खून: मराठ्यांच्या विश्वासाचा.
खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.

पोस्टसांभार : सतीश शिवाजीराव कदम
भाग 6
२० मार्च १७३२ च्या सुमारास पिलाजीचा मुक्काम ‘डाकोर’ येथे होता. वाटाघाटी करण्यासाठी अभयसिंहाने आपली निवडक माणसे पिलाजीकडे पाठविली. या निवडक माणसांमध्ये इंदा लखदीर ( हा जैनसिंगचा मुलगा होता) पांचोली रामानंद, आणि आजादसिंग भंडारी हि मंडळी होती. ह्या मंडळींनी पिलाजीकडे जाऊन शिष्टाई करायची होती.
" ज्या जमातीत खून करणे हि नेहमीचीच बाब आहे अशी हि दगाबाजीत प्रवीण असलेली मंडळी मुद्दाम अभयसिंहाकडून पाठविण्यात आली." असे ‘मिरात-इ-अहमदी’ या ग्रंथात महंमदखान या इतिहासकाराने म्हंटले आहे.
ठरलेल्या नियोजनानुसार आता हि दगाबाज मंडळी अभयसिंहाच्या आदेशानुसार वाटाघाटी करायच्या निमित्ताने पिलाजीच्या छावणीत रोज जा ये करू लागली. वाटाघाटीच्या निमित्ताने ह्या लोकांनी पिलाजीच्या छावणीची पूर्णपणे हेरगिरी केली.
छावणीत फौज किती, मराठ्यांची मुख्य फौज किती, ती किती अंतरावर उभी असते, पिलाजीजवळ किती लोक असतात अशी बारीक सारीक माहिती ह्या कटातील लोकांनी गोळा करायला सुरवात केली.
शिवाय भेटीच्या मुख्य दिवशी पिलाजीस भेटायला जाताना ह्या कटातील लोकांनी मुद्दाम रात्रीची वेळ निश्चित केली. ह्याच वेळी अभयसिंहाने त्याचे २ हजार निवडक शूर सैनिक तयार करून मुद्दाम अंधारात पिलाजीच्या छावणीजवळ आणून दबा धरून लपवून ठेवले.
ह्या २ हजार सैनिकांना छावणीत पिलाजीकडे भेटीस गेलेल्या लोकांकडून इशारा मिळताच पिलाजीच्या छावणीवर हल्ला करावयाचा होता. या रात्रीच्या हल्ल्यामुळे मराठ्यांची फौज गोंधळून जाईल आणि सैरभैर होईल अशी अभयसिंहाची योजना होती.
वाटाघाटीच्या भेटीच्या मुख्य दिवशी अभयसिंहाकडून निवड केलेल्या माणसांपैकी इंदा लखदीर, पांचोली रामानंद, आणि आजादसिंग भंडारी हि मंडळी पिलाजीकडे भेटीस गेली.
भेटीस जाताना ह्या लोकांनी मुद्दाम उशीर करून अंधार पडू दिला. संध्याकाळ झाल्यावर साधारण रात्री ७ वाजता हि मंडळी पिलाजीस भेटली आणि शेवटच्या वाटाघाटींची बोलणी करू लागली.

No comments:
Post a Comment