरितां पेशव्यांनी गोपाळ गोविंद पटवर्धन यास कर्नाटकांत पाठविलें. तेव्हां गोपाळरावाशीं लढण्याकरितां म्हैसूरकरांनी हैदरअलीचीच योजना केली. सर्व सैन्यांचे अधिपत्य स्वीकारण्याचा हा हैदरअलीला पहिलाच प्रसंग होता. १७६१ त हैदरानें म्हैसूरचें राज्य आपल्या स्वत:च्या देखरेखीखाली घेऊन तें वाढविण्यास सुरुवात केली पेशवे आपल्या घरातील भांडणें मोडण्यांत व निजामअल्लीशीं लढण्यांत गुंतले आहेत, असें पाहून, हैदरअल्लीनें इसवी सन १७६१ पासून १७६४ पर्यत तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील मराठ्यांचा बहुतेक मुलूख पादाक्रांत करून उत्तरेस कृष्णा नदीपर्यंत आपली ठाणीं बसविलीं. तेव्हां इ.स. १७६४ त पेशव्यांनीं हैदरावर स्वारी करून वर्धा नदीच्या उत्तरेकडील सर्व मुलूख त्याजपासून सोडविला. व त्याचा कित्येक लढायांत पराभ करून त्यास दांती तृण धरावयास लाविलें (१७६५) हैदरअली मराठयांस शरण आला, व त्यानें ३२ लाख रुपये खंडणी देऊन त्यांना परतवून लाविलें. पण मलबार पादाक्रांत करून त्यानें हें नुकसान ताबडतोब भरून काढलें.
No comments:
Post a Comment