विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 8 February 2022

श्रीमंत उदाजी राजे पवार



  श्रीमंत उदाजी राजे पवार

postsaambhar ::



श्रीमंत उदाजी राजे पवार हे स्वराज्य मधील प्रमुख मात्तबर योद्धे व राजकीय मुत्सद्दी होते.

छत्रपती ताराराणी साहेब व भारतीय सम्राट श्री.छत्रपती शाहु महाराजांचे प्रमुख सरदार होते.1709 पासून त्यांचा पराक्रम सुरू झाला तो 1728 पर्यत दिल्लीवर आपला मराठा साम्राज्याचा झेंडा रोवण्यापर्यत सुरूच होता.छत्रपती शाहूंची हक्काची वसुली संपूर्ण उत्तर भारतात त्यांनी चौथाई देशमुखी वसूल केली.ते वसूल साताऱ्यात पोहच करत असत.
धार माळवा गुजरात काठवाड राजस्थान पानिपत पर्यत त्यांना अधिकार प्राप्त होते.धार ची जहागिरी सर्व प्रथम त्यांना च मिळाली होती.
यांनी बाळाजी विश्वनाथ व बाजीराव प्रधानाच्या अगोदर पासूनच उत्तर भारतात आगेकूच केली होती.उदाजी राजेंचा स्वभाव तापट व आक्रमक असल्याने व स्वाभिमानी मराठे असल्याने पेशवे प्रधानांचे व त्यांचे फार काही जमले नाही याच मुळे त्यांची क्षमता असताना त्यांच्या कडून धार प्रांताची जहागिरी काढून घेण्यात आली.
छत्रपती संभाजीराजे प्रमाणेच शूरवीर तान्हाजी,सेनापती हंबीरराव मोहिते,सेनापती संताजी,सेनापती धनाजीराव,यांच्या प्रमाणेच शूरवीर व आक्रमक सरदार म्हणून त्यांचा नावलौकिक होता. एक स्वतंत्र राजांसारखा त्यांचा सन्मान व दरारा होता.
काही इतिहासकारांनी त्यांचा पराक्रम जाणूनबुजून झाकोळला हस्त लिखित स्वरूपात लिहिला गेला नाही.
छत्रपती शाहू कालखंडात इ.सन १७३४मध्ये उदाजींनी सिध्दी अंबर अफवाणी याच्याशी सामना करत त्यांचे शिर कापून आणले.
छत्रपती शाहू महाराज मोघलांच्या कब्जात दिल्लीत असतानाच उत्तरेत उदाजींनी आपला जोर दाखवायला सुरुवात केली होती.छत्रपती शाहू महाराज स्वराज्यातील पुण्यात आल्यानंतर ताराराणी पक्ष सोडून शाहूंच्या सोबत सर्व बंधू सह सामील झाले.
बाजीराव प्रधान यांच्या अगोदर पासूनच माळवा व गुजरात या प्रांतात मराठ्यांचा जम बसविण्यात उदाजी राजेंनी प्रमुख योगदान दिले. धार, मलठण, कवठे यमाई इत्यादी ठिकाणी उदाजी पवार यांची सरंजामी इनामे होती. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासात राजे धार पवार घराण्याचे योगदान मोठे आहे.
3 फेब्रुवारी 1760 रोजी त्यांचा स्मृतिदिन यानिमित्ताने श्रीमंत उदाजी राजे पवार यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन💐🙏

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...