विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 8 June 2021

तंजावर मराठा राजे व्यंकोजीराजे भोसले

 दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यातील







तंजावर मराठा राजे व्यंकोजीराजे भोसले यांची राजधानी होती. व्यंकोजीराजे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले आणि आई तुकाबाई यांचे पुत्र आणि पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू.1675 साली आदिलशहाचे सरदार म्हणून स्वपराक्रमाने तंजावर जिंकले.1676 साली स्वतंत्र तंजावर राज्य घोषित करून तंजावर राजधानी बनवली.व्यंकोजीराजे महाराज यांनी आपल्या तंजावर राज्यात त्यांनी कला वाड्मय साहित्य रचनेला प्रोत्साहन दिले.व्यंकोजीराजे यांच्या नंतर जितके मराठा राजे तंजावर राज्याला लाभले त्यांनी तंजावरचा सामाजिक राजकीय सांस्कृतिक लोकहितवादी विकासाला चालना दिली.तंजावर शहराच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक विकासामध्ये ह्या श्रीमंत भोसले राजघराणाचे खुप मोठे योगदान आहे. आजही तंजावर मध्ये दक्षिणी मराठी बोलली जाते. तंजावरच्या मराठी भाषेला टिकवण्यासाठी ह्या राजे भोसले घराण्याचे खुप मोठे योगदान आहे. व्यंकोजीराजे यांच्या नंतर शाहूजी, तुकोजी महाराज, सरफोजी,तुळजाजी,प्रतापसिंह, सरफोजी द्वितीय महाराज, शिवाजीराजे द्वितीय यांसारखे पराक्रमी महान राजे होऊन गेले.तंजावरचे मराठा राज्य1855 पर्यंत तंजावरच्या भूमीवर राज्य करत होते तंजावरचे शेवटचे राजे शिवाजीराजे(द्वितीय) भोसले हे होते.ह्या श्रीमंत राजे भोसले राजघराणाच्या सांस्कृतिक ,कला संपन्न, वैभवशाली, पराक्रमी, लोकहितवादी राजवटीची शौर्याची साक्ष देणार्या ह्या तंजावरच्या काही भव्य कलात्मक सुबक वास्तू.ह्या मराठा राज्याचा इतिहास सांस्कृतिक वारसा जर अनुभवायचा असेल तर नक्की तंजावरला भेट द्यावी नक्कीच मराठी संस्कृती आणि तंजावरच्या मराठा साम्राज्याचे वैभव अनुभवायला मिळेल.जय शिवराय जय व्यंकोजीराजे

🚩🙏शब्दांकन शिवभक्त शुभम गायकवाड पा.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...