विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 9 May 2019

खून: मराठ्यांच्या विश्वासाचा. खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.भाग 4

खून: मराठ्यांच्या विश्वासाचा.
खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.

पोस्टसांभार : सतीश शिवाजीराव कदम

भाग 4

पिलाजी गायकवाडांनी एका वर्षाच्या आतच मराठ्यांची बाजू सावरून पुन्हा गुजराथेत मराठ्यांच्या राज्यविस्ताराला सुरवात केली. त्यामुळे ह्या पिलाजीला कुठेतरी पायबंद घालण्याची खटपट आता अभयसिंह करू लागला.
खरे पाहता पिलाजी गायकवाडांच्याकडे १५ हजार घोडदळ आणि ५ हजार पायदळ होते.
मात्र ह्या अभयसिंहाकडे ह्या पिलाजीच्या दुप्पट म्हणजे ३० हजार घोडदळ आणि १० हजार पायदळ उपलब्ध होते. ह्या शिवाय मुगलांचा मोठा तोफखानाही अभयसिंहाच्या दिमतीस उभा होता.
आता महत्वाचा प्रश्न असा आहे कि अश्या परिस्थिती पिलाजी गायकवाडांशी समोरासमोर लढाई करण्याऐवजी पिलाजीचा खूनच करण्याचा विचार हा अभयसिंह का करू लागला?
ह्याच उत्तर पुढे आहे.
अभयसिंहाने दिल्लीला मुघल बादशाकडे पाठविलेल्या आपल्या वकिलाच्या पत्रात बादशहास असे म्हंटले आहे कि, "पिलू समोरासमोर लढाई कधीच देत नाही. मुघलांच्या आपल्या सैन्यावर तो सतत अचानकच धाडी घालत फिरतो. आपल्या फौजांच्या पिछाडीवर वारंवार हल्ले करून दिवसाला ३ मैल जाणेसुद्धा कठीण करून सोडतो.
आमच्यासमोर २० मैलांवर त्याने मुक्काम केला तर आम्ही त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारू शकू. परंतु तो आमच्यासमोर थांबतच नाही.
चित्यासारख्या चपळ मराठ्यांचा पाठलाग कुठपर्यंत करणार? तेंव्हा ह्या पिलाजीला थांबविण्यासाठी आम्ही तहाच्या वाटाघाटींचा घोळ घालून दग्यानें पिलाजीला ठार मारले."
हि गोष्ट ह्या पत्रात अभयसिंहाने स्वतःच मान्य केलेली आहे.
१७३२ च्या मार्च मध्ये पिलाजी गायकवाडांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे सैन्य ‘मही’ नदी ओलांडून अहमदाबादच्या रोखाने निघाले. त्यामुळे पिलाजीला अडविण्यासाठी मुघल सुभेदार अभयसिंह अहमदाबादेतुन बाहेर पडून 'वरेजा' येथे तळ ठोकून उभा राहिला.
वाटाघाटीने प्रश्न जर सुटत असेल तर वाटाघाटी करून पाहाव्यात म्हणून प्रयत्नास अभयसिंहाने सुरवात केली.
वाटाघाटी करत असताना ‘बडोदे’ आणि ‘डभई’ हि दोन मातब्बर ठाणी सोडण्यास मात्र पिलाजी काही तयार होईना. गंमत म्हणजे पिलाजीने मुघलांची नोकरी स्वीकारावी म्हणून अभयसिंहाने पिलाजीस आमिषही दाखविले.
परंतु पिलाजी या गोष्टींस कबूल होईना. ह्या वाटाघाटींच्या वेळी पिलाजीने मांडलेली भूमिका अतिशय खंबीर होती.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...