विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 9 May 2019

खून: मराठ्यांच्या विश्वासाचा. खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.भाग 7

खून: मराठ्यांच्या विश्वासाचा.
खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.

पोस्टसांभार : सतीश शिवाजीराव कदम

भाग 7

पिलाजीस मात्र ह्या कटाचा कुठलाही सुगावा लागला नाही. थोड्याच वेळात हीच वाटाघाटीची बोलणी करणारी मंडळी आपला खून करणार आहेत ह्याची पुसटशीही शंका पिलाजीस आली नाही.
वाटाघाटींची बोलणी संपल्यावर कटातील मंडळी पिलाजीच्या तंबूतून बाहेर जाऊ लागली.
मात्र ह्याच वेळी कटातील मंडळींपैकी एक असलेल्या ‘इंदा लखदीर’ याने, "काही महत्वाचा मुद्दा बोलायचा राहिला आहे.." असे निमित्त केले आणि तो परत तंबूत पिलाजीजवळ आला.
पिलाजीच्या कानात आपल्याला काही महत्वाचे सांगायचे आहे अशी त्याने पिलाजीस विनंती केली.
पिलाजीने परवानगी दिल्यावर पिलाजीच्या जवळ जाऊन हा इंदा लखदीर पिलाजीच्या कानात काही सांगणार इतक्यात पिलाजीच्या पोटात खसकन इंदा लखदीरने दोन वेळेस जोरदार कट्यार खुपसली. कट्यार पिलाजीस वर्मी लागली. आणि जागेवरच पिलाजी गायकवाड जमिनीवर कोसळले.
ह्याचवेळी पिलाजीजवळ उभ्या असलेल्या मराठ्यांनी अत्यंत त्वेषाने ह्या दगलबाज इंदा लखदीरला पकडून पिलाजीपासून त्यास दूर केले आणि त्याचे मुंडके एकाच घावात धडावेगळे केले. इंदा लखदीरच्या शरीराची जागेवरच खांडोळी केली.
इंदा लखदीरच्या शरीराचे तुकडे तुकडे करून मराठ्यांनी तंबूबाहेर गेलेल्या कटातील इतर मंडळींनाही धरून आणले आणि सर्वांचा जागेवरच शिरच्छेद केला.
इतिहासकार ग्रँड डफने आपल्या ग्रंथात एक मारेकरी सापडला आणि बाकीचे पसार झाले असे म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...