खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.
खून: मराठ्यांच्या विश्वासाचा.
पोस्टसांभार : सतीश शिवाजीराव कदम
भाग 5
पिलाजी म्हणतात, " बडोद्याचा संबंध आपल्या मस्तकाशी आहे. ते सोडता येणार नाही. असले तीन सुभे आले व गेले. सरबुलंदखान देखील गुजराथला सुभेदार म्हणून आला होता. परंतु त्यास आम्हाला 'चौथाई' देऊन मगच परत जाता आले."
असा शब्दांचा दांडपट्टा जेंव्हा पिलाजीने अभयसिंहावर चालविला तेंव्हा मात्र ह्या पिलाजीचा 'काटा' काढल्यावाचून बडोद्याचा ताबा मिळणे अशक्य आहे असा विचार अभयसिंहाच्या मनात आला.
आणि मग अभयसिंहाने पिलाजीशी शूरपणाने लढाई न करता दगलबाजीने पिलाजीचा खूनच करायचा मार्ग स्वीकारला.
त्र्यंबकराव दाभाड्यांच्या मृत्यूनंतर त्याचे मुतालिक व सहाय्य्क म्हणून राजकारण पिलाजीच्या हातात आले होते. गुजराथेतील भिल्ल आणि कोळी लोकांवर पिलाजीचे जबरदस्त वजन होते. हे लोक पिलाजीस फार मान देत असत.
‘पाद्रा’ येथील देसाई आणि जमीनदारांचा मुगलांच्यापेक्षा मराठ्यांकडे ओढा अधिक होता. आणि त्यामुळे हे लोक मराठ्यांना शक्य तेव्हढी मदत करत असत.
( पाद्रा हे गाव बडोदा जिल्ह्यात येते. बडोद्यापासून १६ किलोमीटरवर हे गाव आहे.)
तिथली महत्वाची ठाणी ताब्यात घेऊन पिलाजी आपले पाय गुजराथेत पक्के करत होते. त्यामुळे पिलाजीचा काटा काढल्याशिवाय दक्षिण गुजराथचा प्रदेश मुघलांच्या ताब्यात येणे कठीण होते.
डभईच्या लढाईनंतर बाजीराव घाईघाईने दक्षिणेत परत गेला तेंव्हा या एकुलत्या एक शूर सरदाराचा नाश करावा आणि मराठ्यांचा गुजराथेतील अंमल उठवून त्यांच्यावर जबरदस्त दहशत बसवावी अश्या दृष्टीने विचार करून अभयसिंहाने हि घृणास्पद कृती केली.
महाराष्ट्र धर्मचे लेखक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार; केवळ धारदार शब्द पिलाजीने वापरले म्हणून क्रोधाने हि कृती झालेली नाही. खरे तर पिलाजीच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या गनिमी काव्याला अभयसिंहाला तोंड देता येईना म्हणून त्याने हा मुघली कावा केला हे स्पष्ट दिसते.
पिलाजीचा खून किती पद्धतशीर व नियोजनपूर्वक केला गेला हे पाहण्यासारखे आहे.

No comments:
Post a Comment