।। या युगी सर्व पृथ्वीवर मराठा पातशहा ऐवडा छत्रपती झाला हि गोष्ट काय सामान्य झाली नाही ।।
पोस्तसांभार :: ( इंद्रजीत खोरे )
शिवराज्यभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सरसेनापती प्रतापराव गुजर यासी मानाचा मुजरा
दुपार ठळक आली होती.तशी सात-आठ घोडी खेडशिवापुरच्या वेशी आत शिरली.अनं खासे वाड्याकडे कदंमबाज चाल पकडून निघाली.ते पथक होतं छत्रपती स्वामींचा खास मर्जीतल्या आसामीच म्हणजेच बहिर्जी नाईक याचं.छत्रपती स्वामींचा मुक्काम सद्या खेड-शिवापूरास होता.ते नुकतेच रोहिड्याची पाहणी करून आले होते.वाडा नजरटप्प्यात येताच बहिर्जीनी घोड्यावरची मांडमोडून खाली उडी मारली.आपला घोडा
दुसऱ्या पोरा कडे सोपवून बहिर्जींनी आपला पेहराव ठाक-ठीक केला अन वाड्या कडे निघाले.वाड्याच्या दरवाज्यावर मावळी हशमांचा पहारा होता.बहिर्जींना बघताच पहारेकऱ्यांनी राम राम घालून वाड्याच ठोलेजंग
दाराचा दिंडीदरवाजा उघडला.आता प्रवेश करून त्यांनी सदरेवर आपली नजर फेकली.तर बाळाजी आवजीं चार-पाच गावच्या पाटलांन बोरोबर दबक्या आवाजात चरच्या करत होते.
बहिर्जी नाईकांना बघताच बाळाजींनी हलकी साद घातली
या नाईक...!! बसा..!! बहिर्जींना बगताच बाळाजींच्या हे द्यानीआलं की आता बोलणं आवरतं घेतलं पाहिजे.त्यांनी सर्वांना निरपो दिला अनं उठले.बहिर्जीं कडे पाहत बाळाजी उतरले.नाईक आताच स्वामीं आराम करण्यातसाठी म्हणून दालनात गेलेत..!! तशी तातडीची खबर असल्यास महाराजांना विनंती करतो..!!
बहिर्जी व्हय जी...!! खबर देणं जरुरीचं हाय जी...!!
धन्यासनी म्हणावं तशी अर्जी हाय...!! खुद्द बाळाजीच
आता गेले आणि चटक्या पावलांनी परतले.हातची खून करून त्यांनी बहिर्जींना आता जण्यास सगीतलं.
बहिर्जी आता येताच त्यांनी पाटमोऱ्या महाराजांना मुजरा रुजू केला.महाराजांनी वळून बहिर्जींना दार लोटून घेण्याचा इशारा केला.दार बंद होताच महाराजांनी प्रश्न केला.बोला नाईक कसं येणं केलं..? कोण वजह..कोणती आफत..!! नाय जी..!!तशी आफत नाय हाय पर तिकडं मोगलाइत दिलेरखान अनं बहादुरखानाची चूळ-बूळ चालू हाय.मोठा दळबा घेऊन ते नाशिक बागलाण प्रांती उतरून त्यांनी साल्हेरला वेडा दिला हाय.इख्लासखान
मुहकमसिंह चंदवत,राव अमर सिंह चंदावत आणि इतर पाच-पन्नास सरदार त्यांच्या दीमतीस हायतं.बकळ युद्ध साहित्य संगती आणलय.महाराजांनी प्रती प्रश केला नाईक सगळी मिळून मुगलांची किती फौज असेल...?
असलं की साठ ते सत्तर हजाराची.नाईक सांगत होते पण महाराजांनच चित्त मात्र साल्हेर गडावर होतं.दाऊदखान सारख्या कसलेल्या अरबाला पाणी पाजून स्वतः महाराजांनी साल्हेर हस्तगत केला होता.नाईकांच बोलणं ध्यानी धरून महाराजांनी नाईकांना निरोप दिला.
अंदार दाटून आला.महाराजांनी बाळाजीस याद फर्मावले
बाळाजीस जरुरी तो मचकूर सांगून तातडीनं दोन खलिते सिद्ध करण्यास सांगितले आणि बहिर्जी मार्फत ते मोरोपंत पिंगळे आणि सेनापती प्रतापराव गुजर यांच्या कडे रावांना करण्यास सांगण्यात आले.महाराजांनी खुद्द बहिर्जीस जातीनं सगळ्या सूचना दिल्या होत्या.पहाटेच्या पहिल्या प्रहरी दहा-बारा घोडी खेड-शिवापूरच्या वेशी बाहेर पडली.निम्मी घोडी सरनोबतांच्या छावणीकडे उधली.तर निम्मी मोरोपंतांच्या छावणीकडे.छत्रपती निर्धास्तच होते.त्यांना सेनापतींच्या मन आणि मनगटावर पूर्ण दिलंभरोसा होता.दुसऱ्या दिवशीचा सूर्य मावळण्याच्या आत घोडी दोन्ही छावणीत शिरली.
कारभाऱ्यांन बहिर्जी आल्याची वर्दी प्रतापरावांना पाठवली.बहिर्जी आल्याच कळताच रावांची कळी खुल्ली
महाराजसाहेबांनी जातीनं बहिर्जीची पाठवणी केली म्हणल्यावर काम पण जोखमीच असणार हे रावांनी हेरलं
डाव्या हाताची पालती मुट आपल्या भारदस्त मिशांवर फिरवत बहिर्जी यासी त्यांनी लागोलग बीचव्यात बोलावणं धाडलं.नाईक येताच नाईकांनी अदब मुजरा रुजू करून रावांच्या समोर उभे राहिले.राव..काय नाईक बऱ्याच दिसानं येणं केलं म्हणायचं..!! धन्यांचा सांगावं हाय जी..!! म्हणून जातीनं अलुया बघा..!! राव..होय तुम्हाला बघताच आम्ही ते ताडल..काय आज्ञा हाय स्वामींची..? झुकून पुढे होत बहिर्जीं हातचा खलिता अदबीनं रावांच्या हाती दिला.
एका दमात रावांनी तो खलिता दोन वेळा वाचून काढला.
खलिता वाचताच रावांचा चेहरा उजळून निघाला.
खलित्या मजकूर असा होता..
" तुम्ही लष्कर घेऊन सिताबीने वरघाटे सालेरीस जाऊन
खानावरी छापा घालून खान मारून चालविणें आणि
कोकणांतून मोरोपंत पेशवे येतील.तुम्ही वरघाटे येणें.
असे दुतर्फा चालून घेऊन गनिमा मारून गर्दीस
मेळविणें...!! "
मोरोपंत पेशव्यांना सुद्धा असा खलिता पाठविण्यात आला होता.
खालीत्यावरची नजर तशीच उचलून त्यांनी बहिर्जीवर टाकली.आणि म्हणाले नाईक आजची रात हितं काडा उद्या दिवस फुटीला आम्हाला साल्हेर पातूरची वाट बिनघोर पाहिजी.या तुम्ही आराम करा.नाईक गेले आणि रावांनी सरदारांना आपल्या ढेऱ्यात बोलावणं धाडलं.
सरदार येताच सर्वांना मोहिमेची कल्पना देण्यात आली.
या वेळी मात्र गनिमिकाव्याला बगल देऊन मराठे राजरोस
पणे मोगलांनवर आपली नंगी हत्यारं धरणार होती.प्रथम मराठयांनी मोगलांना खुलं आव्हान दिलं होतं.मराठयांनी कुठलीच गुप्तता पाळली नव्हती.बेधडक मराठे चालून गेले.दिवस फुटीला तळ उठला.पंचवीस हजार जनकुर्बान मावळा पाठिशी घेत रावांनी घोडयाला टाच दिली.
मोरोपंत पेशवे ही त्वरेने वरघाटी आले.सोबत दीमतीस वीस हजाराचा पाऊल लोक घेऊन आले.बघत बघत मराठ्यांचा पाच-पन्नास हजारांचा माणूस मेळ जमला.
रावांच्या दीमतीस मराठयांचे नावाजलेले सरदार होते.
आनंदराव मकाजी,रुपाजी भोसले,खंडोजी जगताप,
शिदोजी निंबाळकर,गोंदाजी जगताप,संताजी जगताप
मानाजी मोरे,विसाजी बल्लाळ,मोरो नागनाथ,सूर्याजी काकडे,व्यंकोजी दत्तो.मराठे बिनदिक्कत बागलांनात उतरले.साल्हेर पासून दहा-बारा कोस अलीकडे थांबले
त्यांना साल्हेर हुन दिलेरखान रवळागडाकडे गेल्याची खबर लागली होती.सेनापतींनी दहा हजार घोडळास त्याला हुसकावून जुलवत जुलवत पुन्हा साल्हेरच्या वेढ्यात आणण्याची योजना आखली.खान पुन्हा साल्हेर कडे सरखतोय म्हणल्यावर सेनापतींनी मोगलांनवर चाल करून जाण्याचा निर्णय घेतला.मोगलांना वाटलं फक्त
दहा एक हजार मराठे असतील.पण जेव्हा बाकीच सेना सागर युद्धात उतरला त्यावेळी मात्र मोगल हादरले.
पाच हजार शेलका पाऊललोक कुमकेस ठेवून मराठयांनी चहू दिशांनी चाल केली.यकायक इतक्या मोठ्या प्रमाणात मराठे चालून आल्यामुळे मोगल गांगरले.मराठयांनी मोगलांना सावरण्यास संधी दिलीच नाही.एका बाजूनं पायदळ अनं दुसऱ्या बाजूनं घोडदळ मोगलांनवर तुटून पडले.खासा सेनापतींनीच दिलेरखानाचा हत्ती येरगाटला
पठाणांच पथक जर दिलेरखाना मदतीला आलं नसतं तर दिलेरची कबर साल्हेरच्या पायत्याला मिळाली असती.
मराठयांचा आवेश बघून मोगलांचे हातपाय गळाले.हर घडीला मोगलांनकडील कुणीतरी पडल्याची आरोळी उठायची.तसे मराठे जोर लावायचे.मराठे ही जखमी होतच होते.पण त्याचा आवेश तसुभर कमी झाली नाही.
घनघोर युद्धाचा नुसता कल्लोळ उडाला.रक्ताचा चिखल झाला.मोगल,पठाण,राजपूत हत्ती,तोफा,जंबुरे,घोडे घेऊन
शर्तीन लढले पण मराठे ही मोठे हरीफ मराठ्यांही मोठी झुंज दिली.मोगलांना रणात आणून मारले.
" पृथ्वीचा धुराळा असा उडाला की,तीन कोश औरस चौरस कोणास आपलें व परकें माणूस दिसत नव्हते.हत्ती रणास आले.दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहाले.
घोडे,उंट,हत्ती यांस गणना नाही.रक्ताचे पूर वाहिले, रक्ताचा चिखल जाहाले,त्यामध्ये पाय रुतों लागले,असा कर्दम जाहाला.मारतां मारतां घोडे जिवंत उरले नाहीत.जे
जिवंत सापडले ते साहा हजार घोडे राजियाकडे गणतीस लागले.सवाशे हत्ती सापडले,साहा हजार उंटे सापडलीं.
मालमत्ता,खजाना,जडजवाहीर,कापड,अगणित बिछाईत
हातास लागली.बेवीस वजीर नामांकित मोगलांकडील धरले.खासा इख्लाखान पाडावा जाला.ऐसा कुल सुभा बुडविला.हजार दोन हजार सडे सडे पळाले.ऐसे युद्ध जाले.युद्धात सरनौबत प्रतापराव गुजर,अंदनराव व व्यंकोज दत्तो,रुपाजी भोसले,सूर्यराव काकडे,विसाजी
बल्लाळ,मोरो नागनाथ,मुकुंद बल्लाळ वरकड बाजे वजीर
उमराव ऐसे यांणी शिकस्त केली.तसेच मावळे लोक यांणी व सरदारांनी शर्तीची तरवार केली.मुख्य सरनौबत प्रतापराव गुजर व पेशवा मोरोपंत यांणी आंगीजणी केली आणि युद्ध करीता करीता सूर्यराव काकडे पंचहजारी मोठा लष्करी धारकरी,याणे युद्ध थोर केले.परंतु ते समयीं
जबुरियाचा गोळा लागून सूर्यराव पडिला.सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे.भारतीं जैसा कर्ण योद्धा.त्याच प्रतिभेचा अयसा शूर पडला.वरकडहि नामांकित शूर पडले.असे युद्ध होऊन मराठयांची फत्ते जाहाली...!! "
( फेब्रुवारी १६७२ )
या जबरदस्त विजया पाठोपाठ सरनौबतांनी उसंत न घेता त्याच जोशात मुल्हेरगडही काबीज केला.त्यावर भगवा फडकविला...!!
ही बातमी आयकून औरंगजेब मात्र भलताच संतापला
त्याने बहादूरखानास पत्र लिहिले.पत्रात बादशाह लिहितो
" साल्हेरच्या युद्धात तुम्ही मेला का नाहीत..?शिवाजीने सारा शाही मुलूख लुटला,अतिविख्यात किल्लेही घेतले आणि ही त्याची कृत्ये तुम्ही पाहत बसलांत.दख्खनचे
इतर सत्ताधारी शिवाजीला नजराणे देऊन लागले याचा अर्थच काय..? तुम्ही व हे इतर सत्ताधारी एक होऊन शिवाजीचा मुलूख कां काबीज करीत नाही..?त्या दुष्टाचे सर्व प्रदेश तुम्ही वेढल्यावर तो किल्ल्यावर बसुम राहून काय करील..? तुम्ही त्याला सर्व बाजूंनी वेढा..!! "
या वर बहादूरखानानं अगधीच मार्मिक पण खऱ्याखुऱ्या शब्दात औरंगजेबाला उत्तर लिहिलं आहे.
बहादूर लिहितो
" आपली आज्ञा प्रमाण आहे.परंतु हा शिवाजी खुद्द आपल्या राजधानीत येऊनही नमला नाही आणि आपण त्याला इतक्या कडक बंदोबस्तात ठेवले असता तो तरीही पक्षासारखा कसा झट्दिशी पळाला,हे आपणच कृपा करून आठवावे,म्हणजे आम्ही कर्तव्य करण्यात कसूर करीत नाही हे आपणास पटेल...!!
राज्यभिषेक दिनी सेनापती प्रतापराव गुजर यांच्या बद्दल लिहिणं म्हणजे या महान,थोर सेनापतींनं स्वराज्याची व छत्रपतींनची सेवा जीवापाड आणि निर्भीड पणे केली. खरतर छत्रपतींनवर सेनापती म्हणून छत्र धरण्याचा मान हा रावांचा होता.पण महाराजांचे बोल मनावर घेऊन या हट्टी सेनापतींनी बहलोलखानाच्या गोटावरती भेधडक हल्ला चढवला.माहिती होती की आपण या हल्ला हकनाक खर्ची पडू.पण तरी राव चाल करून घेले...!!
या अशा मंगल प्रसंगी रावांची आठवण झाल्या शिवाय राहवत नाही...!!
लखन समाप्त.
झालेली लेखन सेवा ही छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती प्रतापराव गुजर व जे मराठे साल्हेरच्या युद्धात लढले त्यासर्वानच्या चरणी अर्पण करतो...!!
No comments:
Post a Comment