पराक्रमी विक्रमादित्य चाळुक्य आणि त्यांचे सामंत राजे
---------------
@
सिंघनदेव यादव (पहिला) हे कल्याणीचे राजे, विक्रमादित्य चाळुक्य उर्फ साळुंखे (सहावा) यांचे सामंत होते. सिंघनदेव यांनीच विक्रमादित्यच्या कर्पुर व्रतासाठी लागणाऱ्या कर्पुरतिलक हत्तीला तंजावर येथून आणले आणि त्यामुळे राजा विक्रमादित्यचे 'कर्पुर व्रत' पूर्ण होण्यास मदत झाली.
सिंघनदेव यादव प्रथम यांनी सामंत असताना विक्रमादित्य चाळुक्य यांच्यासाठी अनेक मोहिमा केल्याचा इतिहास आहे. चाळुक्यांच्या गृहयुद्धात त्यांनी (सिंघनदेव यादव) विक्रमादित्याची बाजू घेतली होती. अशा या सिंघनदेव यादव यांच्या नावाने बीड जिल्ह्यात सिंघनदेवाचे जवळगाव आणि पालसिंघन ही दोन गावे आहेत.
विक्रमादित्य चाळुक्य यांच्या पन्नास वर्षाच्या स्थिर शासन काळात या पराक्रमी राजाने दक्षिणी भारतात चोळ, पान्ड्ये आदी राजांचा पराभव करत केरळपर्यंत धडक मारली. तर उत्तरेत बंग, मगध आणि नेपाळपर्यंत विजयी यात्रा केल्या. आणि देशातील बहुतांश भागातील राजांना आपले सामंत राजे बनविले.
विक्रमादित्य चाळुक्य उर्फ साळुंखे (सहावा) यांचे यादवांप्रमाणेच होयसाळ, कदम्ब, कल्चुरी, काकतीय, चोळ, पान्ड्ये इत्यादी इत्यादी सामंत अथवा मंडलिक राजे होते. इतकेच नव्हे तर उत्तरेत अनेकदा स्वाऱ्या करणाऱ्या कोण्याही मुस्लीम शासकांची, तब्बल पन्नास वर्षे स्थिर शासन करणाऱ्या या महाप्रतापी राजाच्या राज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत न व्हावी, एवढी जरब विक्रमादित्य चाळुक्य उर्फ साळुंखे (सहावा) या राजाची होती.
या काळात निम्म्याधिक भारतावर या पराक्रमी राजाचा तब्बल पन्नास वर्षे स्थिर अंमल होता. या काळात निम्म्याधिक भारतावर धर्मराज्य केलेल्या या पराक्रमी राजाने अनेक धार्मिक, राजकीय, सांस्कॄतिक, सामाजिक इत्यादी कार्यात आपले मोलाचे योगदान दिले. या काळात त्यांनी त्यांच्या सम्पूर्ण राज्यात शेकडो हेमाडपंथी मंदिरेही बांधून काढली.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
9422241339,
9922241339.
No comments:
Post a Comment